Advertisement

कृती (४) | Q 4 | Page 16 स्वमत. ‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.

कृती (४) | Q 4 | Page 16

स्वमत.


‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.


SOLUTION

प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यक आहे; हे अगदी खरे आहे. आपण हे भान बाळगत नाही. त्यामुळे आपले नुकसानही होते. आपल्या साध्या साध्या कृतींकडे लक्ष दिले, तरी हा मुद्दा लक्षात येईल. रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लीलया चुकवत चुकवत जातो. खो-खोमध्ये किती चपळाई दाखवतो आपण! आपण सवयीने या हालचाली करतो. त्यामुळे त्यांतली किमया आपल्या लक्षातच येत नाही. 'चक दे इंडिया हा चित्रपट पाहताना है खूपदा लक्षात आले आहे. सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो. 'हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधाराने मी जगतो,' ही भावना सतत जागी असली पाहिजे. मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो. शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो. अनेकदा आपल्याला नाचण्याची लहर येते. पण पावले नीट पडत नाहीत. आपण मनातल्या मनात खटू होतो. पण शरीराची जाणीव असेल, तर नृत्यातल्या हालचाली शिकून घेता येतात. तिथेच आपली चूक होते.


खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे. कोणाही समोर जातो, तेव्हा हेच लक्षात ठेवले पाहिजे. आपण इतरांसमोर स्वत:ला सादर करीत असतो. ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे. आपल्याला लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे. तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो. अभिनेते, खेळाडू अनेक कसलेले सादरकर्ते डौलदार का दिसतात? एखादी अभिनेत्री फोटोसाठी उभी राहते, तेव्हा तीच लक्षणीय का दिसते? ही सगळी माणसे आपल्या देहाचे, आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात. आपले अस्तित्व देखणे करायचा प्रयत्न करतात. ती स्वत:च्या अस्तित्वाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यांना देतातही. हेच सुख असते. त्यातच आनंद असतो.


HSC MARATHI