Advertisement

Chapter 2 - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 2 - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for Marathi

Chapter 2 - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for Marathi

Chapter 2 - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for Marathi

Chapter 2 - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for Marathi

Chapter 2 - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for Marathi

Chapter 2 - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for Marathi

Chapter 2 - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for Marathi

Chapter 2 - वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला Balbharati solutions for Marathi




Chapter 9: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

कृती करा.

निशाताईंच्या सल्ल्याचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची अवस्था


SOLUTION

१)प्रदीर्घ शांततेनंतर कोणीतरी एकीने टाळ्या वाजवल्या.

२)बाकीच्यांनीही टाळ्या वाजवून आपले सहमत दर्शवले.

३)एखादं थरार नाट्य पाहावे,तसे प्रेक्षक खुर्चीला खिळले होते.

४)श्वास रोधून आणि वृत्ती एकाग्र करून ते कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते.


कारणे लिहा.

उषाताईंचा हा कार्यक्रम शेवटचा होता, कारण____


SOLUTION

उषाताईंचा हा शेवटचा कार्यक्रम होता; कारण त्या दिवशी त्या निवृत्त होणार होत्या.



निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला, कारण ______


SOLUTION

निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला; कारण- तिला वहिनींची भूमिका सराईतपणे  करायची होती.



महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण ______


SOLUTION

महिला प्रेक्षकांत अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट आली;कारण आजच्या कार्यक्रमाला उषा वहिनी  जन्मभर लक्षात राहील अशी साडी नेसून येणार, अशी महिलांची अपेक्षा होती; परंतु त्या आज अगदी साधी, सुती साडी नेसून आल्या होत्या.



मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण ____________


SOLUTION

मुंबईत आलेल्या पाहुण्यांची पंचाईत होते; कारण – मुंबईत बऱ्याच स्त्रिया नोकरी करू लागल्यामुळे पाहुण्यांची सरबराई करायला घरात रिकामी बाई नसते.



वैशिष्ट्येलिहा.

दूरदर्शनवरील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


SOLUTION

रदर्शनवरील वहिनींचा सल्ला हा कार्यक्रम : उषावहिनींचे व्यक्तिमत्त्व शांत व सौम्य असे होते. त्या समतोल असे सल्ले द्या यांच्या. 'जोड्या, जुळवा, जमवून घ्या, इतरांच्या नजरेतून बघायला शिका' हेच सूत्र त्यांनी अवलंबिले होते.



शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


SOLUTION

'शिवाजी मंदिर ' येथील 'वहिनींचा सल्ला' हा कार्यक्रम शिवाजी:मंदिर येथील कार्यक्रमामध्ये निशा ही वहिनींच्या जागी उभी होती. ती सडेतोड विचारांची होती. तिला अन्याय खपत नसे. समानतेचा पुरस्कार करणारी होती. स्वतःच्या मनाचा कौल घ्या. स्वतःला स्वत:च महत्त्व दया. आत्मसन्मान जपा. तिचे विचार धक्कादायक होते, पण मनाला भिडणारे होते.



फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.

उषावहिनींचा सल्ल

निशावहिनींचा सल्ल

 

 

 

 

 

 



SOLUTION

उषावहिनींचा सल्ला

निशावहिनींचा सल्ला

१. शांत, संयमी, समतोल सल्ले.

१. स्वतःच्या मनाची कल घ्या.

२. जोडा आणि जुळवून घ्या.

२. स्वतःच स्वतःला महत्त्व दया, आत्मसन्मान जपा.

३. इतरांच्या नजरेतून बघायला शिका, ही शिकवणूक.

३. समानतेचा आग्रह धरणारे, सडेतोड, म्हणून धक्का-दायक, तरीही मनाला भिडणारे विचार.



पाठातील खालील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

रंगीबेरंगी पोकळ बुडबुड्यांचा आजचा अंतिम दिवस.


SOLUTION

दिलेले सल्ले निरर्थक होते: पण अत्यंत योग्य सल्ले दिल्याचा आभास निर्माण केला होता.



मी माणसांना दुःखप्रूफ किंवा दुःखमुक्त होण्यासाठी मदत करते.


SOLUTION

माणसांच्या दुःखाचे खरे कारण समजावून सांगणे हे माझे काम आहे, असे निशा समजावून सांगत आहे.



इतर घरांत नोकरीवाली बाई हे वॉटरप्रूफींग केलेलं असल्यामुळे आमच्या घरी पाहुण्यांचा जोरदार मारा!


SOLUTION

नोकरी न करणारी बाई ही जणू रिकामटेकडी असते. त्यामुळे पाहुण्यांची सरबराई करायला ती जणू मोकळीच असते. घरकामाविषयी आत्यंतिक चुकीचा दृष्टिकोन मनात बाळगल्यामुळे अशी धारणा निर्माण होते.


'कीड मुळापासून उपटून काढली पाहिजे, तरच झाड जगेल'


SOLUTION

घरकाम, पाहुण्यांची सरबराई ही जणू स्त्रियांचीच कामे होत, असा चुकीचा दृष्टिकोन प्रस्थापित झालेला होता. ही मूळ कीड आहे. तीच नष्ट केली पाहिजे. तर मग संघर्षाचे किंवा स्त्रियांना कमी लेखण्याचे, त्यांच्या कामाला किंमत न देण्याचे कृत्य समाजाकडून होणार नाही.



विशेष्य-विशेषणांच्या जोड्या पाठाधारे जुळवा.

कडूगोड, थेट, अभूतपूर्व, जीवघेणी, अंजन, केरळ,फावला, प्रक्षेपण, असहकार,आठवणी, पोकळ, कार्यक्रम, वेळ, पुळका

 

विशेष्ये

विशेषणे

















SOLUTION

विशेष्ये

विशेषणे

(१)आठवणी

(१) कडूगोड

(२) प्रक्षेपण

(२) थेट

(३) कार्यक्रम

(३) अभूतपूर्व

(४) कळ

(४) जीवघेणी

(५)अंजन

(५) असहकार

(६) वेळ

(६) फावला

(७)पुळका

(७) पोकळ



केवल वाक्ये, मिश्र वाक्ये आणि संयुक्त वाक्येयांची पाठातील प्रत्येकी दोन-दोन उदाहरणे शोधून लिहा.


SOLUTION

केवल वाक्य

(१) हात उंचावून त्यांनी झटकत दांडीवस्चा रूमाल खेचला.

(२) शेवटची नजर टाकूत त्यांनी पर्समध्ये सर्व गोष्टी आहेत ना ते पाहिली.

मिश्र वाक्य:

(१) सर संसारथ नीट चालायला हवा असेल, तर दोन्ही चाकांची सारखीच शक्ती वापरात यायला हवी.

(२) एक चाक थोडंस कुचकामी असेल, तर दुसऱ्या चाकाने आपल्यावर जास्त भार द्यावा.

संयुक्त वाक्य:

(१) निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि उपा वहिनीच्या भूमिकेत स्वत:ला सराईतपणे झोकून दिलं.

(२) घरी जा आणि एक छान साडी नेस.



खालील विरामचिन्हांची नावे कंसातील यादीतून शोधून लिहा.

(अपूर्णविराम, संयोगचिन्ह, अर्धविराम, अपसारणचिन्ह, लोपचिन्ह)

विरामचिन्हे -

नावे

;

 

.......

 

 

:

 

-

 



SOLUTION

विरामचिन्हे -

नावे

;

अर्धविराम

.......

लोपचिन्ह

अपसारणचिन्ह

:

अपूर्णविराम

-

संयोगचिन्ह



खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

काजवे चमकणे-


SOLUTION

अर्थ : डोळ्यांसमोर क्षणभर लख्ख प्रकाश चमकून कळेनासे होणे.

वाक्य : रघूने पोहण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा विहिरीत उडी मारली, तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले.



डोळे लकाकणे -


SOLUTION

अर्थ : पटकन एखादा विचार सुचणे.

वाक्य : सरांनी प्रश्न विचारताच मधूचे डोळे लकाकले.



कायापालट होणे-


SOLUTION

अर्थ : आमूलाग्र बदल होणे.

वाक्य : विपश्यनेहून परत आल्यावर माधवचा कायापालट झाला.


कडेलोट होणे -


SOLUTION

अर्थ : (भावनेने) उचंबळून टोकाचा विचार मनात येणे.

वाक्य : न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळते, असे समजताच गोपूचा कडेलोट झाला.



खालील शब्दांचे वर्गीकरण करा.

वळूनवळून, रेनकोटबिनकोट, पुटपुट, अभिवाचन, सामाजिक

उपसर्गघटित शब्

प्रत्ययघटित शब्

पूर्णाभ्यस्त शब्

अंशाभ्यस्त शब्

अनुकरणवाचक शब्

 

 

 

 

 



SOLUTION

उपसर्गघटित शब्

प्रत्ययघटित शब्

पूर्णाभ्यस्त शब्

अंशाभ्यस्त शब्

अनुकरणवाचक शब्

अभिवाचन

सामाजिक

वाळूनवळून

रेनकोटबिनकोट

पुटपुट



वहिनींचा सल्ला 'सुसाट' वाटण्याची तुम्हांला समजलेली कारणे लिहा.


SOLUTION

ही कारणे लिहिण्यापूर्वी त्या वेळची परिस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्या काळात घरातली सर्व कामे स्त्रियांनीच करायची, असा नियम होता. पुरुष या कामांना हात लावत नसे. पुरुषाच्या पेन, पाकीट, रुमाल या साध्या वस्तूसुद्धा स्त्रीनेच नीट ठेवायच्या आणि पुरुषांना हव्या त्या वेळी त्यांच्या हाती दयायचा. पाहणे सुद्धा केव्हाही येत. घरातल्या स्त्रीने आलेल्या पाहुण्यांची सर्व सरबराई करावी, त्या वेळी स्वतःची सोय व गैरसोय पाहू नये, असा रिवाज होता. घरातील स्त्री कोणत्या तरी कामासाठी बाहेर पडत असतानाच पाहुणे आले तर बाहेर जाणे रद्द केले पाहिजे, असे सगळेजण मानत होते. अशा वेळी त्या स्त्रीचे कितीही नुकसान झाले, तिला अडीअडचणी आल्या, ती काही सुखाला मुकली तरी तिने पाहुण्यांची सरबराई केली पाहिजे, असा दंडक होता.

या पार्श्वभूमीवर निशावहिनींचा सल्ला पाहिला पाहिजे. निशावहिनी सांगतात की, प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. मग फक्त स्त्रीनेच का म्हणून इतरांच्या सुखासाठी झटत राहावे? स्त्रीने स्वतःच स्वतःचे सुख पाहिले पाहिजे. स्वतःच्या गरजा पाहिल्या पाहिजेत. नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी जशी पत्नी सांभाळते, तशा पत्नीच्या गोष्टी पतीने का सांभाळू नयेत? एखादया दिवशी पतीने स्वयंपाक करावा. पत्नीचे जेवणाचे ताट मांडावे. एखादया दिवशी पतीने पत्नीच्या साडीला इस्त्री करावी. अचानक न सांगता पाहुणे घरी आले, तर आपली कामे बाजूला ठेवू नयेत. स्वतःची गैरसोय करून घेऊ नये. म्हणजे हळूहळू पाहुण्यांनासुद्धा न कळवता अचानक कोणाहीकडे जाऊ नये, याची सवय होईल. निशावहिनींचे विचार त्या काळाच्या मानाने खूपच बंडखोरीचे होते. अनेकांना ते पटत होते, पण स्वीकारणे जड जात होते. यामुळेच निशावहिनींचे विचार सुसाट वाटतात.



'पाहुण्यांचा पाऊस यासंबंधी कथेत आलेला विनोद तुम्हाला आवडला का, ते सकारण स्पष्ट करा.


SOLUTION

 निलंजनाबाईंनी पाहुण्यांना पावसाची उपमा दिली होती. पाऊस हा कधीही, न सांगता, अगदी नको त्या वेळीसुद्धा येतो. आपली अडचण करतो. आपली कामे अडतात. पाहुणेसुद्धा असेच न सांगता केव्हाही टपकतात. ज्यांच्या घरी आपण जातो त्यांची गैरसोय होईल का, त्यांचे नुकसान होईल का, याचा ते काहीही विचार करीत नाहीत. तसेच, पाऊस किती वेळ राहावा, तो किती प्रमाणात यावा, कशा स्वरूपाचा असावा यावर आपले कोणतेही नियंत्रण नसते. त्याप्रमाणेच पाहुण्यांचेही होते. पाहुण्यांनी कधी यावे, किती जणांनी यावे, कोणत्या कामासाठी यावे यांवर घरातल्या स्त्रीचे कोणतेही नियंत्रण नसते. ती काहीही सुचवू शकत नाही. तिला सगळा त्रास निमूटपणे सहन करावा लागतो. पाहुणे आणि पाऊस यांच्यातील हे साम्य पाहून निलंजनाबाईंनी पाहुण्यांना पावसाची उपमा दिली. एवढेच नव्हे, तर तक्रार मांडताना त्यांनी पाहण्यांचा उल्लेखच केला नाही. फक्त पावसाचा उल्लेख केला.

निशावहिनीचा त्यामुळे गैरसमज झाला आणि सगळा घोटाळा झाला. त्यांनी पाऊस या शब्दाचा अर्थ शब्दश: घेतला. त्यामुळे ही काहीतरी पावसाळ्यातील पाणी गळतीची समस्या असावी, असे निशावहिनींना वाटले. प्रत्युत्तर म्हणून आपण ताडपत्रीची एजन्सी घेतलेली नाही, किंवा आपला वॉटर प्रूरफिंगशीसुद्धा काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तेव्हा हास्य निर्माण होते. सडेतोड व तडाखेबाजपणे उत्तरे देणा या निशा वहिनी सुद्धा क्षणभर गडबडल्या. हा त्या विनोदाचा परिणाम होता.



सल्ला मागण्यासाठी मांडलेल्या समस्यांविषयी तुमचे मत लिहा.


SOLUTION

शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमात प्रेक्षकांनी अनेक समस्या मांडल्या. त्यांचे स्वरूप साधारणपणे असे होते : सर्व घरकाम स्त्रीच्या अंगावर येऊन पडते. स्वत:साठी वेळ मिळत नाही. दिवसभर करीत असलेल्या कामाला कोणी किंमतही देत नाही. घरी केव्हाही, कधीही, कितीही पाहुणे येतात. आपल्यामुळे यजमान घरातल्या लोकांची किती गैरसोय होत असेल, याचे भान पाहणे बाळगत नाहीत. सासू-सुना यांच्यातील भांडणे, कार्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुष सहकाऱ्यांकडून होणारा त्रास, महाविद्यालयात शिकायला जाणाऱ्या मुलींना होणारा छेडछाडीचा त्रास, व्यसनी नवऱ्यांमुळे होणारी संसाराची वाताहत या स्वरूपाच्या बऱ्याच समस्या पुढे आल्या.

या समस्यांकडे पाहिल्यावर लक्षात येईल की, या सर्व समस्या स्त्रियांशी निगडित आहेत. या सर्व समस्या स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेल्या आहेत. स्त्रियांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने सन्मानाचे स्थान मिळत नाही. घरातली कष्टांची व वेळखाऊ कामे स्त्रियांच्याच माथी लादलेली आहेत, घरातली कामे महत्त्वाची असतातच. घरातल्या सगळ्यांनी ती पार पाडली पाहिजेत. त्या कामांबाबत सगळ्यांची समान जबाबदारी असली पाहिजे. तसे होत नाही.

सून म्हणून घरात आलेल्या नवीन मुलीला सगळे वातावरणच नवीन असते. तिच्या मनावर दडपण येईल, मोकळेपणाने वावरणे अवघड होईल, असे आपण वागता कामा नये. अजूनही अनेक सुशिक्षित लोकही स्त्रियांना कमी लेखतात. त्यामुळे उच्चपदस्थ स्त्रियांना याचा त्रास सहन करावा लागतो. छेडछाडीच्या प्रकारांबाबत तर बोलायलाच नको. यामुळे स्त्रिया सार्वजनिक वातावरणामध्ये मोकळेपणाने वावरू शकत नाहीत. याचा त्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या नोकरी-व्यवसायावर परिणाम होतो. आपण सर्वांनी या समस्येकडे गंभीरपणे बघितले पाहिजे.



खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीच्या कामाला दिलेल्या पसंतीविषयी' तुमच्या प्रतिक्रिया लिहा.


SOLUTION

खऱ्या उषावहिनींनी आपल्या बहिणीचे, निशाचे, मनापासून कौतुक केले - तेही जाहीरपणे. हे कौतुक करताना त्यांनी स्वत:मधील उणीवही मान्य केली. लोकांना बरे वाटावे, त्यांची मने दुखवू नयेत, म्हणून त्या गोड गोड बोलत राहिल्या. सामाजिकदृष्ट्या योग्य सल्ला त्यांनी दिला नाही. समाजाचे वातावरण निकोप व्हावे, स्त्रियांना सन्मानाचे जीवन मिळावे, हे त्यांना ओळखता आले नाही. ही उणीव त्यांनी मान्य केली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होय.

निशाने समाजाला क्विनाईनचा डोस दिला. क्विनाईन हे अत्यंत कडू असे औषध आहे. निशाचा सल्ला क्विनाईनसारखा होता. तिच्या सल्ल्यामध्ये सामाजिक सुधारणा करण्याची मोठी शक्ती होती. सामाजिक सुधारणा कोणताही समाज सहजासहजी मान्य करीत नाही. किंबहुना खूप विरोध करतो. अशा वेळी समाजाच्या विरुद्ध भूमिका घ्यायला फार मोठे धाडस लागते. या धाडसामुळे आपण समाजामध्ये अप्रिय होण्याची शक्यता असते. आपली प्रतिमा अप्रिय करून घ्यायला बहसंख्य लोक तयार नसतात. उषावहिनीसुद्धा असे धाडस दाखवू शकल्या नाहीत. सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी बंडखोर स्वभावाची गरज असते. असा स्वभाव निशाकडे आहे. म्हणून तिने केवळ एका दिवसाची संधी मिळताच त्या संधीचे सोने केले. आपल्यालासुद्धा समाजात काही बदल करायचे असल्यास निशासारखी भूमिका घेतली पाहिजे आणि तीसुद्धा वेळ न गमावता घेतली पाहिजे.



वहिनींचा 'सुसाट ' सल्ला ही कथा तुम्हांला का आवडते, ते लिहा.


SOLUTION

ही कथा खूपच चांगली आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती जराही कंटाळवाणी होत नाही. सुरुवातीलाच ती वाचकांच्या मनाची पकड घेते आणि ही पकड शेवटपर्यंत घट्ट राहते. कथेच्या सुरुवातीचा प्रसंगच मुळी उत्सुकता निर्माण करणारा आहे. तो अत्यंत चित्रदर्शी आहे. आपल्या डोळ्यांसमोर तो घडत आहे असे वाटत राहते. स्त्रीची मानसिकता त्या प्रसंगातून चांगल्या रितीने व्यक्त होते. त्यात प्रसंगानंतर एक-एक घटना अशी घडत जाते की, वाचकाची उत्सुकता वाढत जाते. आता पुढे काय घडेल, आता पुढे काय घडेल, असे कुतूहल त्याच्या मनात निर्माण होते. या घटकामुळे कथेची वाचनीयता कायम राहते. पुढे उषावहिनींना अपघात होतो, हा प्रसंग तर कुतूहल खूपच वाढवतो. या अपघातात मोठा पेच उभा राहतो. या पेचातून सोडवणूक करून घेण्याचे अनेक मार्ग दिस लागतात. त्यांपैकी कथेत कोणता मार्ग निवडला आहे, त्या निवडीमुळे काय काय घडेल, कोणकोणत्या व्यक्तींवर कोणकोणते परिणाम घडतील, मग त्या व्यक्ती कशा वागतील, असे कुतूहल वाढवणारे अनेक प्रश्न त्याच्या मनात उभे राहतात. कथेची रंगत वाढत जाते.

हलकीफुलकी प्रसन्न भाषा हे एक कथेचे सामर्थ्यस्थान आहे. कथेची भाषा अत्यंत प्रवाही आहे. या भाषेत कुठेही बोजडपणा नाही. निलंजनाबाईंच्या प्रसंगाच्या वेळी तर खेळकर विनोद अवतरतो आणि कथेवर हलकेच प्रसन्नता पसरते.

या कथेतील सामाजिक आशय खूप महत्त्वाचा आहे. स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हा या कथेचा आत्मा आहे. निशावहिनींनी या असमानतेवर नेमके बोट ठेवले आहे. या असमानतेतून स्त्रियांची मुक्तता करणे स्त्रियांच्याच हाती आहे, हे वास्तव निशा वहिनी बोलून दाखवतात. स्त्रियांनी आत्मसन्मान जपला पाहिजे. मग त्यांना स्वतःलाच परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागेल. या कथेतून वाचकाला असे मार्गदर्शन घडते. त्यामुळे कथा वाचताना आनंद मिळतोच, शिवाय आपला दृष्टिकोन अधिक संपन्न झाला, याचे फार मोठे समाधान वाचकाला मिळते. या कथेचे हे फार मोठे यश आहे. अशी कथा कोणालाही आवडेल.



'स्त्रीने स्वतःच्या आत्मसन्मानाला जपले पाहिजे,' याविषयीचे तुमचे विचार लिहा.


SOLUTION

आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे अनेक शतके स्त्रियांवर अन्याय होत आहे. त्यांना समाजजीवनात सन्मानाचे स्थान दिले जात नाही. या अन्यायाची सुरुवात स्त्रीच्या जन्मापासूनच होते. घरात मुलगा जन्माला आला की आनंदोत्सव साजरा केला जातो. मुलगी जन्माला आली की घरात निरुत्साह असतो. यात थोडी सुधारणा झाली आहे. नाही असे नाही. पण ती सुशिक्षितांच्या घरांत. अशिक्षितांच्या घरांत किंवा ग्रामीण भागात अजूनही मुलगी जन्माला आल्याचा आनंद साजरा होत नाही. इथपासून सुरू झालेला हा अन्याय स्त्रीच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू राहतो. कोणत्याही समाजात स्त्रियांची संख्या जवळ जवळ निम्मी असते. पुरुषप्रधानतेमुळे आपण अर्ध्या समाजावर अन्याय करीत असतो.

स्त्रियांविषयी चुकीच्या कल्पना रूढ झाल्याने हा अन्याय जोमाने चालू राहतो. स्त्रिया दुबळ्या असतात. त्यांच्यात शारीरिक क्षमता कमी असते. त्या मनानेही दुबळ्या असतात. कठीण प्रसंगांत त्या कणखरपणे वागू शकत नाहीत. त्यांच्याकडे पुरुषांएवढी बुद्धिमत्ता नसते. त्यामुळे त्या बुद्धीच्या क्षेत्रांवर प्रभाव टाकू शकत नाहीत. बुद्धीच्या क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकत नाहीत. गुंतागुंतीची, किचकट कामे त्यांना झेपत नाहीत. वगैरे वगैरे गैरसमज शतकानुशतके बाळगले जात आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सन्मानाचे स्थान मिळत नाही. ग्रामीण भागांत तर चारचौघांची बैठक चालू असताना त्या बैठकीत स्त्रीने बोलू नये, आपले मत मांडू नये, असा दंडकच असतो. स्त्रीने फक्त घरकाम, धुणी-भांडी व मुलांचे संगोपन एवढ्याच गोष्टी पाहाव्यात, अशी अपेक्षा असते. कोणत्याही बाबतीत तिचे मत विचारात घेतले जात नाही.

पूर्वी प्राधान्याने मुलग्यांनाच शाळेत पाठवले जाई. अलीकडे या परिस्थितीत थोडीशी सुधारणा झालेली आहे. दहावीपर्यंत तरी मुलींना आडकाठी केली जात नाही. पण अजूनही उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत मुलींच्या शिक्षणासाठी हात आखडता घेतला जातो. तिथे जर मुलगा असेल तर कर्ज काढूनही शिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. अशा प्रकारे स्त्रियांना विकासाच्या संधी नाकारल्या जातात. हा फार मोठा अन्याय आहे. अर्धा समाजच जर आपण दुबळा ठेवला, तर पूर्ण ' समाजाचे नुकसान होते, हे आपण कधी लक्षात घेणार?

स्त्रियांवर जिथे जिथे अन्याय होतो, तिथे तिथे त्याला विरोध केला पाहिजे. सर्व समाज सुधारायचा असेल तर स्त्रियांनी समान हक्क मिळवले पाहिजेत. त्याला कोणताही पर्याय नाही.


.

Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free

The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.


 • Chapter 1.01: मामू

 • Chapter 1.02: प्राणसई

 • Chapter 1.03: अशी पुस्तकं

 • Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ

 • Chapter 1.05: परिमळ

 • Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं

 • Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!

 • Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके

 • Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

 • Chapter 2.1: शब्द

 • Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

 • Chapter 2.12: पैंजण

 • Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

 • Chapter 3.01: हसवाफसवी

 • Chapter 3.02: ध्यानीमनी

 • Chapter 3.03: सुंदर मी होणार

 • Chapter 4.01: सूत्रसंचालन

 • Chapter 4.02: मुद्रितशोधन

 • Chapter 4.03: अनुवाद

 • Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

 • Chapter 4.05: रेडिओजॉकी

 • Chapter 5.01: शब्दशक्ती

 • Chapter 5.02: काव्यगुण

 • Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण

 • Chapter 5.04: काळ

 • Chapter 5.05: शब्दभेद


.