कृती (३)PAGE 6
कृती (३)Q 1 PAGE 6
खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
SOLUTION
योग्य त्या प्रमाणात, आवश्यक त्या प्रमाणात वाहन वापरण ही माणसाची गरज आहे. योग्य त्या प्रमाणात वाहन न वापरणे, अव्यवहार्य रितीने वापरणे आणि गरज नसताना वापरणे हे अनैसर्गिक आहे.
खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
SOLUTION
सुरुवातीला लोक गाडी जपून चालवतात. थोड्या काळासाठीच जपून चालवतात. मात्र हळूहळू त्यांना गाडीची चटक लागते. मग ते गरज असतानाच नव्हे, तर केवळ मौजमजा करण्यासाठीसुद्धा गाडीचा वापर करतात. हळूहळू त्यांना गाडीशिवाय कुठे जाताही येत नाही. पूर्णपणे ते गाडीवरच अवलंबून राहतात. हे सिगारेटच्या व्यसनासारखेच आहे. सुरुवातीला फक्त एकदाच, मग फक्त एकच. असे करता करता दिवसाला एक पाकीट कधी होते हे कळतच नाही. नंतर नंतर सिगारेट मिळाली नाही तर त्या व्यक्तीचे मन:स्वास्थ्यच नाहीसे होते. सिगारेटशिवाय ती राहू शकत नाही. ती व्यक्ती सिगारेटचा गुलाम होऊन जाते. तद्वतच माणसेही गाड्यांचे गुलाम होतात. त्यांच्या वापराबाबत माणसांना कोणतेही तारतम्य राहत नाही.
खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नय
SOLUTION
वाहन हे सोयीसाठी असते. ते साधन आहे. आपला वेळ व आपले श्रम वाहनामुळे वाचतात, आपली कामे भराभर होतात. वाहनाचे हे स्थान ओळखले पाहिजे. यापलीकडे.
आपल्या भावना गुंतवू नयेत. वाऱ्यासोबत त्याच्या वेगाने धावू लागलो तर काही क्षण आनंद मिळतो. उत्साह, उल्हास शरीरात सळसळतो. म्हणजे आपल्या भावना उचंबळून येतात. या भावनांवर आपण आरूढ झालो, तर आपला वाहनावर ताबा राहत नाही आणि अपघातांची शक्यता निर्माण होते.