Chapter 8: ऐसीं अक्षरें रसिके
कृती करा:
संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्ये
SOLUTION
(१) अमृताशी पैजा जिंकणारी
(२) रसाळ
(३) कोवळिकता
(४) सुगंधित
रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा :
SOLUTION
‘रसाळ बोल’ आणि ‘सूर्य’ यांच्या कार्याच्या माध्यमातून खालील तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
अर्थ स्पष्ट करा.
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।
SOLUTION
माझा मराठीचा बोल (शब्द) मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली, तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल. कारण अमृता पेक्षा माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे.
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
SOLUTION
माझ्या मराठी शब्दांची इतकी कोमलता आहे की, त्यातून फुलासारखा सुगंध येतो. हा सुगंध असा आहे की, प्रत्यक्ष फुलातल्या सुगंधाचे बळ त्याच्यापुढे तोकडे पडते. इतकी माझी मराठी भाषा गंधित आहे.
चौकटी पूर्ण करा.
रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा _______
SOLUTION
श्रवणाच्या जिभा होतात
रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम _______
SOLUTION
इंद्रियांत भांडण लागते
सर्व जगाला जागवणारा _______
SOLUTION
सहस्रकर (सूर्य)
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।३।।
SOLUTION
'ऐसी अक्षरें रसिकें' या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. मराठी भाषेचे सौंदर्य व गोडवा सांगताना ते म्हणतात की मराठी भाषा ही अमृतापेक्षा गोड व मधुर आहे. ।
प्रस्तुत ओवी मध्ये संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे. ते म्हणतात की, माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की तिच्या रसाळपणाच्या मोहाने कानालाही जिभा फुटतात. म्हणजे कानाला ती जिभेप्रमाणे आस्वादावीशी वाटते. एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा स्वत: आस्वादावीशी वाटते, यासाठी सर्व अवयवांमध्ये व पंचेंद्रियांमध्ये प्रेमळ भांडण जुंपले आहे. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा आपलीशी वाटते. ।
प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवाद्वितीय ठरवली आहे.
"तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥ २ ॥
SOLUTION
संत ज्ञानेश्वर यांनी 'ऐसी अक्षरें रसिकें' या ओव्यांमध्ये मराठी भाषेची थोरवी भावपूर्ण शब्दांत व्यक्त केली आहे. सर्व इंद्रियांना हवीहवीशी वाटणारी माझ्या मराठी भाषेची गोडी जाणकार रसज्ञांना कशी भावते, याचे यथोचित वर्णन उपरोक्त ओवीमध्ये त्यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर मराठी भाषेची महती सांगताना म्हणतात- सूर्य जसा चराचराला उजळून टाकतो तशी मराठी भाषेला बिलगणाऱ्या सर्व अवयवांना ती उत्तम प्रकारे समाधान देते. असे मराठी शब्दांचे विस्तारलेपण, अथांगपण असामान्य असे आहे. चिंतामणी हे रत्न जसे सर्व माणसांची मनोइच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहे, तसे मराठी बोल हे सर्व रसिकज्ञांना व जाणकारांना मनोमन भारतात. 'भावज्ञांना मराठी भाषेत चिंतामणी चे सगुण सापडतात.
मराठी शब्दांच्या व्यापकपणाची व अर्थ सघनतेची यथोचित महती सांगताना संत ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेविषयीचा दृढ व प्रगाढ आत्मविश्वास या ओवी मध्ये प्रत्ययास येतो.
‘मराठी भाषेची थोरवी’ तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
'मराठी असे आमुची मायबोली.' माझी मातृभाषा 'मराठी' मराठी रसिकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी तितकी थोडीच आहे ! मराठी भाषेच्या समृद्धीचा मी एक नम्र पाईक आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, कवी केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींनी तिला शब्दलेण्यांनी साकारलेली आहे. मराठी भाषेतील रसपूर्ण,
भावपूर्ण, रसमय ललित साहित्य ही महाराष्ट्राची वाङ्मयीन पेठ आहे. संत, पंत आणि तंत परंपरेने तिला नटवलेली आहे. इतर कलांनी तिला सजवलेली आहे. मराठीचे शब्दभांडार अभिजात आहे. मराठी बोलीभाषेचे
ठिकठिकाणच्या प्रदेशांतील झरे प्रमाण मराठीच्या नदीत मिसळून मराठी गंगा अविरत वाहते आहे व काठांवरील लोकसंस्कृतीला जगवते आहे. मराठी भाषेतील लोकगीते व बोधकथा ही मराठी संस्कृतीची प्राचीन रसमय अमृताची ठेव जतन करण्याचे आमचे कर्तव्य आहे.
'माझा मराठीचा बोल
वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे
निळ्या अमृताची ओल'
प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलेल्या ओळींमधून मराठी भाषेचा
सार्थ अभिमान अधोरेखित होतो.
ऐसीं अक्षरें रसिकें’ या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
मराठी भाषेचा गौरव करताना व शब्दांची महती सांगताना संत
ज्ञानेश्वर म्हणतात.
कौतकास्पद असलेला माझा मराठीचा बोल (शब्द) अमृताशीही
पैज जिंकणारा आहे. अशी रसाळ अक्षरे मी मराठीत निर्माण करीन. ||१||
या शब्दांची कोमलता इतकी आहे की त्यांच्यापुढे संगीताचे रंगही
फिके पडतात. माझ्या शब्दांना इतका गंध आहे की त्यापुढे (फुलांच्या)
सुगंधाचेही बळ तोकडे पडते, सुगंधाचेही गर्वहरण होते. ।। २ ।।
मराठी भाषेच्या रसाळपणाचा इतका मोह होतो की, कानांना जिभा
फुटतात. श्रवणाला स्वाद येतो. शरीराचे सर्व अवयव (इंद्रिये)
एकमेकांशी भांडू लागतात. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा केवळ
आपलीच आहे, असे वाटू लागते. ।। ३ ।।
खरे म्हणजे, शब्द हा श्रवणाचा (ऐकण्याचा) विषय आहे. परंतु
जीभ म्हणते की, तो रस (शब्द) माझा आहे. मला आस्वादायचा
आहे. नाकाला तर शब्दांचा सुगंध येऊ लागतो. त्यामुळे नाक म्हणते
शब्द हा माझा विषय आहे.।४ ।
या रेखेच्या वाहणीचे (शब्दांचे) नवल असे की हे शब्दचित्र पाहून
डोळ्यांची तृप्ती होते. डोळ्यांचे पारणे फिटते. डोळे म्हणतात की
आमच्यासाठीच हे सौंदर्याचे भांडार खुले केले आहे.।। ५ ।।
जेव्हा संपूर्ण सार्थ शब्द उभा ठाकतो, तेव्हा मन त्याला
आस्वादण्यासाठी शरीराबाहेर झेप घेते आणि हात त्याला मिठीत
घ्यायला पुढे सरसावतात. हातांना आलिंगन दयावेसे वाटते. ।। ६ ।।
अशा प्रकारे सर्व इंद्रिये आपापल्या परीने शब्दाला बिलगतात आणि
'शब्दही उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतो. ज्याप्रमाणे एकटा
सूर्य चराचराला उजळतो.।।७।।
त्याप्रमाणे माझ्या मराठी शब्दाचे असामान्य, अलौकिक असे
व्यापकपण, विस्तार, अफाटपणा आहे. जाणकार रसिक लोकांना तर
मराठी भाषा ही हरएक इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणी सारखी भावते,
पसंतीस येते. ।। ८ ।।
हे असो. तर मी या मराठी शब्दांची शिगोशीग ताटे भरली आहेत.
त्यावर कैवल्यरस वाढला आहे. अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी
मी तयार केली आहे.।।९।।
आता या नित्य नूतन आत्मप्रकाशाची समई (दीपज्योती) मी तेवत
'ठेवली आहे. मराठी भाषेची ही अक्षय संपदा जो इंद्रियातीत, इंद्रियांच्या
पलीकडे जाऊन नि:संगपणे आस्वादेल, त्यालाच ती प्राप्त
होईल.।।१०।।
आता श्रोतेहो एक गोष्ट करा, मी निरूपण करीत असलेली मराठी
भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन मनाने आत्मरत होऊन
आस्वादा. (हा कैवलरस मोदक तुम्ही मनाने अनुभव.)।। ११ ।।
.
Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free
The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.
• Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ
• Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं
• Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!
• Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके
• Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
• Chapter 2.11: वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
• Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
• Chapter 3.03: सुंदर मी होणार
• Chapter 4.01: सूत्रसंचालन
• Chapter 4.02: मुद्रितशोधन
• Chapter 4.03: अनुवाद
• Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन
• Chapter 4.05: रेडिओजॉकी
• Chapter 5.01: शब्दशक्ती
• Chapter 5.02: काव्यगुण
• Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण
• Chapter 5.04: काळ
• Chapter 5.05: शब्दभेद
.