Advertisement

Chapter 3 - अशी पुस्तकं Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 1: अशी पुस्तकं

Chapter 1 - अशी पुस्तकं Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 1 - अशी पुस्तकं Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 1 - अशी पुस्तकं Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 1 - अशी पुस्तकं Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 1 - अशी पुस्तकं Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 1: अशी पुस्तकं

तुलना करा.

'पुस्तकरूपी' मित्र

'मानवी' मित्र

 

 

 

 

 

 

 

 



SOLUTION

'पुस्तकरूपी' मित्र

'मानवी' मित्र

पुस्तक आयुष्यभर सोबत करतात.

जवळचे मित्र दुरावतात.

पुस्तक नेहमी सुगंधाप्रमाणे मनात दरवळत राहतात.

ज्यांच्यावर प्रेम केले ते वैरी बनतात

पुस्तके कधीही विश्वासघात करीत नाहीत.

माणसे काही वेळा विश्वास घात करतात.

पुस्तके स्वत:जवळचे सर्व भांडार मुक्तपणे बहाल करतात.

माणसे उदार नसतात.



कारणे लिहा.

ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण_________


SOLUTION

ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण लेखक स्वत: पुस्तकप्रेमी असल्याने त्यांना ग्रंथप्रेमीच्या भावनांची जाणीव होती.



प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण __________


SOLUTION

'प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक दयायचं नाही,' असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण अनेकदा फुकटे वाचक नेलेले पुस्तक परत देतच नाहीत.



'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण __________


SOLUTION

'रसिकतेचा आणि वयाचा संबंध जोडणं हेच अरसिकपणाचं आहे', कारण कलात्मक आनंद देणारे श्रेष्ठ साहित्य तरुणांना व वृद्धांना सारखाच आनंद देते.


कृती करा:

हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ


SOLUTION

१)अतिबलाढ्य, निष्ठुर नियती आणि दुबळा, महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात लाखो वर्षांपासून द्वंद्वयुद्ध चालू आहे.

२) नियती बलाढ्य आहे, पण दुबळ्या माणसातही अदम्य ईर्ष्या आहे.

३) विजय मिळवायचाच, या ईर्षेने माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे.४)भविष्यात केव्हातरी माणूस नियतीवर विजय मिळवीलच.



उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये


SOLUTION

१) अंत:करणात भावनांची खळबळ उडवून देतात.

२) दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंध प्रमाणे मनात दरवळत राहतात.

३) झपाटून टाकतात.

४) ही पुस्तके विसरता येत नाहीत.



अर्थ स्पष्ट करा.

दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे


SOLUTION

दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे - एखाद्या गोष्टीमुळे आधी नुकसान झाले असेल तर पुढच्या वेळी सावधगिरी बाळगणे.



पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.


SOLUTION

पुस्तकाला माहेरी आल्यासारखे वाटणे- पुस्तकाला प्रेमाने सांभाळले जाणे.



सुचनेनुसार सोडवा.

'चवदार' सारखे शब्द लिहा.


SOLUTION

दळदार, डेरेदार, वळणदार, रखवालदार.



जसे विफलताचे वैफल्य तसे उत्तरे

सफलता -

कुशलता -

निपुणता-


SOLUTION

सफलता - साफल्य

कुशलता -कौशल्य

निपुणता -नैपुण्य.


शब्दाच्या शेवटी 'क' असलेले चार शब्द लिहाः

उदा., 'उत्तेजक'


SOLUTION

(१) लेखक

(२) वाचक

(३) रसिक

(४) पथिक



या शब्दगटातील विशेषणे ओळखा :

काव्यात्म, अवस्था, साहित्यकृती,विमनस्क, प्रेरणा, संवाद, नव्या,उत्तम

SOLUTION

काव्यात्म

विमनस्क

नव्या

उत्तम

वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.


SOLUTION

ललित आणि वैचारिक साहित्यातून विलक्षण अनुभव मिळतात. ते वैशिष्ट्यपूर्ण असतात. ते वाचल्यावर वाचकांच्या मनावर काही ना काही परिणाम होतोच. त्या पुस्तकातून भोवतालच्या परिस्थितीचे दर्शन घडते. त्यातल्या दुःखद घटनांनी वाचकांचे हृदय पिळवटून जाते. त्या परिस्थितीतील दुःखाची जाणीव होते. ही अशी स्थिती वाईट आहे. ती तशी असता कामा नये. ती बदलली पाहिजे. असे विचार मनात येतात. मग माणसे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात. नवीन चांगली स्थिती आणण्याच्या विचारांना पाठिंबा देतात.

उदाहरणार्थ, दया पवार यांचे 'बलुतं' हे आत्मकथनात्मक पुस्तक पाहा. यात दलित समाजाचे अत्यंत हीनदीन अवस्थेतील चित्रण केलेले आहे. हे वाचल्यावर वाचकाला दुःख होते. संतापही येतो. मग जातीयता, धर्मांधता या तत्त्वांविरुद्ध त्याच्या मनात तिडीक निर्माण होते. याचा अर्थ 'बलुतं' हे पुस्तक माणुसकी ची बाजू घेतो. गुलामगिरी विरुद्ध, अन्यायाविरुद्ध ते पुस्तक माणसाला लढायला प्रवृत्त करते. म्हणजे अशी पुस्तके माणसाला चांगले जग निर्माण करण्याची प्रेरणा देतात.



पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.


SOLUTION

लेखकांच्या मते, मानवी जीवनामध्ये पुस्तकाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. वाचकाला पुस्तकातून चांगले काय, वाईट काय याचे दर्शन घडते. तो चांगले-वाईट ओळखायला शिकतो. वाईटाचा त्याग केला पाहिजे आणि चांगले आत्मसात केले पाहिजे ही दृष्टी त्याला मिळते. त्यानुसार जीवन जगायला तो सुरुवात करतो. यावरून माणसाच्या आयुष्यातील पुस्तकाचे महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल... उदाहरणार्थ, महात्मा फुले यांचे साहित्य आपण वाचले की शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती, होणारा अन्याय आपल्या लक्षात येऊ लागतो. त्यामुळे आपल्या अंत:करणात भावनांची मोठी खळबळ उडते. आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीचे आपण निरीक्षण करतो. त्यात चांगले काय आहे, वाईट काय आहे, हे आपल्याला कळू लागते. म्हणून असे पुस्तक आपण कधी विसरू शकत नाही. उलट, असे पुस्तक आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो.

प्रत्येक वाचनाच्या वेळी आपल्याला नवीन दृष्टी मिळते. परिस्थितीचे अधिकाधिक चांगले ज्ञान मिळते. अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आणि काय करता कामा नये यांचीही दृष्टी मिळते. मग आपण त्यानुसार जीवन जगायचा प्रयत्न करतो. म्हणजेच, पुस्तक आपल्याला चांगले जीवन जगायला शिकवतात. हे पुस्तकाचे फार मोठे महत्त्व आहे. पुस्तकाचे हे महत्त्व लेखक समजावून सांगत आहेत.

कंपन्यांमध्ये भागीदारी मिळाली. हे सगळे वाचल्यानंतर माझी दृष्टी बदलली. आपणही प्रयत्न करून असे भव्यदिव्य यश मिळवू शकतो, असे मला वाटू लागले. माझी निराशा झटकली गेली. आता जेव्हा जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा तेव्हा ते पुस्तक मी घेतो. कुठूनही वाचायला सुरुवात करतो. माझा कंटाळा निघून जातो आणि मन चैतन्याने भरून जाते.



हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


SOLUTION

या पाठात लेखकाने हेमिंग्वेच्या 'द ओल्ड मॅन अँड द सी' या कादंबरीचा परिचय करून दिला आहे. कादंबरीचे कथानक तसे साधे आहे. एका धाडसी म्हाताऱ्या कोळ्याला एके दिवशी प्रचंड ताकदीच्या देवमाशाची शिकार करायची होती. अखेरीस एक प्रचंड देवमासा या म्हाताऱ्या कोळ्याच्या जाळ्यात सापडला. कोळ्याने जिवाच्या शथाने देवमाशाशी लढत दिली आणि त्याच्यावर विजय मिळवला. विजयाच्या आरोळ्या ठोकत तो किनाऱ्याकडे निघाला. वाटेत त्या देवमाशावर शार्क माशांनी मोठा हल्ला केला. देवमाशाला त्यांनी खाऊन टाकले. जाळ्यामध्ये देवमाशाची फक्त हाडे शिल्लक राहिली. म्हणजे त्या कोळ्याला देवमासा मिळाला आणि मिळाला नाहीसुद्धा! यावर तो कोळी निराश झाला नाही. हतबल झाला नाही. तो हसला आणि 'उदया पुन्हा देवमाशाच्या शिकारीला जाऊ,' असा त्याने निश्चय केला.

तो देवमासा आणि शार्क मासे महाप्रचंड शक्तिशाली नियतीचे प्रतीक होत. हा कोळी संपूर्ण मानवजातीचा प्रतीक होय. या कोळ्याची लढाई म्हणजे संपूर्ण मानवजातीचीच लढाई होय. हजारो-लाखो वर्षांपूर्वीपासून माणूस नियतीशी झगडत आहे. प्रत्येक वेळी माणूस नियतीकडून पराभूत होतो. तरीही तो पुन्हा नियतीशी झगडायला सिद्ध होतो. जिंकण्याची इच्छा, त्याची विजिगीषु वृत्ती या लढाईतून दिसून येते. हेमिंग्वे आपला हाच दृष्टिकोन या कादंबरीतून मांडला आहे.



'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.


SOLUTION

उत्तम साहित्यकृती आपल्याला सदोदित भावनिक सोबत करतात, हे खरेच आहे. अशी पुस्तके आपल्याला उभारी देतात. मी दहावीची परीक्षा दिली. सर्व पेपर काही चांगले गेले नव्हते. कमी गुण मिळणार याची मला मनोमन खात्री होती. निराश झालो होतो. काय करावे ते सुचत नव्हते.तेवढ्यात एक पुस्तक माझ्या हाती लागले - अच्युत गोडबोले या लेखकांचे 'मुसाफिर'. वाचायला सुरुवात केली. मग पुढे वाचत गेलो, वाचत गेलो आणि वाचतच गेलो. लेखकांनी स्वतःचे आत्मकथन त्यात मांडले आहे. लेखक स्वतः प्रचंड बुद्धिमान. आयआयटीसारख्या मातब्बर खूप प्रतिष्ठित अशा शिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला होता. कोणत्या तरी कारणाने सामाजिक चळवळीकडे लक्ष गेले. देशातील 'अन्याय, अत्याचार यांचे दर्शन घडले. जीवनाचा मार्ग ढळला. मग कसेबसे स्वतःला सावरले. झोकून देऊन अभ्यास सुरू केला. प्रचंड यश 'मिळत गेले. त्यांनी लिहिलेली पुस्तके जगभर गाजली. जगभर मोठमोठ्या कंपन्यांना मार्गदर्शन केले. कित्येक कंपन्या स्वतः स्थापन केल्या. अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी मिळाली. हे सगळे वाचल्यानंतर माझी दृष्टी बदलली. आपणही प्रयत्न करून असे भव्यदिव्य यश मिळवू शकतो, असे मला वाटू लागले. माझी निराशा झटकली गेली.. आता जेव्हा जेव्हा कंटाळा येतो, तेव्हा तेव्हा ते पुस्तक मी घेतो. कुठूनही वाचायला सुरुवात करतो. माझा कंटाळा निघून जातो आणि मन चैतन्याने भरून जाते.



'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.


SOLUTION

लेखकांच्या एका ग्रंथप्रेमी मित्रांनी लेखकांना पुस्तक वाचायला देताना खूप अटी घातल्या. त्यांचे सांगणे अपमानास्पद वाटेल असेच होते. पण लेखकांना ते अपमानास्पद वाटले नाही. याचे कारण लेखक स्वतः ग्रंथप्रेमी होते. म्हणूनच त्यांना ग्रंथप्रेमी माणसाच्या शब्दांमागील भावना समजून घेता आली. त्यांनी लेखकांना स्वतःची भूमिका समजावून सांगितली. एका कविमित्राने त्यांच्याकडून घेतलेली दोन पुस्तके परत केलीच नाहीत. हे त्या ग्रंथप्रेमी मित्रांना जिव्हारी लागले. त्यांनी निर्णय घेऊन टाकला की आता यापुढे कोणालाही पुस्तक दयायचे नाही. याचे कारण त्यांची पुस्तके त्यांना स्वतःच्या अपत्यासारखी वाटत होती. म्हणून पुस्तके नसली तर राजवाडाही स्मशानासारखा वाटेल आणि सोबत पुस्तके असतील तर काळ्यापाण्याची शिक्षाही आनंदाने स्वीकारीन असे ते ग्रंथप्रेमी लेखकांना सांगतात. यावरून त्यांची ग्रंथांवरची निता लक्षात येते. असे निष्ठावंत वाचक लेखकाना हल्ली आढळतच नाही.


.

Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free

The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.


 • Chapter 1.01: मामू

 • Chapter 1.02: प्राणसई

 • Chapter 1.03: अशी पुस्तकं

 • Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ

 • Chapter 1.05: परिमळ

 • Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं

 • Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!

 • Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके

 • Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

 • Chapter 2.1: शब्द

 • Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

 • Chapter 2.12: पैंजण

 • Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

 • Chapter 3.01: हसवाफसवी

 • Chapter 3.02: ध्यानीमनी

 • Chapter 3.03: सुंदर मी होणार

 • Chapter 4.01: सूत्रसंचालन

 • Chapter 4.02: मुद्रितशोधन

 • Chapter 4.03: अनुवाद

 • Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

 • Chapter 4.05: रेडिओजॉकी

 • Chapter 5.01: शब्दशक्ती

 • Chapter 5.02: काव्यगुण

 • Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण

 • Chapter 5.04: काळ

 • Chapter 5.05: शब्दभेद


.