कृती (४) [PAGE 19]
Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board Chapter 1 रे थांब जरा आषाढघना कृती (४) [Page 19]
कृती (४) | Q 1 | Page 19
काव्यसौंदर्य.
आश्लेषांच्या तुषारस्नानीं
भिउन पिसोळीं थव्याथव्यांनीं
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.
ANSWER:
कवी बा. भ. बोरकर यांनी 'रे थांब जरा आषाढघना' या कवितेमध्ये आषाढ महिन्यात धरतीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्गसृष्टीत झालेले सौंदर्यमय बदल नादमय व ओघवत्या शब्दकळेत चित्रित केले आहेत. वरील ओळींमध्ये भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या थव्याचे वर्णन केले आहे.
आषाढातील पाऊस थोडासा थांबल्यावर खाली येणाऱ्या कोवळ्या उन्हाने सृष्टी लख्ख झाली. आश्लेषा या पावसाळी नक्षत्रातील पाऊस पडताना त्यांच्या टपटपणाऱ्या थेंबांची आंघोळ फुलपाखरांना होत आहे. त्या थेंबाना भिऊन फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत फुलांवरून रुंजी घालत आहेत. माध्यान्ही म्हणजेच भर दुपारी आपल्या रंगीबेरंगी पंखाची रत्ने प्रभाव उधळीत त्याच्या निळ्या रंगात साऱ्या रानाला जणू भिजवीत उडत आहेत. फुलपाखरांचे अतिशय प्रत्ययकारी चित्र डोळ्यांसमोर उभे राहील, असे ओघवते वर्णन उपरोक्त ओळींत कवींनी शब्दलाघवाने केले आहे. पिसोळी' या ग्रामीण शब्दांने फुलपाखरांचा इवला भिरभिरणारा देह डोळे दिपवणारा ठरला आहे.