एका वाक्यात उत्तरे द्या :
१. संत सेना महाराजांना सुख केव्हा झाले?
उ. संत सेना महाराजांना इतर संत, ज्यांना ते त्यांचे माहेर समजत, भेटले तेव्हा सुख झाले.
२. संत सेना महाराजांचा सर्व थकवा कशामुळे गेला?
उ. संतचरण पाहता संत सेना महाराजांचा सर्व थकवा गेला.
५०-६० शब्दांत उत्तरे द्या :
१. संत सेना महाराजांनी संतांच्या भेटीने होणारा आनंद कसा वर्णिला आहे?
उ. संत सेना महाराजांना इतर संत भेटले की खूप आनंद होत असे. म्हणून जेव्हा ते संतांना पाहतात तेव्हा त्यांना तो दिवस सोनियाचा व खूप भाग्याचा वाटे. ते इतर संतांना आपले माहेर समजून त्यांची सेवा करत. ते म्हणतात की माहेर भेटले की ते सुखी होत. इतर संतांचे सदाचरण पाहून त्यांचा शीण जाई. साधू संत घरी येत तो दिवस म्हणजेच दिवाळी व दसरा असे मानून ते त्यांची सेवा करत व त्यांना त्यात आनंद होई.
संदर्भासहित स्पष्टीकरण द्या :
अवघा निरसला शीण! देखता संतचरण!
आजि दिवाळी दसरा! सेना म्हणे आले घरा!
वरील ओळी संत सेना महाराजांच्या 'आजि सोनियाचा दिवस' या अभंगातून घेतल्या आहेत. या ओळींत संत सेना महाराज म्हणतात की संतांचे पवित्र आचरण पाहून त्यांचा अवघा शीण जातो व त्यांना शुद्ध झाल्यासारखे वाटते. 'साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा' असे मानून संत सेना महाराज म्हणतात की त्यांच्या घरी इतर साधू संत आले, ते धन्य झाले.