एका वाक्यात उत्तरे द्या :
१. संत सोयराबाईंच्या मते संसाराचे सुख कशासारखे आहे?
उ. संत सोयराबाईंच्या मते संसाराचे सुख मृगजळासारखे असते.
२. संत सोयराबाईंच्या मते लोक कशात गुंतले आहेत?
उ. संत सोयराबाईंच्या मते लोक वासनेत गुंतले आहेत.
५०-६० शब्दांत उत्तरे द्या :
१. संत सोयराबाईंनी संसाराची तुलना मृगजळाशी कशी केली आहे?
उ. संत सोयराबाईंनी संसाराला मृगजळाची उपमा दिली आहे. त्या म्हणतात की ज्याप्रमाणे मृगजळ केवळ पाण्याचा आभास निर्माण करते त्याप्रमाणे संसाराचे सुख केवळ तात्पुरते असते. माणसाला परमोच्च सुख व समाधान जिंकायचे असेल तर संसाराच्या ऐहिक सुखाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारला पाहिजे. आत्ताच्या सुखाचा विचार न करता दूरदृष्टी ठेवून वागले पाहिजे.