कृती (६)Q 2 PAGE 6
अभिव्यक्त
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
गाडी चालवताना काळजी घेतली आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले तर प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि कमीत कमी वेळेत पूर्ण होतो.
गाडी चालवायला बसण्यापूर्वीची पूर्वतयारी :
(१) प्रत्येक वेळी गाडी चालवायला बसण्यापूर्वी वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), अन्य आवश्यक कागदपत्रे (विमा, पीयुसी इत्यादी) घेतल्याची खात्री करून घ्यावी.
(२) टायरमधील हवा आणि गाडीतील इंधन पुरेपूर असल्याची खात्री करावी.
(३) गाडीतील प्रवाशांना वाहतुकीच्या सामान्य नियमांची कल्पना द्यावी. आणीबाणीच्या प्रसंगी काय करावे त्याची माहिती द्यावी.
प्रत्यक्ष गाडी चालवताना घ्यायची काळजी :
(१) गाडीवर पूर्ण लक्ष ठेवावे.
(२) गाडीतील प्रवाशांच्या गप्पांत सामील होऊ नये.
(३) गाडीचा वेग पन्नास-साठ किलोमीटरच्या पलीकडे जाऊ देऊ नये; कारण आपल्याकडील रस्ते अजूनही साठ किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने जाण्यास योग्य बनवलेले नाहीत.
(४) जास्त वेगामुळे सतत हादरे बसतात आणि सर्वांनाच त्रास होतो.
शारीरिक व्याधी जडतात. म्हणून जास्त वेगाचा मोह टाळावा.
(५) गाडीतील प्रवाशांना गप्पा मारण्यास बंदी घालता येत नाही.
तरीही गप्पांच्या ओघात अचानक मोठ्याने ओरडणे किंवा हास्यस्फोटक विनोद करणे या गोष्टी टाळण्याच्या सूचना द्याव्यात.
(६) स्वत:ची लेन सोडून जाऊ नये.
(७) लेन बदलताना, वळण घेताना, रस्ता बदलताना खूप आधीपासून तयारी करावी. योग्य ते सिग्नल दयावेत.
(८) वाटेत जागोजागी लावलेल्या वाहतुकीच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
(९) गाडीत धूम्रपान, मद्यपान करू नये. गाडी चालकाने तर मुळीच करू नये.
अशा प्रकारे काळजी घेतल्यास आपला प्रवास सुखाचा होतो.