Chapter 11: वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
खालील कृती पूर्ण करा.
टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
आकृत्या पूर्ण करा.
टॉलस्टॉय ची दैनंदिनी लेखनाची प्रयोजने
SOLUTION
(1) स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचे मूलस्रोत समजून घेणे.
(2) आत्मनिरीक्षण करणे.
(3) आत्मपरीक्षण करणे.
(4) स्वतःच्या सुप्त शक्तींचा वेध घेणे.
लिओ टॉलस्टॉयची कोवळ्या वयातील विलक्षण शक्ती
SOLUTION
(1) निरनिराळ्या संकल्पना शी खेळत बसणे.
(2) त्यांचे दृक्प्रत्यय मनाने अनुभवणे.
(3) ज्ञानेंद्रियांची तीव्रता अनुभवणे.
(4) एकाच गोष्टीचा निरनिराळ्या दृष्टिकोनांतून विचार करणे.
टॉलस्टॉयने वाचलेले लेखक
SOLUTION
(१)टर्जिनिव्ह
(२)चार्ल्स डिकेन्स
(३)व्हॉल्टेअर
(४)रूसो
'युद्ध आणि शांती' या कादंबरीसाठी तपशील गोळा करण्याची साधने
SOLUTION
(१)अगणित संदर्भ ग्रंथ.
(२)अधिकृत इतिहास.
(३)फ्रेंच आणि रशियन इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास.
(४)नेपोलियन विषयी प्रसिद्ध झालेले अपरंपार लेखन.
सूचनेप्रमाणे सोडवा
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
मन:पटलावरील प्रतिमा
'युद्ध आणि शांती' ही कादंबरी
SOLUTION
मन:पटलावरील प्रतिमा-शोभादर्शक
'युद्ध आणि शांती' ही कादंबरी-कैलासलेणे
'कादंबरी' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
SOLUTION
वॉर अँड पीस' हे लेखन कोणत्या वाङ्मयप्रकारातील आहे?
खलील शब्दसमूहाचा तुम्हाला दमजलेला अर्थ स्पष्ट करा.
मनाची कोरी पाटी :
SOLUTION
मनाची कोरी पाटी : कोणताही विचार, कोणतीही भावना, कल्पना नसतानाची मनाची अवस्था.
लोकोत्तर कल्पनाशक्ती:
SOLUTION
लोकोत्तर कल्पनाशक्ती : अन्य कोणाहीकडे आढळून येणार नाही अशी श्रेष्ठ दर्जाची कल्पनाशक्ती.
तपशिलांचा महासागर :
SOLUTION
तपशिलांचा महासागर : महासागर अफाट पसरलेला असतो. त्याचा ठाव लागत नाही. त्याप्रमाणे टॉलस्टॉयने जमवलेल्या तपशिलांचा संग्रह होता.
तक्ता पूर्ण करा.
अर्थपूर्ण, अमर्याद, वाङ्मयीन, कलाकृती, शिल्प, आठवण, अजोड, शक्त
SOLUTION
खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
न्यून असणे-
SOLUTION
कुणीही माणूस संपूर्णत: बरोबर नसतो, त्यात काही ना काही न्यून असतेच.
मातीशी मसलत करणे-
SOLUTION
भारतीय शेतकरी भर पावसात मातीशी मसलत करत असतो.
अवाक् होणे-
SOLUTION
उन्हात पाऊस पडण्याचे अनोखे दृश्य पाहून सारच अवाक् झाले.
अभ्यासाचे डोंगर पेलणे-
SOLUTION
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी अवस्थेत अभ्यासाचे डोंगर पेलले.
टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा
SOLUTION
टॉलस्टॉयने आपल्या तान्हेपणीच्या लिहून ठेवलेल्या दोन आठवणी आश्चर्यकारकच आहेत. नुसत्या आश्चर्यकारक नव्हेत, तर निसर्गातील तो एक चमत्कार मानला पाहिजे.
टॉलस्टॉयला तान्हेपणी टबमध्ये अंघोळ घातली जात होती, त्या प्रसंगाची त्याची एक आठवण आहे. अंघोळीसाठी त्याला एका टबमध्ये बसवले होते. दाई त्याच्या अंगाला सुगंधी साबण लावत होती. त्याचे अंग चोळत होती. तो सुगंध सर्व पाण्यात मिसळला होता, आत्तापर्यंत अनुभवलेल्या गंधापेक्षा हा सुगंध वेगळाच होता. विशेष म्हणजे हा वेगळेपणा जाणवल्यामुळे तान्हा टॉलस्टॅय उत्तेजित झाला होता. मोठ्या माणसांना जसे स्वतःच्या शरीराचे अस्तित्व स्पष्टपणे जाणवते, तसे त्याला त्या तान्या वयामध्ये स्वतचा चिमुकला देह जाणवत होता. लाकडी टबाचा मऊपणा, त्याचा काळेभोरपणा त्याला उत्कटपणे जाणवत होता. बाया दुमडलेला दाईचा हात, त्या हाताची दृश्य प्रतिमा, पाण्याच्या कढत वाफा ते त्याला अजूनही आठवत होते. पाण्याशी खेळताना होणारा आवाज, टबाच्या ओल्या कडांवरून चिमुकले हात 'फिरवताना जाणवलेला पृष्ठभागाचा गुळगुळीतपणा हे सर्व त्याला अजूनही जसेच्या तसे आठवत होते. ती पूर्ण आठवणच विलक्षण आहे. ' त्याच्या तरल संवेदनक्षमतेची साक्ष देणारी आहे.
'युद्ध आणि शांती' ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
'युद्ध आणि शांती' ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड मेहनत घेतली. अभ्यासासाठी त्यांनी इतके संदर्भग्रंथ मिळवले होते की त्या ग्रंथसंग्रहाला अभ्यासाचा डोंगर म्हणणेच योग्य ठरेल. त्यांनी कादंबरीलेखनासाठी केलेला अभ्यास पाहून कोणीही अवाक् होईल. अक्षरशः अगणित संदर्भग्रंथ त्यांनी जमवले आणि त्यांचा कसून अभ्यास केला. आपण लिहीत असलेल्या कादंबरीतील सर्व घटना, व्यक्ती आणि त्यांच्या संबंधांतील सर्व तपशील यांची त्यांनी कसून तपासणी केली. कादंबरीतला काळ, त्या काळातील समाजातील खरेखरे वास्तव, त्या
काळातील माणसे, त्यांच्या वागण्याच्या पद्धती, रीतिरिवाज हे सर्व त्यांनी चिकित्सक पुणे अभ्यासणे. इतिहास काळात जे खरोखरच घडले असेल तसे वातावरण आपल्या कादंबरीत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कधी कधी असेही घडायचे की एकच घटना दोन विरुद्ध पद्धतींनी सांगितली गेलेली असायची. अशा वेळी कोणते वर्णन खरे मानायचे, हा यक्षप्रश्नच असे. अशा वेळी माणसे खरोखर कशी वागत असतील, कशी बोलत असतील, याचा ते अंदाज बांधत. त्यासाठी स्वतःला असलेल्या मनुष्यस्वभावाच्या अभ्यासाचा उपयोग करीत. अशा प्रकारे अत्यंत चिकित्सकपणे, तटस्थपणे घटनांचा वाघ घेत. स्वतःच्या कादंबरी लेखनासाठी ते अमाप कष्ट घेत असत.
स्वतःचे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉय यांनी केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
या कादंबरीच्या लेखनासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड मेहनत घेतली. मुळात टॉलस्टॉय हे अत्यंत चोखंदळ वृत्तीचे होते. त्यामुळे लिहिलेला भाग पुन्हा पुन्हा तपासून अधिकाधिक चांगला करण्यासाठी वार वार पुन्हा पुन्हा लिहून काढत. त्यामुळे आधी निश्चित केलेला आराखडा अनेकदा विस्कटून जात असे. त्यामुळे लेखनाला निश्चित असा, व्यवस्थित आकार येत नसे. कादंबरीची सुरुवात कशी करावी, हा त्यांच्या दृष्टीने यक्षप्रश्न होता. बारा-पंधरा वेळा वेगवेगळ्या पद्धतींनी सुरुवात करून पाहिली. प्रत्येक वेळी ती त्यांच्या पसंतीस येत नसे. चोखंदळपणामुळे वर्णने जिवंत होऊन उठत. हे खरे असले तरी पुन्हा पुन्हा लिहावे लागण्याने लिहिण्याची हमालीसुद्धा खूप वाढत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या परिष्करणाला तोडच नव्हती. प्रत्येक शब्द घासून-पुसून, पुन्हा पुन्हा तपासून घेतला जात होता. प्रतिमांची रचनासुद्धा अचूक करण्याचा प्रयत्न होता. पात्रांची योजना, त्यांचे स्वभाव, त्यानुसार होणारे त्यांचे वागणे-बोलणे या सगळ्यांशी सुसंगत अशी कथानकाची रचना, अचूक ऐतिहासिक संदर्भ वगैरे सगळ्या बाबी कटाक्षाने वापरायच्या आग्रहामुळे पानेच्या पाने पुन्हा पुन्हा लिहून काढावी लागली होती.
इतके पुनर्लेखन झाल्यावर लिहिलेली सर्व पाने टॉलस्टॉय यांची पत्नी सोन्या हिच्याकडे सोपवली जात. ती रात्रभर जागून सर्व पाने सुवाच्य अक्षरांत लिहून काढी. टॉलस्टॉय सकाळी उठल्यावर ती सर्व पाने पुन्हा बारकाईने वाचून काढत. बारीक बारीक बदल केले जात. त्यांच्या खाणाखुणा केल्या जात. असे करता करता ती सर्व पाने पन्हा चिताडली जात. सोन्या ती पुन्हा लिहून काढीत असे. दोन हजार पानांची ही कादंबरी जवळजवळ सात वेळा पुन्हा पुन्हा लिहून काढली गेली. या कष्टांची कमाल झाली
'टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो', या विधानाची यथार्थता पटवून द्या.
SOLUTION
टॉलस्टॉय हे प्रतिभासंपन्न साहित्यिक होतेच, शिवाय ते थोर तत्त्वचिंतक आणि शिक्षण शास्त्रज्ञ सुद्धा होते. त्यांनी सत्य, शांती, त्याग आणि सेवा या मूल्यांची आयुष्यभर उपासना केली. या मूल्यांचे दर्शन त्यांच्या साहित्यातून घडते, तसेच ते त्यांच्या अन्य लेखनातून ही घडते. त्यांनी आयुष्यभर जे कार्य केले, त्या कार्यातूनही या मूल्यांचेच दर्शन घडते.
प्रस्तुत पाठामध्ये टॉलस्टॉय यांच्या लेखक म्हणून झालेल्या घडामोडींचे चित्रण आले आहे. त्यांना स्वतःची कलाकृती सर्वश्रेष्ठ व्हावी, ही आस होतीच. पण एवढ्यावरच त्यांचे मन थांबले नव्हते. त्यांना आपली कलाकृती आदर्श व्हावी असे वाटत होते. आदर्श होण्यासाठी त्यांनी अमाप कष्ट उपसले. प्रचंड अभ्यास केला. त्यांच्या 'युद्ध व शांती' या कादंबरीचे उदाहरण पाहण्यासारखे आहे. या कादंबरीत हजारो घटना आहेत. पाचशेहून अधिक व्यक्ती आहेत. प्रत्येक व्यक्ती दुसरीपासून वेगळी आहे. प्रत्येकीचा वेगळेपणा त्यांनी जपला आहे. त्यासाठी बारीक-सारीक तपशिलांचा त्यांनी अभ्यास केला. वेगवेगळ्या वृत्तींच्या व्यक्तींचा अभ्यास केला आणि आपल्या कादंबरीतील व्यक्ती घडवल्या. प्रसंगांचा काटेकोर अभ्यास केला. त्यासाठी हजारो ग्रंथ अभ्यासले. कितीतरी व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. शक्य तिथे ठिकाणांना भेटी दिल्या. कादंबरीतील युद्धाचे वर्णन प्रत्ययकारक व्हावे म्हणून दरम्यानच्या काळात होऊन गेलेल्या युद्धाचा त्यांनी अभ्यास केला. त्या युद्धात सामील झालेल्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. अशा प्रकारे अभ्यास करून २००० पृष्ठांची कादंबरी लिहिली. ती लिहिताना शब्दांचा काटेकोरपणाही पाळला. शेकडो परिच्छेद, पानेच्या पाने पुन्हा पुन्हा लिहून काढली.
त्यांच्या आयुष्यातील त्यांचे एक खास कार्य सांगितलेच पाहिजे. युरोपात जाऊन तिथल्या शिक्षण व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला आणि स्वतःच्या गावी येऊन शेतकऱ्यांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा उघडली. त्या शाळेत प्रचलित अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती आणि मूल्यमापन पद्धती यांना बाजूला सारले. एक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती सुरू केली. टॉलस्टॉय यांचे मोठेपण व्यक्त करण्यासाठी ही घटना खूप महत्त्वाची आहे.
'ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती,' या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
अफाटपणा, प्रचंडपणा, टॉलस्टॉय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण होते. त्यांनी केलेला अभ्यास पाहून कुणीही थक्क होईल. त्यांनी केलेल्या अभ्यासाला लेखिकांनी अभ्यासाचे डोंगर अशी उपमा दिली आहे. त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची संख्या मुळी शेकड्यांच्या संख्येमध्ये आहे. त्यांच्या या गुणांबरोबरच चोखंदळपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा गुण आहे. जे मिळवायचे आहे, जे निर्माण करायचे आहे, ते पूर्णपणे चोख, पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. शेतकरी पेरणी करण्यापूर्वी जमीन खूप नांगरतो. जमिनीचा-मातीचा कस वाढवतो. त्यामुळे पीक मोठ्या प्रमाणात, कसदार आणि उत्तम दर्जाचे मिळते. टॉलस्टॉय यांनी कादंबरीची मुद्रण प्रत हीच जमीन मानली.
शेतकरी कष्ट घेतो तसे कष्ट त्यांनी लेखन करताना घेतले. शेकडो संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला. जो कालखंड कादंबरीत चित्रित करायचा होता, त्या कालखंडाची अनेक वैशिष्ट्ये शोधून काढली. ती कादंबरी लेखनासाठी उपयोगात आणली. ऐतिहासिक संदर्भ काटेकोरपणे तपासून घेतले. घ्यायच्या सर्व तपशिलांची खातरजमा केली. त्यामुळे विशिष्ट कालखंडातील समाजजीवन कादंबरीमध्ये जिवंत होऊन उठले. ऐतिहासिक तपशिलांबद्दल जागरूक राहिल्यामुळे कादंबरीतील वर्णनांविषयी विश्वासार्हता वाढली. कादंबरी अधिक वास्तववादी झाली.
.
Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free
The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.
• Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ
• Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं
• Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!
• Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके
• Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
• Chapter 2.11: वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
• Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
• Chapter 3.03: सुंदर मी होणार
• Chapter 4.01: सूत्रसंचालन
• Chapter 4.02: मुद्रितशोधन
• Chapter 4.03: अनुवाद
• Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन
• Chapter 4.05: रेडिओजॉकी
• Chapter 5.01: शब्दशक्ती
• Chapter 5.02: काव्यगुण
• Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण
• Chapter 5.04: काळ
• Chapter 5.05: शब्दभेद
.