Chapter 1: परिमळ
कृती करा.
लेखक प्र., के, आने यांच्या मते कवयित्रीचे गुणविशेष
SOLUTION
१)लिहिता-वाचता न येणारी, अशिक्षित, कष्टाळू गृहिणी.
२) घरातले व शेतातले काम करता करता गाणी रचली.
३) माणसाचे खोटेनाटे व्यवहार, कृतघ्नपणा आणि स्वार्थ पाहून निर्माण झालेली मनस्वी चीड.
४) मानवाच्या कल्याणाची कळकळ.
बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष
SOLUTION
१) प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटना बा विचार.
२) तिचा प्रारंभ आणि शेवट नाट्यात्मक.
३) एखादी भावना अल्प शब्दांत जास्तीत जास्त प्रभावी करण्याचे कौशल्य.
४)रस व ध्वनी यांच्या दृष्टीने रसभंग न करणारे सोपे शब्द आणि अहिराणी भाषेमुळे गोडवा.
अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे.
SOLUTION
१) प्रयत्नाने किंवा शिक्षणाने प्रतिभाशक्ती लाभत नाही.
२) सृष्टीतल्या सौंदर्याचा आणि जीवनातल्या संगीताचा कवितेत प्रत्यय येतो.
३) सहजता आणि उत्स्फूर्तता यांचे दर्शन घडते.
४) कवीच्या जिभेवर येणारा शब्द मुळात नाचत येतो.
खलील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.
SOLUTION
तुलना करा.
SOLUTION
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे-
SOLUTION
(१) पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन
(२) हिरवे हिरवे पानं
लाल फयं जशी चोच
आलं वडाच्या झाडाला
जसं पीक पोपटाचं!
(३) कडू बोलता बोलता
पुढे कशी नरमली
कडू निंबोयी शेवटी
पिकीसनी गोड झाली!
बहिणाबाई प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता -
SOLUTION
१) पाय उचल रे बैला,
कर बापा आता घाई
चालू दे रे रगडनं
तुझ्या पायाची पुण्याई
(२) मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात ?
आता होतं भुईवर
गेलं गेलं आभायात.
प्रस्तुत पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा.
SOLUTION
(१) एकर-किती
(२) नक्कल-अक्कल
(३) जीव-हीव
(४) थंडी-दिंडी
(५) घाई-पुन्याई
शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :
(१) बावनकशी सोने- _________
(२) सोन्याची खाण - __________
(३) करमाची रेखा - ___________
(४) चतकोर चोपडी - _________
SOLUTION
(१) बावनकशी सोने- अतिशय शुद्ध गोष्ट
(२) सोन्याची खाण - दुर्मीळ खजिना
(३) करमाची रेखा - भाग्यरेषा
(४) चतकोर चोपडी - लहानशी वही.
पुढील वाकपचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :
तोंडात बोटे घालणे:
SOLUTION
अर्थ- आश्चर्य व्यक्त करणे.
वाक्य - माथेरानला सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य पाहून सुमनने तोंडात बोटे घातली.
तोंडात मूग धरून बसणे
SOLUTION
अर्थ - गप्प बसणे, काहीही न बोलणे.
वाक्य- शिक्षकांनी प्रश्न विचारताच श्रीधर तोंडात मूग धरून बसला.
खालील शब्दांना उपसर्गव प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ-
(आ) कृपा-
(इ) धर्म-
(ई) बोध-
(उ) गुण
SOLUTION
(अ) अर्थ - अनर्थ, आर्थिक, अर्थपूर्ण, सार्थ.
(आ) कृपा - अवकृपा, कृपाळू, कृपावंत, कृपा कर.
(इ) धर्म - अधर्म, प्रतिधर्म, धार्मिक, धर्मांध.
(ई) बोध - सुबोध, अबोध, दुर्बोध, बोधपर.
(उ) गुण - सगुण, निर्गुण, गुणवान, गुणवंत.
'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,' हे लेखकांचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता वाचल्या आणि ते प्रचंड प्रभावित झाले. 'स्मृतिचित्रे' या साहित्यकृतीइतकी ती श्रेष्ठ साहित्यकृती आहे, असे त्यांचे मत झाले. बहिणाबाईंची प्रतिभा त्यांच्या कवितेतल्या शब्दाशब्दांतून पाझरत राहते. इतके सोज्वळ, इतके निर्मळ काव्य मराठी साहित्यात क्वचितच दिसते, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.
'बहिणाबाई या निरक्षर, अशिक्षित होत्या. मग त्यांना उत्तम काव्य ' लिहिता कसे येईल? असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. त्याचे उत्तर लेखकांनी देऊन टाकले आहे. शिक्षण आणि प्रतिभाशक्ती यांचा काडीइतकाही संबंध नाही. बहिणाबाईंच्या काव्यावरून हे स्पष्टपणे दिसून 'येते. त्या ग्रामीण भागात राहत होत्या. घरकाम आणि शेतीकाम यांपलीकडे ' 'त्यांना काहीही येत नव्हते. तरीही त्यांनी श्रेष्ठ दर्जाचे काव्य निर्माण केले.
बहिणाबाई अशिक्षित होत्या आणि त्यांना फक्त बोलीभाषाच येत होती, म्हणून त्यांचे काव्य जुन्यांच्या रांगेत बसवले तरी ते चमकून उठते. 'बरे, त्यांचे काव्य आधुनिकांच्या रांगेत ठेवले, तरी तेथेही ते झळाळून उठते; इतका त्यांच्या काव्याचा दर्जा उच्च आहे. त्यांना माणसांच्या साध्या कृतीतून, वागण्यातून माणसाच्या स्वभावातील, त्याच्या प्रवृत्तीतील 'विपरीतता दिसून येते. निसर्गातील साध्या साध्या घटकांच्या दर्शनातून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडते. त्यांच्या काव्याचे या सामर्थ्यामुळे वाचकाला नैतिक मार्गदर्शन मिळते. म्हणूनच बहिणाबाईंचे काव्य नव्या जुन्या सर्व प्रकारच्या काव्यांमध्ये स्वतःच्या तेजाने झळाळून उठते.
'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
SOLUTION
बहिणाबाई कडे असामान्य काव्यप्रतिभा होती. ग्रामीण जीवन व कृषिजीवन यांच्याशी निगडित संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे ग्रामीण भावजीवन आणि कृषी जीवन यांचे अर्थपूर्ण व भावपूर्ण तपशील त्यांच्या कवितांत सहज आढळतात. या तपशिलांच्या साहाय्याने त्या माणसाच्या अंतरंगातील विसंगत व विपरीत वृत्ती-प्रवृत्तीवर बोट ठेवतात. माणूस काय गमावत चालला आहे आणि त्याने काय कमावले पाहिजे, हे त्या कळकळीने सांगतात.
बहिणाबाईच्या काव्याचा सर्वप्रथम कोणता गुण जाणवत असेल, तर तो म्हणजे सहजता हा होय. कोकीळ पक्ष्याने तोंड उघडले की, आपोआपच संगीत वाहू लागते. फुलांमधला सुगंध नैसर्गिक ऊमींतून सहज दरवळतो. बहिणाबाई या निसर्गाशी इतक्या समरस झाल्या आहेत. की, निसर्गाच्या सगळ्या प्रेरणा, ऊर्मी त्यांच्या शब्दाशब्दांतून सहज उचंबळून येतात. त्यांना काव्य लेखनासाठी वेगळी समाधी लावून बसावे लागत नाही किंवा वेगळ्या मनःस्थितीची त्यांना गरज वाटत नाही. घरात किंवा शेतात त्या नित्याची कामे करत असतात तेव्हा, किंवा निसर्गाची विविध रूपे सहज नजरेस पडतात तेव्हा त्यांच्या ओठांतून सहज कवितांच्या ओळी बाहेर पडतात. जात्यामधून धान्याचे पीठ जितके सहजगत्या बाहेर पडते, तितके सहजगत्या त्यांच्या ओठांतून शब्द बाहेर पडतात. त्यांच्या कवितेला निसर्गाचीच लय आपसूक लाभलेली आहे. जितक्या सहजतेने आपण श्वास घेतो इतक्या सहजतेने त्यांची कविता 'निर्माण होते. असे वाटते की काव्य जणू काही बहिणाबाईंच्या ओठातून बाहेर पडण्याची वाटच पाहत असते. म्हणून लेखक म्हणतात की, बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपले निघालेचे त्यांच्याबरोबर.
'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
निसर्गात प्राणी-वनस्पती सहकार्याने राहतात. त्यांच्यामध्ये हाव दिसून येत नाही. हिंस म्हटले जाणारे वाघ-सिंहसुद्धा आपले एका वेळेचे पोट भरण्यापुरतीच हिंसा करतात. पोट भरलेले असताना ते आजूबाजूला वावरणाऱ्या सशालासुद्धा हात लावत नाहीत. कधी एकदा आपण भुकेलेल्या लोकांच्या पोटात जातो, त्यांची भूक भागवतो, असे पिके, फळे यांना वाटत असते. माणूस मात्र याविरुद्ध वागताना दिसतो.
माणूस अतोनात स्वार्थी बनलेला आहे. पोट भरल्यानंतरही तो तृप्त होत नाही. त्याची हाव वाढतच जाते. स्वार्थी पणामुळे तो खोटेनाटे व्यवहार करतो. आपल्याच लोकांशी लबाडीने वागतो. सरळपणान व्यवहार करण्याऐवजी फसवणूक करण्याचा विचार करतो. या प्रवृत्तीमुळे जगभर भांडणतंटे, मारामाऱ्या, युद्ध होत आहेत. जगातला सगळा चांगुलपणा नष्ट झाला आहे. माणसे दुःखाच्या खाईत लोटली गेली आहेत. लोक आनंद उपभोगण्याऐवजी यातना भोगत आहेत.
लोकांनी चांगलेपणाने जगावे, तर सर्व मानवी समाज सुखी-आनंदी होईल. साधी गाईगुरे खाल्लेल्या चाऱ्याबद्दल दूध देतात. माणसाचा वाईटपणा पाहून बोरी-बाभळींच्या अंगावर काटे येतात. तरीही त्या माणसांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती कुंपणासारख्या उभ्या राहतात. माणसाकडे मात्र अशी कृतज्ञता नाही. खरेतर, पोट कितीही भरले, रोज रोज भरले, तरी ते रिकामे होतेच. ज्या देहाचे चोचले पुरवण्यासाठी आपण दिवसरात्र धडपडतो, तो देहसुद्धा एक दिवस नष्ट होतो. मग उरते काय? हृदयांचे देणेघेणे. शुद्ध निःस्वार्थी प्रेमाखेरीज दुसरे चांगले, उदात्त असे या जगात काही नाही. यातच माणूसपणा आहे. पण माणूस ते विसरून गेला आहे. म्हणून बहिणाबाई माणसाला आर्तपणे विनवणी करत आहेत, "हे माणसा, तुला जन्म माणसाचा मिळालेला आहे. पण तू खऱ्या अर्थाने माणूस कधी होणार?"
प्र. के. अत्रेयांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्येलिहा.
SOLUTION
'परिमळ' हा पाठ वाचल्यावर अत्रे यांच्या भाषेचा एक गुण प्रथमच ठळकपणे जाणवतो. तो म्हणजे त्यांची साधी, सोपी, सरळ भाषा. भाषेत कुठे कठीणपणा, खडबडीतपणा आढळणार नाही. ही अस्सल मराठी भाषा आहे. या पाठात कुठेही एकही कठीण शब्द आढळणार नाही. त्यांचे लेखन वाचताना कोणताही वाचक अडखळणार नाही. आपले लेखन प्रभावी व्हावे; भारदस्त, उच्च दर्जाचे वाटावे म्हणून त्यांनी कुठेही भारदस्त बोजड शब्दांचा वापर केलेला नाही. आपले लेखन लोकांना भारदस्त वाटावे, यापेक्षा आपले लेखन लोकांना कळले पाहिजे, ही त्यांची उत्कट इच्छा आहे. त्यामुळे त्यांची भाषा सर्वसामान्य 'वाचकांना सहज कळेल अशी आहे. हे त्यांचे फार मोठे सामर्थ्य आहे.
'अत्रे यांच्या लेखाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगितले पाहिजे; ते म्हणजे त्यांची भाषा ही लिहिल्यासारखी नाही, तर ती बोलल्यासारखी आहे. ते वाचकांशी संवाद साधू पाहतात. वाचकांना काही तरी सांगायचे आहे, अशी त्यांची भावना असते. यामुळे वाचकांशी एक प्रकारची जवळीक निर्माण होते. वाचकांशी संवाद साधायचा असल्याने त्यांची भाषा आपोआपच ओघवती बनते. बहिणाबाईंच्या कविता त्यांना प्रचंड आवडल्या आहेत. म्हणून ते त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा करत आहेत.
प्र. के. अत्रे यांच्या लेखनाचा आणखी एक विशेष लक्षात घ्यायला हवा. त्यासाठी सोपानदेव चौधरी यांच्याबरोबर झालेली त्यांची भेट आठवून पाहा. सोपानदेवांचा लाजाळूपणा, स्वतःच्या आईची कविता भीतभीतच वाचन दाखवणे, अत्रे यांनी कवितेची वही खसकन त्यांच्या हातातून काढून घेणे, त्यातल्या कविता अधाशीपणाने वाचणे, मग सोपानदेवांना ओरडून सांगणे या सर्व कृती मध्ये एक प्रकारचा अनौपचारिकपणा दिसून येतो. त्यामुळे अत्रे आत्मीयतेने बोलत आहेत, असे जाणवत राहते. त्यांनी बहिणाबाईंच्या कवितेचे मोठेपण जाणले आहे. पण ते त्यांनी कसे सांगितले आहे, ते मी येथे नोंदवले आहे.
बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
SOLUTION
बहिणाबाई या निरक्षर, अशिक्षित होत्या. त्यामुळे त्यांची गाणी, कविता या सामान्य दर्जाच्या, जुनाट वळणाच्या असतील, असे कोणाचे मत होऊ शकते. पण त्या तशा नाहीत. त्यांच्या कविता रचनेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक आहेत. तसेच, त्या आशयाच्या दृष्टीनेसुद्धा अत्यंत आधुनिक आहेत. त्यांचे विचार, कल्पना आधुनिक काळातल्याच आहेत. त्यांचे सर्व विचार आजच्या काळातही पूर्णपणे लागू पडतात.।
बहिणाबाईंची प्रत्येक कविता परिपूर्ण आहे. प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. कवितेचा प्रारंभ आणि शेवट यांत नाट्यात्मकता आहे. ही बाब आधुनिक आहे. कवितेच्या रचनेकडे त्यांचे खास लक्ष आहे, हे दिसून येते. कवितेतला विचार किंवा भावना फापटपसारा न लावता सांगतात. कमीत कमी आणि नेमक्या शब्दांत आपला आशय मांडतात. यासाठी फार मोठे भाषिक आणि वैचारिक कौशल्य लागते. ते बहिणाबाईंकडे पुरेपूर आहे.
आपली कविता लोकांना आवडावी; लोकांनी ती सतत गुणगुणत राहावी, यासाठी बहिणाबाई जाणीवपूर्वक कर्णमधुर शब्दांचा वापर करतात, असे दिसत नाही. आशयाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशा सोप्या सोप्यासोप्या, छोट्याछोट्या व सुंदर शब्दांची योजना त्या करतात. हेही त्या मुद्दाम करतात असे नव्हे. बहिणाबाई या निसर्गाशी व खेड्यातील समाजजीवनाशी निर्मळ मनाने समरस झाल्या आहेत. निसर्गाचे दर्शन घेत असताना, घरात, शेतात काम करीत असताना त्या गुणगुणत कविता निर्माण करतात. त्यामुळे कामातली, निसर्गातली लय त्यांच्या कवितेला मिळते. म्हणूनच त्यांच्या कवितेतले शब्द सहजगत्या अवतरतात. हे सर्व आधुनिक आहे.
अहिराणी भाषेचा उपयोग तर बहिणाबाईंच्या कवितेला एक वेगळेच अलंकार चढवतो. त्या भाषेतला सर्व गोडवा, सर्व सौंदर्य त्यांच्या कवितेला मिळते. भाषा अपरिचित म्हणून कविता अपरिचित राहत नाही. त्यांची कविता वाचता वाचता आपोआप कळत जाते; हे त्यांच्या कवितेचे फार मोठे सामर्थ्य आहे.
माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
SOLUTION
मी आता अकरावीत आहे. पण हा प्रसंग सांगत आहे, ता आहे मी नववीत असतानाचा. आम्ही पाच-सहा मित्र नेहमी एकमेकांच्या घरी अभ्यास करायला जमायचो. कधी या मित्राकडे, कधी त्या मित्राकडे. हसतखेळत आमचा अभ्यास चालायचा. त्या दिवशीचा प्रसंग मात्र मी आयुष्यभर विसरणार नाही.
एकदा आम्ही असेच आमच्या घरी अभ्यास करीत बसलो होतो. माझी आई स्वयंपाकघरात काम करीत होती. तेवढ्यात एक बाई आल्या. आल्या त्या घरातच घुसल्या. घसल्या आणि मोठमोठ्याने आरडाओरड करायला सुरुवात केली.
"अहो, काय ऐकताय की नाही? तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? वर्ष उलटून गेलं. एक रुपया तुम्ही अजून परत केला नाही. व्याजावर व्याज चढत चाललं आहे. आणि तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? दुसऱ्याचे पैसे ठेवून तुम्हांला अन्न गोड कसं लागतं? अहो, माझ्यासारखीने तर जीव दिला असता! आम्ही उपाशी राहिलो असतो. पण दुसऱ्याचे पैसे आधी दिले असते. मगच दोन घास खाल्ले असते." त्या बाई असे काहीबाही बडबडून निघून गेल्या.
हे ऐकून मी हादरूनच गेलो. पुरता गांगरून गेलो. काय करावे ते मला कळना. आमची परिस्थिती गरिबीची होती, सतत कोणा ना कोणाकडून पैसे उसने घ्यावे लागत. सतत ओढाताण होई. पण आता मित्रासमार है असे घडल्यामुळे मला लाजिरवाणे वाटले. मला मित्रांकडे बघण्याचा धीर होईना. मी टेबलावर डोके टेकले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागल. तेवढ्यात माझा मित्र विवान जवळ आला. मला जवळ घेतले. तव्हा। मात्र माझा बांधच फुटला. तेवढ्यात माझी आई बाहेर आली. म्हणाला, "बाळांनो, तुम्ही आता घरी जा. तुमचा अभ्यास होणार नाही.
मित्र उठले. कष्टी मनाने बाहेर पडले. थोड्या वेळाने विवानची आई माझ्या घरी आली. तिने मला थोपटले. आत गेली. माझ्या आईची समजूत काढली. सगळी माहिती घेतली आणि गेली. संध्याकाळी माझ्या मित्रांचे आईबाबा आमच्या घरी जमले. त्या सगळ्यांनी मिळून आमचे सगळे कर्ज फेडायचे ठरवले होते. विवानची आई म्हणाली, "आपली ही मुलं गुणी आहेत. या सगळ्यांना आयुष्यभर एकमेकांचे मित्र म्हणून जगू द्या."
.
Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free
The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.
• Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ
• Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं
• Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!
• Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके
• Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
• Chapter 2.11: वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
• Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
• Chapter 3.03: सुंदर मी होणार
• Chapter 4.01: सूत्रसंचालन
• Chapter 4.02: मुद्रितशोधन
• Chapter 4.03: अनुवाद
• Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन
• Chapter 4.05: रेडिओजॉकी
• Chapter 5.01: शब्दशक्ती
• Chapter 5.02: काव्यगुण
• Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण
• Chapter 5.04: काळ
• Chapter 5.05: शब्दभेद
.