कृती (६) [PAGE 19]
Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 रे थांब जरा आषाढघना कृती (६) [Page 19]
कृती (६) | Q 1 | Page 19
अभिव्यक्ती.
आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.
ANSWER:
आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरू 'कालिदास जयंतीला' मी माझ्या गावी होतो. त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकटाच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. 'शिवानी टेकडी' ही खूप निसर्गरम्य आहे. माथ्यावर दाट झाडी आहे. मी झाडाखाली बसून आकाश न्याहाळत होतो. अचानक चोहोबाजूंनी काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली.
आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकोळून गेली, झोंबणारे गार वारे चोहोकडून अंगावर आले नि टपटप टपटप टपोर थेंब बरसू लागले. मी छत्री नेली नव्हती, त्यामुळे यथेच्छ सचैल भिजायचे मी ठरवले. आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी निथळत होतो. झाडांच्या फांदया घुसळत जणू झाडे झिम्मा खेळत होती. घरट्यांतले पक्षी पंखावर थेंबाचे मोती घेऊन चिडीचूप होते. पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती नि आषाढमेघ मल्हार राग गात होते. मी डोळ्यांत ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होता. सडींचा तंबोरा लागला होता. मला वाटले मीपण त्या वृक्षराजीतले एक झाड आहे आणि मला आषाढमेघाचे फळ फुटले आहे. सारा आसमंत ओल्या समाधीत बुडून गेला आहे.