Advertisement

Chapter 12 - पैंजण Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 12 - पैंजण Balbharati solutions for Marathi

Chapter 12 - पैंजण Balbharati solutions for Marathi

Chapter 12 - पैंजण Balbharati solutions for Marathi


.

Chapter 2: पैंजण

योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा

आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-

OPTIONS

  • आजी जखमांना औषधपाणी करून काम करायची.

  • रूढींचा त्रास सहन करत स्वयंपाकघरापुरती वावरायची.

  • जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची.



सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-

OPTIONS

  • राजाच्या राणीसारखा सन्मान तिला मिळायचा.

  • राजाच्या राणीचा तोरा मिरवायची.

  • रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची.



मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-

OPTIONS

  • घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक, सामाजिक बंधने सहन करत

  • स्वातंत्र्य मिळाले म्हणून इतर दु:खं सहन करते.

  • ऐच्छिक वेषभूषेसाठी सारे सहन करते.



पुढल्या का होईना शतकाआधी! पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी. म्हणजे-

OPTIONS

  • पुढचे शतक येण्यापूर्वी स्वयंपूर्ण आणि समर्थ बनू दे.

  • पुढल्या शतकाआधी पाय जमिनीवर राहू दे.

  • पुढल्या शतकाआधी काटे कमकुवत होऊ दे.



खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा.

नादाच्या भुलभुलैय्यातून बाहेर न पडण


SOLUTION

आजीच्या पायात दोन-दोन किलो वजनाचे भक्कम पैंजण होते. म्हणजे रूढींनी तिचे विश्व जखडून फक्त स्वयंपाकघरापुरते मर्यादित ठेवले होते. त्यामुळे आजीनेही विद्रोह न करता, हे बंधन स्वीकारले होते. म्हणजेच पैंजणाच्या आवाजाच्या जादुई नगरीतून ती बाहेर पडली नाही.



पण सारे दुर्लक्षून राजराणीसारखे भिरभिरणे.


SOLUTION

आईने पैंजणांऐवजी तोरड्या पसंद केला. म्हणजे रूढींची थोडीशी बंधने शिथिल केली. परंतु बंधने पूर्ण झुगारणे तिला जमले नाही. तिचे विश्व अंगणाइतपत पण मर्यादित होते. ते आईने स्वीकारले. रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरते आनंदात राहण्यात तिने धन्यता मानली. रूढींचा जाच सहन करून आणि वेदनांकडे दुर्लक्ष करून ती राजाच्या राणीसारखी घरातच वावरली.


मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी सारे सहन करणे.


SOLUTION

कवयित्रींनी पिंजण व तोरड्या नाकारल्या, म्हणजे त्यांनाघराबाहेर जगात वावरायला मिळाले. हे बाहेर पडण्याचेस्वातंत्र्य त्यांनी मिळवले. तरीही रूढींची सारी बंधने त्याझुगारू शकल्या नाहीत. मोकळा श्वास व मुक्ततामिळवण्यासाठी, बाहेर जगात मिरवण्याचे स्वातंत्र्यघेण्यासाठी थोडीशी बंधने कवयित्रींनी सहन केली.



खालील तक्ता पूर्ण करा.

व्यक्ती

घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र

ध्वनित होणारा अर्थ

माझी आजी

 

 

माझी आई

 

 

मी

 

 

माझी मुलगी

 

 



SOLUTION

व्यक्ती

घरातील किंवा घराबाहेरील क्षेत्र

ध्वनित होणारा अर्थ

माझी आजी

स्वयंपाकघर व माजघर

रूढींनी पूर्ण जखडणे

माझी आई

स्वयंपाकघर, माजघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची

बंधने पाळून थोडे स्वातंत्र्य

मी

अंगण ओलांडून घराबाहेर

थोडीशी बंधने पाळून स्वातंत्र्य उपभोगणे

माझी मुलगी

बाहेरच्या जगात

मुक्त स्वतंत्र अस्तित्व

 




कवितेचा विषय

कवितेतील प्रतीक

कवितेचा रचनाप्रकार

कवितेची मध्यवर्ती कल्पना

कवितेची भाषाशैली

 

 

 

 

 



SOLUTION

कवितेचा विषय

कवितेतील प्रतीक

कवितेचा रचनाप्रकार

कवितेची मध्यवर्ती कल्पना

कवितेची भाषाशैली

स्त्री-स्वातंत्र्य

पैंजण, तोरड्या, स्वयंपाकघर, माजघर, अंगण, चपला, बूट, सॅन्डल.

मुक्तच्छंद (मुक्त शैली)

पूर्वापार रूही व जातक बंधनाने जखडलेली स्त्री या शतकात मुक्त स्वातंत्र्य अनुभवते. स्त्री प्रतिष्ठा व सन्मान राखायला हवा. ती स्वबळावर अन्याय, अत्याचार विरुद्ध प्रतिकारासाठी सक्षम झाली आहे. सकस वैचारिक मूल्ये अंगिकारून स्त्री स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाने स्त्री-पुरुष समानतेची ग्वाही देत आहे.

थेट,आवाहक व प्रांजळ भाषाशैली.



‘चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते,’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा


SOLUTION

चार पिढ्यांची जीवनशैली उलगडत कवयित्री नीलम माणगावे यांनी 'पैंजण' या कवितेतून स्त्री-स्वातंत्र्याचा आग्रह समर्थ व ओघवत्या शब्द शैलीत ठामपणे व्यक्त केला आहे. कवयित्रींच्या आजीने दोन-दोन किलोंचे अवजड पैंजण रूढीपरंपरेचे जोखड म्हणून मिरवले. रूढी परंपरा निमूटपणे पाळण्यात तिचे विश्व बंदिस्त झाले. कवयित्रींच्या आईने पैंजण नाकारले; पण तोरड्या स्वीकारल्या. म्हणजे तिच्या मनाला स्त्री-स्वातंत्र्याची चाहूल लागली. पण तिलाही सर्व बंधने शिथिल करता आली नाहीत.

कवयित्रींनी स्वत: पैंजण व तोरड्या दोन्हीही हद्दपार केल्या. अंगण ओलांडून बाहेरच्या जगात पाऊल टाकले. मोकळा श्वास घेतला. आधुनिक चपल, बूट, सॅन्डल पायात अडकवले. परंतु तरीही पूर्ण स्त्री स्वातंत्र्य तिला उपभोगता आले नाही. आजी व आईच्या जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर तिची जीवनशैली काहीशी मुक्त होती. परंतु कधी कधी चपला घसरल्या, सॅन्डल टोचल्या नि बूट चावले. म्हणजे बंधनाचा थोडा जाच कवयित्रींना सहन करावा लागला. घर सोडून, घराच्या म्हणजेच रूढीच्या जाचक जोखडापासून बाहेरच्या जगात श्वास घेण्याची मुभा मिळवली. या मुक्त स्वातंत्र्यासाठीच थोडीशी बंधने कवयित्रींनी स्वीकारली

अतिशय सूचक शब्दांत कवयित्रींनी प्रस्तुत ओळीतून कवयित्रींच्या पिढीची होणारी घुसमट व्यक्त केली आहे.



‘अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता... घट्ट, मजबूत, पोलादी’, या ओळींतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


SOLUTION

कवयित्री नीलम माणगावे यांनी 'पैंजण' या कवितेत 'पायातील दागिना' हे प्रतीक घेऊन चार पिढ्यांमधील स्त्रीची रूढीपरंपरेत होणारी घुसमट अत्यंत प्रांजळ व आवाहक भाषाशैलीत मांडली आहे. स्त्री-स्वातंत्र्याचा वैचारिक आलेख त्यांनी कवितेत साकारला आहे. कवयित्रींची आजी रूढींच्या घट्ट जोखडात जखडलेली होती. आई थोडीशी स्वतंत्र परंतु घराबाहेर पडण्यास तिला मज्जाव होता. कवयित्रींनी स्वत: घराबाहेरचे जग अनुभवले. जगात वावरण्याचे स्वातंत्र्य मिळावे, म्हणून काही बंधने तिने स्वीकारली. कवयित्रींची मुलगी मात्र स्वतंत्रपणे जगू इच्छिते. शिक्षणाने मिळालेली वैचारिक मूल्ये ती अंगिकारते. स्त्री स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला उमगला आहे. पायात जोखड घालून ती वावरत नाही. स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याची धमक तिच्यात आहे. तिला तिचे पाय घट्ट, मजबूत व पोलादी हवेत, ते जुलूम, अत्याचार, अन्याय यांना पायदळी तुडवण्यासाठी ! स्त्री-शक्तीची जाणीव होऊन ती स्वबळावर आपली लढाई लढणार आहे. नवनिर्मित मूल्यांचा पाठपुरावा करत ती या शतकाआधी समर्थ, सशक्त व सबळ होत आहे. म्हणून ती निर्धाराने आईला सांगते- अगं, पायाखालचे अडथळे मला मोडून टाकायचे आहेत. जुलमांचा दृढ प्रतिकार करण्याच्या स्त्री-शक्तीचे स्वतंत्र मूल्य या ओळींतून कवयित्रींनी ठामपणे प्रस्थापित केले आहे



आजीच्या आणि आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कोणकोणत्या प्रतीकांतून वर्णन केला आहे, ते स्पष्ट करा.


SOLUTION

'पैंजण' या कवितेमध्ये कवयित्री नीलम माणगावे यांनी चार पिढ्यांतील स्त्रीच्या जीवनशैलीमधील अंतर शब्दबद्ध केले आहे. आजी-आई-स्वतः कवयित्री - कवयित्रीची मुलगी यांच्या वागण्यातून स्त्री-स्वातंत्र्याचा आलेख साकारला आहे.

आजीच्या पायांत दोन-दोन किलोंचे पैंजण, या प्रतीकांतून रूढीपरंपरेच्या जोखडात पूर्णपणे जखडलेली आजीच्या पिढीतील स्त्री प्रत्ययाला येते. तर आईने पैंजण नाकारून 'हलक्या नाजूक तोरड्या' स्वीकारल्या, या प्रतीकातून बंधने थोडीशी सैल झाल्याचा संकेत मिळतो. आजीचे विश्व केवळ स्वयंपाकघर व माजघर इथपर्यंतच मर्यादित होते. तिला पडवीतून अंगणात येण्याचीही मुभा नव्हती. 'चूल आणि मूल' हेच तिचे सर्वस्व होते व तिने ते निमूटपणे मान्यही केले होते. आजीला या जोखडांमध्ये पायाला व मनाला जखमा व्हायच्या. कवयित्रींच्या आईला तोरड्यांमुळे जखमा झाल्या नाहीत आणि तिला माजघरापासून अंगणापर्यंत संचार करायला परवानगी होती. जरासे स्वातंत्र्य अनुभवत होती; पण काही बंधनांमुळे मनाला टोचणी लागतच होती. आजीने आपल्या जखमा फडक्यांनी झाकून त्यांना ऊब दिली होती; तर आईने जखमांकडे दुर्लक्ष केले होते. आजीपेक्षा आईची जीवनशैली थोडीशी सुकर झालेली असली, तरी बंधनांची भीती व जाच कायम होता.

अशा प्रकारे, अनेक प्रतीकांतून आजीच्या व आईच्या कौटुंबिक वातावरणात जाणवलेला फरक कवयित्रींनी ओघवत्या शब्द शैलीत दृग्गोचर केला आहे.



कवितेत वर्णन केलेली आजी व आजची आजी यांच्यात कालपरत्वे झालेला बदल स्वभाषेत स्पष्ट करा.


SOLUTION

 'पैंजण' या कवितेत कवयित्री नीलम माणगावे यांनी चितारलेली आजी व आजच्या युगातील आधुनिक आजी यांच्या कौटुंबिक स्थानांत जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे.

कवितेत वर्णन केलेल्या आजीच्या पायात अवजड पैंजण होते, म्हणजे रूढीपरंपरेच्या भोवऱ्यात ती जखडलेली होती. त्या काळातील समाजव्यवस्था, सामाजिक मूल्ये व कौटुंबिक व्यवस्था यांनी आजीला स्वातंत्र्यापासून वंचित ठेवले होते. स्वयंपाकघर व माजघर हीच तिची हद्द होती. आणि 'चूल व मूल' हा तिचा एकांगी संसार होता. तिला बाहेरच्या अंगणातही डोकावण्याची मुभा नव्हती नि बाहेरचे जग तिला पारखे होते. म्हणून रूढींचा जुलूम निमूटपणे सोसत कवितेतली आजी जीवन जगत होती. तिच्या मनातील भावना व विचार यांच्या प्रकटीकरणाला मज्जाव होता.

आजची आजी ही पूर्णपणे स्वतंत्र आहे. ती घरात व घराबाहेर स्वतंत्रपणे वावरू शकते. स्त्री-शक्ती जागृत झाल्यामुळे ती स्वत:चे विचार मुक्तपणे मांडू शकते. सामाजिक कार्य करू शकते. घरातील नातवंडांपासून मोठ्यांपर्यंतचा गोतावळा समर्थपणे पेलू शकते. तिला कुठलाही अटकाव नाही. ती हवा तसा पेहराव व दागदागिने घालू शकते. कुठल्याही कौटुंबिक व सामाजिक जोखडामध्ये ती बंदिस्त नाही. ती अन्यायाविरुद्ध आवाज काढू शकते. पुरुष-स्त्री समानता मूल्य ती मानते, त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन आपले कर्तृत्व आजच्या आजीने सिद्ध केले आहे.



स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा.


SOLUTION

 स्त्री-पुरुष हा भेद नैसर्गिक आहे, तो मानवनिर्मित नाही, परंतु पूर्वीच्या पुरुषप्रधान संस्कृती अनेक जुलमी रूढींच्या बंधनांत स्त्रीला जखडून ठेवले होते. तत्कालीन विचारवंत व समाजसुधारकांनी स्त्रीवरील अन्यायाला वाचा फोडली आणि स्त्री-शक्ती हळूहळू प्रस्थापित होऊन स्त्री-स्वातंत्र्याचा उद्घोष झाला.

एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या गेल्या वीस वर्षांतील स्त्रीला आपल्यातल्या स्त्री-शक्तीची जाणीव झाली व ती समाजात स्वकर्तृत्वाने तळपू लागली आहे. भविष्यकाळात स्त्रीने झपाट्याने प्रगतिशील व्हायला हवे. स्वत:ला स्त्री न मानता 'व्यक्ती' मानून जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आत्मविश्वासाने पारंगत होणे गरजेचे आहे. पुरुषी काम करण्यात धन्यता न मानता स्वत:ची स्वतंत्र क्षेत्रे प्रतिभेने निर्माण करायला हवीत. शास्त्रीय संशोधन, सैनिकी शिक्षण, अवकाश उड्डाण अशा अनेक विविध आव्हानात्मक क्षेत्रांत प्रगत व्हायला हवे. स्वत:चे संरक्षण करण्याइतपत सशक्त व्हायला हवे आणि इतर स्त्रियांसाठी 'महिला सक्षमीकरण' वैचारिक व मानसिक पातळीवर करणे गरजेचे आहे. महिलांनी स्वत:चे विदयापीठ स्वत:च होणे आवश्यक आहे.


पैंजण’ या कवितेचे रसग्रहण करा.


SOLUTION

आजी, आई, स्वतः व मुलगी या चार पिढ्यांतील स्त्री जीवनशैलीचे चित्रण व स्त्री-स्वातंत्र्याचा आलेख कवयित्री नीलम माणगावे यांनी 'पैंजण' या कवितेत शेव पांजळपणे अधोरेखित केला आहे. सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधने हळूहळू झुगारून आजची स्त्री कोणत्या टप्प्यावर उभी आहे. तिला स्त्री-शक्तीची झालेली जाणीव ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. भूतकाळातील स्त्री सघषमय प्रवास करीत आजच्या शतकात सक्षम व मूल्यगर्भ आयुष्य जगत आत्मविकास करते आहे. ती आता अन्यायाच्या विरोधात स्वत:च उभी ठाकली आहे, हा बहुमोल संदेश ही कविता देते.

'पायातील पैंजण' हे प्रतीक कवयित्रींनी सामाजिक व कौटुंबिक जाचक बंधनांसाठी वापरले आहे व प्रत्येक काळात बदलत जाणारी पायातील अडसरांची रूपे प्रस्थापित केली आहेत आणि या प्रतीकांतन स्त्रीच्या स्वातंत्र्याचा प्रवास प्रत्ययकारी पद्धतीने मांडला आहे.

स्वयंपाकघर व माजघरापर्यंत मर्यादित असलेले व बंधनांनी केलेल्या जखमा सहन करणारे आजीचे आयुष्य. पैंजण नाकारले तरी तोरड्यांमुळे झालेल्या वेदना दुर्लक्षित करून अंगणापर्यंतचा प्रवास सुसहय करणारी आई. पिंजण व तोरड्या हद्दपार करून बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येतो, म्हणून काही बंधनांच्या मर्यादेत राहणारी स्वतः कवयित्री आणि । स्वत:ला स्त्री-शक्तीची जाणीव झालेली व अन्यायाला पायदळी 'तुडवण्याची धमक असलेली कवयित्रींची मुलगी. स्त्रीच्या या वेगवेगळ्या कालखंडांतील चार रूपांतून आपल्याला स्त्री-जीवनाच्या खडतर प्रवासाची जीवघेणी कथा कळते.

मुक्तछंद प्रकारात लिहिलेली प्रस्तुत कविता तिच्या सहजसुंदर ओघवत्या शब्दकळेने विलक्षण परिणामकारक ठरली आहे. आक्रस्ताळेपणाने किंवा शब्दबंबाळ पद्धतीने स्त्रीच्या विद्रोह न मांडता स्त्री-वेदना मूकपणे किती बोलकी व प्रत्ययकारी होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून ही कविता अभिजात साहित्यात गणली जावी. स्त्री हक्क, स्त्री-स्वातंत्र्य व स्त्री-शक्ती या त्रिवेणी भावनांची वैचारिक वीण सशक्त व ठोस शब्दांत व्यक्त करणारी प्रस्तुत कविता, मला अंत:स्थ हृदयाला भावली आहे.


.

Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free

The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.


 • Chapter 1.01: मामू

 • Chapter 1.02: प्राणसई

 • Chapter 1.03: अशी पुस्तकं

 • Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ

 • Chapter 1.05: परिमळ

 • Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं

 • Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!

 • Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके

 • Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

 • Chapter 2.1: शब्द

 • Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

 • Chapter 2.12: पैंजण

 • Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

 • Chapter 3.01: हसवाफसवी

 • Chapter 3.02: ध्यानीमनी

 • Chapter 3.03: सुंदर मी होणार

 • Chapter 4.01: सूत्रसंचालन

 • Chapter 4.02: मुद्रितशोधन

 • Chapter 4.03: अनुवाद

 • Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

 • Chapter 4.05: रेडिओजॉकी

 • Chapter 5.01: शब्दशक्ती

 • Chapter 5.02: काव्यगुण

 • Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण

 • Chapter 5.04: काळ

 • Chapter 5.05: शब्दभेद


.