Advertisement

Chapter 7 - ‘माणूस’ बांधूया! Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 7 - ‘माणूस’ बांधूया! Balbharati solutions for Marathi

Chapter 7 - ‘माणूस’ बांधूया! Balbharati solutions for Marathi

Chapter 7 - ‘माणूस’ बांधूया! Balbharati solutions for Marathi

Chapter 7 - ‘माणूस’ बांधूया! Balbharati solutions for Marathi


.

Chapter 7: ‘माणूस’ बांधूया!

कृती करा.

नवनिर्मितीच्या प्रेरनेची कार्ये :


SOLUTION

१)विचार करायला लावणे.

२)भूतकाळाशी धागा जोडणे.

३)भविष्याचे स्वप्न रंगवणे.

४)निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसहय होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतणे.



बिनचेहऱ्याची बडबड :


SOLUTION

१) ई-मेल

२)सेटिंग

३)एसएमएस

४)फोनवर बोलणे



'पैशानेच जगता येते,' हा जीवनाचा उद्देश असला, की मानवी व्यवहाराचे होणारे स्वरूप. :


SOLUTION

१)शिक्षण पैशासाठीच होते.

२)सजणे-धजणे, प्रेम, कलानिर्मिती,श्रद्धा, भक्ती, मंदिरे यांची दुकाने होतात.

३)दुकानातली भाषा खरेदी-विक्रीची असते.

४) तिथे 'संवाद' नसतो.



परिणाम लिहा :

कुटुंबाचा आर्थिक हव्यास वाढला-


SOLUTION

वात्सल्याचे उबदार घर भुईसपाट झाले.



माणसा-माणसांतील संवाद हरवला-


SOLUTION

ज्या पिढीने उत्कट नात्यांचे दुथडी भरलेले काठ अनुभवले, ती पिढी काठावरच फेकली गेली.



माणसं बिनचेहऱ्याने बडबडत राहिली -


SOLUTION

या बडबडीने सोबत मिळत नाही. फक्त एकाकीपण वाट्याला येते.



नव्या जगाची जीवनशैली नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी आली -


SOLUTION

मानसिक आजारांचे प्रश्न निर्माण झाले आणि ते पैशाने सोडवणे अशक्य झाले.



पाठाच्या आधारे करणे लिहा.

सत्तरपंच्याहत्तरीची मनं कातर झाली;


SOLUTION

समाजाची पडझड आणखी किती खाली खाली जाणार या विचाराचा भुंगा त्यांचे मन पोखरत आहे.



यंत्रसंवाद करून चालणार नाही;


SOLUTION

यंत्रसंवादामुळे विनाश हाच विकास असा नियम निर्माण होईल.


पाठात आलेल्या खलील शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करा.

वात्सल्याचे उबदार घर :


SOLUTION

वात्सल्याचे उबदार घर : आई-वडील आणि मुले यांच्यात

असलेले प्रेमाचे नाते.



धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय :


SOLUTION

धावणारी तरुण चाकं, थरथरणारे म्हातारे पाय: पैसे कमावण्याच्या मागे सुसाट चाललेले तरुण  आणि त्यांचा आधार, त्यांचे प्रेम मिळत नसल्यामुळे त्यांचे आई-वडील म्हणजेच अशी सगळी  म्हातारी माणसे हतबल झालेली आहेत.



संवेदनांचे निरोप समारंभ :


SOLUTION

संवेदनांचे निरोप समारंभ : संवेदनांचा त्याग केला जात असल्याचे प्रसंग.



खालील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

मन कातर होणे.


SOLUTION

मन कातर होणे मन बेचैन होणे.

वाक्य : पुरात सदाशिवचे घर वाहन गेले हे कळताच माझे मन कातर झाले.



काळजात क्रंदन होणे.


SOLUTION

काळजात क्रंदन होणे हृदयात आक्रोश दाटणे.

वाक्य : दुष्काळाने गावाची वाताहत होते तेव्हा काळजात कुन्दन होते.



संवेदनशून्य’ शब्दांसारखे नकारार्थी भावदर्शक चार शब्द लिहा.


SOLUTION

(१) भावशून्य

(२) मूल्यहीन

(३) अगतिक

(४) अधिकार शून्य



अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थबदल न करता वाक्ये पुन्हा लिहा.

नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही.


SOLUTION

जुन्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत होती.



माणसा-माणसांत संवाद हवा.


SOLUTION

माणसा-माणसांत विसंवाद नको.



मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो.


SOLUTION

मनुष्य हा द्वेषाच्या आधारावर जगू शकत नाही.



पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे’, हे विधान पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


SOLUTION

 मी आता अकरावीत आहे. जेथे जातो तिथे बारावीनंतर काय करणार? इंजिनीअर व्हायचंय की डॉक्टर व्हायचंय, हे प्रश्न पुढे येतात आणि मग चर्चा सुरू होते. कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला की नंतर काय काय घडते, कुठे नोकरी मिळते, कितीचे पॅकेज मिळते वरगैरे मुद्द्यांपर्यंत चर्चा रंगते.

अनेकदा मलाही या चर्चेत आनंद मिळायचा. वाटायचे की, खूप खूप शिकेन. मग काय अन्वयदादासारखा इंजिनीअर होईन. मोठा पगार मिळेल! त्याच्यासारखी बाईक घेईन! विचार करता करता माझ्या। डोळ्यांसमोर आजूबाजूचे नोकरी करू लागलेले चेहरे येऊ लागले आणि मला वेगळेच जाणवू लागले.

अन्वयदादा सकाळी साडेसात वाजता घरी सोडतो आणि रात्री साडेआठ-नऊ वाजता घरी येतो. आल्यानंतर पूर्ण थकून गेलेला असतो. जेवण झाले की लॅपटॉप काढतो. तास-दीड तास ऑफिसचे काम करतो आणि झोपी जातो. हेच अभिषेकचेही चालू आहे. तो तर कधी कधी उशीर झाल्यावर ऑफिसमध्येच राहतो. विकासला नोकरी लागली, तीच बंगलोरच्या ऑफिसमध्ये. जवळजवळ सगळ्यांचीच ही गत झाली आहे. कोणालाही इतरांकडे जाण्यासाठी वेळ नाही. बोलण्यासाठी वेळ नाही. समोरासमोर दिसल्यावर एकमेकाला फक्त हाय करतात ; बाकी संवाद नाही. हे घरातही कोणाशी बोलत नाहीत. यांना कामाचा ताण असणार, त्यांना अधिक त्रास व्हायला नको, म्हणून मग घरातले लोक त्यांना प्रश्न विचारत नाहीत. प्रत्येक घरात आपापसांत फक्त शांतता आहे.

मला कधी कधी वाटते की, खूप अभ्यास करायचा, खूप शिकायचे ते यासाठीच का? जगायचे म्हणजे नेमके काय करायचे? फक्त पैसा मिळवायचा? तो कशासाठी? कारण पैसा मिळवल्यानंतरसुद्धा माझ्या आजूबाजूचे लोक दुःखी कसे दिसतात? आपण लक्षात घेतले पाहिजे की, पैसा हे फक्त साधन आहे. म्हणून ठरावीक टप्प्यानंतर पैशाची किंमत शून्य होते. आता आपला दृष्टिकोन बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे.



'मानवी जीवनात संवादाचे महत्त्व' याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.


SOLUTION

 जागतिकीकरणाच्या परिणामामुळे मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी असलेला माणूस तिथून परिघावर फेकला गेला आहे. आता पैसा आणि पैशाने मिळणारी सगळी सुखे जीवनाच्या केंद्रस्थानी आली आहेत, पैसा मिळाला की माणूस सुखी होती, पैशामध्येच सगळी पुणे दडलेली आहेत, त्यामुळे पैसा मिळवणे हेच साच्च ध्येय बनले आहे, माया, प्रेम, वात्सल्य या भावनांना आता स्थान राहिले नाही, या परिस्थितीमुळे मानवी जीवनाला कोरडेपणा आला आहे. संवेदनशीलता संपली आहे, केवळ औपचारिकपणा, कृत्रिमपणा यनी भावनांची जागा घेतली आहे, हे आता सर्वच क्षेत्रात दिसू लागले आहे, यामुळे मानवी जीवनातला जिवंतपणा संपला आहे, ओलावा नाहीसा । झाला आहे. माणसाचे खरे जीवन है या भावनेच्या ओलाव्यात असते. तेच संपले तर मग तो माणसाचा अंत ठरेल, माणूस पशुपातळीवर येईल.

याचे भीषण परिणाम वैयक्तिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर होत आहेत. सर्वत्र उपयुक्तता भरली आहे. जे जे उपयुक्त ते ते चांगले, सर्वश्रेष्ठ होय, हीच आता सर्वांची धारणा झाली आहे, घरातली नाती संपली, वृद्ध माणसे निरुपयोगी ठरली. तरुण आणि वृध एकमेकांना दुरावले, वृद्धांचा आधार गेला, भावनिक आधारही उरला नाही. याचा कुटुंबसंस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. बालकांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. बालकांच्या गरजा फक्त पैशाने 'भागवल्या की कार्य संपले असे तरुणांना वाटू लागले आहे, आता मुलांना आई-बाबांचा उबदार स्पर्श मिळेनासा झाला आहे. या परिस्थितीतून जी माणसे तयार होतील, ती माणसे नसतील. ती जनावरे असतील. आणि हा माणसाचा अंत असेल, यातून सावरायचे असेल तर माणसांमध्ये संवाद पुन्हा प्रस्थापित व्हायला हवा, संवेदनशील संवादानेच मानवी मने पुन्हा जिवंत होतील. संवादाचे है महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे.



नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही’, लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत, ते सकारण स्पष्ट करा.


SOLUTION

आमच्या शेजारी विलास नावाचा माझा एक मित्र आहे. तो इंजिनीअर झाला. त्याला इंग्रजी उत्तम येत होते. त्याला परीक्षा संपताच ताबडतोब नोकरी मिळाली. पगार पण तुलनेने चांगला होता. त्याला ऑफिसला नेण्यासाठी रोज गाडी यायची आणि गाडीतून त्याला घरी पोहोचवले जायचे. घराचे सगळे खूश होते. स्वतः विलाससुद्धा खूश होता. कमतरता फक्त एकाच गोष्टीची होती. त्याची नोकरी रात्रपाळीची होती. सुरुवातीला काही दिवस आनंदात गेले. पण थोड्याच दिवसांत परिणाम दिसू लागले. तो दिवसभर झोपून राहू लागला. त्याचा चेहरा निस्तेज दिसू लागला. उठला की कंटाळलेल्या, दुर्मुखलेल्या अवस्थेत नुसता बसून राहायचा. कोणत्याही प्रकारचे चैतन्य त्याच्या चेहऱ्यावर दिसेनासे झाले. त्यात आणखी एक वेगळीच भर पडली. ऑफिसात रात्रीच्या पार्टी होऊ लागल्या. त्यामुळे त्याला दारू-सिगरेटचे व्यसन जडले. आईवडिलांच्या तोंडचे पाणीच पळाले. नवीन प्रकारच्या कार्यालयीन सवयीने एक वेगळी जीवनशैली घडत होती. त्या वेगळ्या जीवनशैलीचा एक नमुना झाला. असे विविध नमुने आजूबाजूला दिसत आहेत. आणि शेकडो तरुण या नव्या जीवनशैलीला बळी पडत आहेत, हे चित्र निराशाजनक आणि अतिशयोक्तिपूर्ण वाटणे शक्य आहे. पण हे एका तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्या अनुभवातून मांडलेले चित्र आहे.

अशी भीषण परिस्थिती पाहिली की वाटते आपण नेमके काय कमावले? हा जागतिकीकरणाचा परिणाम आहे. त्याचे अनेक फायदे असतील. नव्हे आहेतच. पण दुसऱ्या बाजूने घडत असलेली ही पडझड संपूर्ण माणुसकीलाच नष्ट करणारी आहे. नव्या परिस्थितीतून एक वेगळीच मूल्यव्यवस्था निर्माण होत आहे. यात केवळ पैशाला प्राधान्य आहे. पैसा श्रेष्ठ आहे. पैशानेच सर्व काही मिळते. पैसा नसेल तर आपण शून्य आहोत. या त-हेची विचारसरणी आता सार्वत्रिक होत आहे.

माणसामाणसांमध्ये भावनांचे हृदय स्वरूप आता दिसेनासे होऊ लागले आहे. शेजारीपाजारी, मित्रमंडळी यांच्यातील नाते आता उपयोगापुरते शिल्लक राहिले आहे. एक विचित्र गोष्ट घडत आहे. इथे नोकरी करणाऱ्यांना नोकरी सोडण्याचे एवढे स्वातंत्र्य आहे की, वर्षभरात तरुण भराभर नोकरी सोडतात. या परिस्थितीमुळे आपले काम, आपली कंपनी, आपली संस्था यांच्याबद्दल कोणतीही निष्ठा शिल्लक राहिलेली नाही. कोणत्याही मूल्यावर निष्ठा राहिलेली नाही. माणसावर निष्ठा राहिलेली नाही. व्यवस्थेवर सुद्धा निष्ठा राहिलेली नाही. माणूस पालापाचोळ्यासारखा भिरभिरत आहे.

हे मानवी जीवन नव्हे. हा मानवी जीवनाचा -हास आहे. यातून निर्माण झालेल्या ताणांमुळे मानसिक आजार जडत आहेत. अखंड पिढीच्या पिढी जर अशी आजारग्रस्त झाली तर भीषण अवस्था निर्माण होईल. म्हणून नव्या जीवनशैलीत काहीतरी बदल करणे आवश्यक आहे



‘इथे माणूस ‘दिसत’ होता, पण ‘जाणवत’ नव्हता. ओठ हालत होते, पण साद पोहोचत नव्हती’, या विधानांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.


SOLUTION

जागतिकीकरणाचे अनेक परिणाम घडत आहेत, त्यांतला एक परिणाम म्हणजे पराकोटीची स्पर्धा, माणसाला पैसा मिळवण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेत उतरावे लागत आहे. त्यातूनच, पैसा हेच एकमेव साध्य बनून गेले आहे. स्पर्धेमुळे मार्केटिंगचा जमाना आला, सगळ्या गोष्टी पेशाने मापल्या जाऊ लागल्या, पैशासाठी सगळ्या गोष्टी वापरल्या जाऊ लागल्या. किंबहुना, पैसा मिळवणे हाच सर्व गोष्टींचा हेतू निश्चित होऊ लागला. हे सुद्धा इतके भरभर आणि धबधबा प्रमाणे इतक्या जोराने येऊन आदळले की, माणसांना विचार करायचीसुद्धा संधी मिळाली नाही.

शिक्षण हे आपल्याकडे अत्यंत पवित्र क्षेत्र मानले जात होते. 'ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जे देते ते शिक्षण, अशी आपली समजूत होती. शिक्षणाचा हा उदात्त हेतू संपुष्टात आला. शिक्षण हेसुद्धा पैशासाठी घ्यायचे असते, पैशा च्या साहाय्याने घ्यायचे असते, ही धारणा घट्ट झाली, शिक्षणाला बाजारी रूप आले.

याचा सर्वव्यापी परिणाम घडून आला. घर, आईवडील, माणसे यांच्यामधली नातीसुद्धा उपयुक्ततेच्या पातळीवर आली. जे उपयुक्त ते आणि तेवढेच चांगले होय, हा दृष्टिकोन निर्माण झाला. घरांच्या ठिकाणी चकचकीत फ्लॅट आले. माणसामाणसांमधील मानवी संबंध नष्ट झाले. आईवडिलांनी स्वत:चे सर्वस्व ओतून मुलांना वाढवले. पण त्याबद्दलची कोणतीही जाणीव मुलांमध्ये शिल्लक राहिली नाही. स्पर्धेने त्यांना इतके करकचून आवळून टाकले की, ते आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांनासुद्धा वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्याशी आपुलकीने दोन शब्द बोलणेही अवघड झाले. यात पराकोटीची औपचारिकता आली. कृत्रिम त निर्माण झाली. माणसे यांत्रिकपणे वावरू लागली. म्हणूनच लेखक म्हणतात की, माणूस 'दिसतो' पण 'जाणवत' नाही. ओठ हलताना दिसतात, पण साद पोहोचत नाही.



संवादाचा अभाव असलेल्या मानवी जीवनाचे 'भार्कीन तुमच्या शब्दांत व्यक्त करा,


SOLUTION

संवादाचा अभाव निर्माण झाल्यामुळे मानवी समाज ज्या स्थितीकडे वाटचाल करीत आहे, त्या स्थितीचे विदारक चित्र लेखकनी) येथे सूचित केले आहे.पोटासाठी माणसांना वणवण हिंडावे लागते, है सत्य आहे, पण यातून निर्माण होऊ घातलेली परिस्थिती भीषण आहे. खूप शिकल्यावर माणूस 'भव्यदिव्य स्वप्ने घेऊन देशांतर करतो, तो देश, तो परिसर, तिकडची जीवनशैली त्याचा आवडता सुद्धा, पण स्वतःची माणसे, स्वतःचा समाज आणि स्वतःचा देश यांच्या आठवणीनी त्याचे मन पोखरले जाते, काही काळ ही माणसे कुढत राहतात आणि हळूहळू आपल्या माणसांना दुरावतात.

एखादे वडील आठ-आठ, दहा-दहा महिने दौऱ्यावर असतात. आई कामावर जाते. मुले एकाकी वाढतात. काहींची फारच दुर्दैवी स्थिती असते. नवरा एका देशात. बायको एका देशात. वर्षातून एक-दोनदा भेटतात. मूल एक तर आईकडे किंवा वडिलांकडे. किंवा भारतात आजी आजोबांकडे. कशी जगत असतील ही माणसे? पण हे घडू लागले आहे. जीवघेण्या स्पर्धेत माणसे इतस्ततः फेकली जात आहेत. या एकटेपणातून, एकाकीपणातून अनेकांना मानसिक आजार जडत आहेत. आत्ता आत्ता परिस्थिती अशी आहे की काही मुले एकल पालकांकडे राहतात. म्हणजे एक तर आईकडे किंवा वडिलांकडे. यापुढे स्थिती अशी दिसत आहे की कुटुंबच मुळी एका माणसाचे बनणार आहे. ही मानवजातीच्या अंताची धोकादायक घंटा आहे. संवादाच्या अभावामुळे ही अशी भयावह परिस्थिती येऊ घातली आहे.

.

Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free

The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.


 • Chapter 1.01: मामू

 • Chapter 1.02: प्राणसई

 • Chapter 1.03: अशी पुस्तकं

 • Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ

 • Chapter 1.05: परिमळ

 • Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं

 • Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!

 • Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके

 • Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

 • Chapter 2.1: शब्द

 • Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

 • Chapter 2.12: पैंजण

 • Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

 • Chapter 3.01: हसवाफसवी

 • Chapter 3.02: ध्यानीमनी

 • Chapter 3.03: सुंदर मी होणार

 • Chapter 4.01: सूत्रसंचालन

 • Chapter 4.02: मुद्रितशोधन

 • Chapter 4.03: अनुवाद

 • Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

 • Chapter 4.05: रेडिओजॉकी

 • Chapter 5.01: शब्दशक्ती

 • Chapter 5.02: काव्यगुण

 • Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण

 • Chapter 5.04: काळ

 • Chapter 5.05: शब्दभेद


.