Advertisement

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marath- Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi



Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

योग्य पर्याय निवडा.

______ हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.

OPTIONS

  • नाटक, कथा

  • नाटक, एकांकिका

  • नाटक, काव्

  • नाटक, लल



नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ______

OPTIONS

  • अभिनय करणारा उपस्थित असतो.

  • नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.

  • नाटकाची जाहिरात होत.

  • नाटकाची संहिता वाचता येते.



नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे कारण ______

OPTIONS

  • खूप पात्रे त्यात सहभागी असतात.

  • डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.

  • दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो.

  • नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो.



चुकीचे विधान शोधा.

OPTIONS

  • अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्यपरंपरेला गती दिली.

  • विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला.

  • रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.

  • संगीत नाटकातील पदे ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात.



OPTIONS

  • नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.

  • नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा.

  • नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा.

  • नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा.



OPTIONS

  • परस्परविरोधी स्वभावांतून संघर्षनिर्माण होतो.

  • नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.

  • भूमिकांच्या परस्पर नात्यात संघर्ष दाखवता येतो.

  • भूमिका व परिस्थिती यांतील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते.



OPTIONS

  • नाटकात संहिता महत्त्वाची असते.

  • नाट्यसंहिता परिपूर्ण असावी.

  • नाट्यसंहिता दर्जेदार असावी.

  • नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.



फरक स्पष्ट करा.

प्रायोगिक नाटक

व्यावसायिक नाटक

 

 

 

 

 

 



SOLUTION

प्रायोगिक नाटक

व्यावसायिक नाटक

(१) आशय व अभि-व्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते.

(१) सामाजिक समस्या प्राधान्याने मांडल्या जातात.

(२) विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न.

(२) बोधपर व मनोरंजन पर स्वरूप.

(३) नाटकातील भाषा बोलीभाषेसारखी सहज.

(३) विनोद, उपहास,कोट्यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन.



 

नाटक

इतर साहित्यप्रकार

 

 

 

 



SOLUTION

नाटक

इतर साहित्य प्रकार

(१) दृक्-श्राव्य कला.

(१) शब्द हे माध्यम.

(२) सांघिक आविष्कार.

(२) एका व्यक्तीचा आविष्कार.



खालील कृती करा.


Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi  खालील कृती करा.

 

Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi  खालील कृती करा.


SOLUTION

मराठी रंगभूमी प्रगल्भ होण्याचे दोन टप्पे.

१.लोकरांजन

२.लोकप्रभोधन


Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi  खालील कृती करा.


SOLUTION

नाटक या साहित्यप्रकाराच्या उदयास पूरक ठरणाऱ्या कला

१. संगीत

२. नृत्य

३. वक्तृत्व

४. काव्य

५. चित्र



Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi  खालील कृती करा.


SOLUTION

नाट्यकलेची वैशिष्ट्ये

१. दृक्-श्राव्य

२. प्रयोगक्षम

३. संधिक अविष्कार

४. एकाच वेळी अनेक लोक बघतात



Chapter 3 - नाटक- साहित्यप्रकार-परिचय Balbharati solutions for Marathi  खालील कृती करा.


SOLUTION

नाटकातील संवादाची वैशिष्ट्ये

१. खटकेबाज

२. चुरचुरीत

३. नर्म विनोंदी

४. भावोत्कट



खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.

घटना/कृत

परिणाम

एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो.

 



SOLUTION

घटना/कृत

परिणाम

एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरीत्या होतो.

नट्य निर्माण होते.




घटना/कृत

परिणाम

नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन

 



SOLUTION

घटना/कृत

परिणाम

नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन

नाटकाचे यश वाढवते




घटना/कृत

परिणाम

नाटकात संघर्ष असला तर

 



SOLUTION

घटना/कृत

परिणाम

नाटकात संघर्ष असला तर

नाट्य-आशवात रंगत येते.



स्वमत.

‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.


SOLUTION

कथा, कविता, कादंबरी इत्यादी अन्य साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत. त्यांत लेखक व वाचक असे दोनच घटक असतात. परंतु 'नाटक' या साहित्यप्रकारातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. नाटकामध्ये संगीत, नृत्य, वक्तृत्व, काव्य, चित्रकला अशा बहुतेक कलांचा समावेश होतो, त्यामुळे नाटक हा सांघिक कलाविष्कार ठरतो.

नाटककार नाटकाची संहिता तयार करतो. व्यक्तिरेखेच्या स्वभावानुसार त्यात संवाद असतात. रंगसूचना देऊन नाट्यसंहिता तयार होते. दिग्दर्शक त्या नाटकातील भावाशयाला योग्य दिशा देऊन ते रंगमंचावर प्रयोग क्षम उभे करतो. अभिनेते नाटकातील पात्राच्या भूमिका अभिनित ध्वनी द्वारे व शब्दांच्या चढ-उतारांकरवी वठवतात. नेपथ्य कार नाटकातील दृश्याची मांडणी करतो. प्रकाश-योजनाकार ते दृश्य वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून प्रकाशित करतो. पार्श्वसंगीत घटनेच्या आशयाला पूरक रस निर्माण करते. नाट्यप्रयोग जेव्हा प्रेक्षकांच्या मनापर्यंत दृक्-श्राव्य माध्यमातून साकार होतो तेव्हा नाटकाची खरी पूर्तता होते.

अशा प्रकारे नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार व सुजाण प्रेक्षक हे नाटकाचे पाच घटक एकत्र येऊन नाटक परिपूर्ण करतात. म्हणून 'नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे,' असे म्हटले जाते.



तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

नाटकाचे नेपथ्य



SOLUTION

नाटकाचे नेपथ्य : नाटक हे रंगमंचाच्याअवकाशात घडत असते. रंगमंचावरील नाटकाच्या

कथानकाला साजेशी वातावरणनिर्मिती म्हणजे 'नेपथ्य' नाटकातील स्थळ, काळ, कथानक यांना साजेशी वस्तूंची मांडणी करावी दृश्याला सुसंगत रंगीत पडदे, घर असेल तर भिंतीवरील चित्रे, वापर या गोष्टी नेपथ्यात शिवाय नाटकाचा कपडेपट, वेशभूषा व केशभूषा नेपथ्याचा भाग आहे. प्रकाश व संगीत यांच्या साहाय्याने नाट्याच्या आशयाला पूरक अशी दृश्यनिर्मिती करावी लागते.



नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व



SOLUTION

नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व : दिवस, संध्याकाळ की रात्र आहे, या कालप्रहरांनुसार नाटकाची प्रकाशयोजना करावी लागते. स्पॉटस्, फ्लडलाइटस्, फूटलाइटस् इत्यादी विद्युत उपकरणे वापरून दिव्यांचा प्रकाश कमी-अधिक करणारे यांची योजना करावी लागते. नाटकातील मनातील भाव अधिक आवाहक करण्यासाठी विविध रंगांचे जिलेटीन वापरून रंगीत प्रकाशयोजना करणे हे महत्त्वाचे ठरते. पात्राच्या स्वगतासाठी त्यावर प्रकाशवर्तुळ प्रखरपणे टाकणे, हे प्रकाशयोजनेचे कार्य आहे.



नाटकातील संवाद



SOLUTION

नाटकातील संवाद : संवाद हा नाट्यसंहितेचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. संवादांतून निर्माण झालेला 'संघर्ष' हा नाटकाचा प्राण आहे. संवादांशिवाय नाटक उभे राहू शकत नाही. नाट्यविषयाला साजेसे व व्यक्तिरेखेचे स्वभावदर्शन करणारे संवाद नाटकात आवश्यक असतात. हे संवाद खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी तसेच भावोत्कट असावेत, म्हणजे नाटक प्रेक्षकांच्या मनाची पकड घेते.



नाटक अनेक कलांचा संगम


SOLUTION

नाटक-अनेक कलांचा संगम : नाटक हा रंगभूमीवरचा सांधिक आविष्कार आहे. नाट्याशय फुलवण्यासाठी व अधिक परिणामकारक होण्यासाठी नाटक या कलेला इतर अनेक कला साहाय्यभूत ठरतात. नाटकाच्या नेपथ्यात रंगसंगतीसाठी चित्रकला आवश्यक असते. प्रसंगाला उठाव आणणारे व पात्रांच्या स्वभावाचा परिपोष करणारे संगीत असते. अभिनयातील खटकेबाज अथवा भावपूर्ण संवादांसाठी काव्यकला व वक्तृत्व असणे गरजेचे ठरते. उजेड-अंधाराची जाण असलेली प्रकाशयोजना करावी लागते. अशा प्रकारे 'नाटक हा अनेक कलांचा संग' ठरतो.


प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा


SOLUTION

प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री-व्यक्तिरेखा :

अगदी सुरुवातीच्या काळात आपला समाज रूढीपरंपरेच्या जोखडात जखडलेला होता. अंधश्रद्धा, जुलमी चालीरीती यांचे अडथळे होते. स्त्री-स्वातंत्र्यावर जाचक बंधने होती. सामाजिक वातावरण अनुकूल नसल्यामुळे नाटक या कलेत भाग घेण्याची स्त्रीला मनाई होती व स्त्रियाही तयार नसत. म्हणून तत्कालीन नाटकातील स्त्री-भूमिका या पुरुषांद्वारे साकारल्या जात. अशा प्रतिकूल परिस्थितीत नारायण राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांनी अनेक स्त्री-व्यक्तिरेखा समर्थपणे साकारल्या व स्त्री-भूमिका अजरामर केल्या.



‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा


SOLUTION

नाटक ही समूहकला आहे. तशीच ती सामाजिक कला आहे. नाटक ही प्रेक्षकांसाठी दाखवली जाणारी दृक् व श्राव्य कला आहे. नाट्य कला लोकांचा सहभाग अंतर्भूत आहे. त्यामुळे नाटकामध्ये त्या त्या काळातील समाजाचे व बदलत जाणाऱ्या समाजाचे चित्रण केले जाते. समाजातील माणसांचा स्वभाव, मनोव्यापार, भावभावना यांतील विविध छटांचे दर्शन नाटकातून घडवले जाते. किंबहुना समाजाचे वास्तव चित्रण नाटकात प्रकर्षाने होत असते. सामाजिक समस्यांचा ऊहापोह नाटकात अगगण्य समजला जातो. संगीत. व्यावसायिक किंवा प्रायोगिक कोणत्याही नाट्यप्रकारात समाजव्यवस्था मध्यवर्ती असते. नाटक हा समाजमनाचा आरसा आहे. म्हणून 'नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे' असे म्हटले जाते.



संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.


SOLUTION

पूर्वीच्या काळी लळीत, गोंधळ, पोवाडे, कीर्तन, दशावतार, खेळे, तमाशे या कलांमधून संगीताला महत्त्वाचे स्थान होते. संगीतामुळे प्रेक्षक कलेकडे आकृष्ट होतात, ही धारणा होती. यातच पुढे आरंभीच्या काळात संगीत नाटकांचा जन्म झाला. विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर' नाटका नंतर अण्णासाहेब किर्लोस्करांची 'संगीत शाकुंतल' व 'संगीत सौभद्र' ही नाटके संगीतामुळे गाजली. त्यानंतरचे कृ. प्र. खाडिलकर यांचे 'मानापमान' हे संगीत नाटक गोविंदराव टेंबे - यांच्या संगीतामुळे व बालगंधर्वांच्या गायिकीमुळे खूप लोकप्रिय ठरले. रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केली जाते. संवाद कमी करून अभिनय आणि संगीत यांतून प्रेक्षकांना व श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. आशयाचे व कथानकाला गती देणारी पदे, शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा व भावोत्कट विविध गाणी यांचा संगीत नाटकात अंतर्भाव असतो. लोकसंगीत व ख्यालगायकी यांचा उत्तम मेळ, संगीतातील वादये व समर्थ गायक कलाकार हे संगीत नाटकाला फुलवतात. ही सर्व संगीत नाटकांची वैशिष्ट्ये असल्यामुळे नाट्येतिहासात 'संगीत नाटक' राष्ट्रीय पातळीवर मानाचे ठरले आहे.



नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.


SOLUTION

नाटक ही समूहकला आहे. त्यातील नाटककार हा पहिला व महत्त्वाचा घटक आहे. नाटककाराला नाटक लिहिण्यासाठी सशक्त कथाबीज सुचते व त्यातून नाट्यसंहिता निर्माण होते. नाट्यसंहिता लिहिण्यासाठी नाटककाराला नाटकाच्या सर्व अंगांचे ज्ञान आवश्यक असते.

नाट्यसंहितेसाठी पूर्वतयारी महत्त्वाची आहे. सशक्त, दर्जेदार व परिपूर्ण कथाबीजाभोवती नाटककार निवडक घटना व व्यक्तिरेखा यांची गुंफण करतो. नाट्यतंत्रानुसार नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण रचना करावी लागते. समाजातील विविध स्तरांवरील जनमानसाला जिव्हाळ्याचे वाटणारे विषय घेऊन मनोव्यापारांचे यथार्थ रसपूर्ण दर्शन घडवणे, हे नाट्यसंहितेचे मर्म आहे. कथानकाला साजेशी निवडक पात्र रचना करणे व परस्परविरोधी स्वभावांतील ताणांमधून संघर्ष निर्माण करणे, हा नाट्यसंहितेचा आदिबंध आहे. संवाद हा नाट्यसंहितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चुरचुरीत, नर्मविनोदी, कधी खटकेबाज, तर कधी भावोत्कट संवादांची पखरण नाट्यसंहितेत असावी लागते. अशा प्रकारे संवाद, संघर्ष, मनोव्यापारातील चढउतार, स्वगतातील भावपूर्णता व रंगसूचना यांच्या समतोल मेळातून नाट्यसंहिता सशक्त व समर्थ होते.



व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


SOLUTION

व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची समृद्ध परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन हे व्यावसायिक नाटकाचे प्रमुख हेतू आहेत. भूतकाळातील तत्त्वनिष्ठ प्रसिद्ध व्यक्तीचे जीवनदर्शन, समाजातील ज्वलंत समस्या, समकालीन समाजस्थितीतील अग्रेसर विषय यांवर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते.

व्यावसायिक नाटकाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. सामाजिक समस्या मांडण्याचे ते समर्थ माध्यम आहे. व्यावसायिक नाटक हे बोधपर व मनोरंजनपर असते. गंभीर विषयाचे नाटक सुसह्य होण्यासाठी विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या यांची पखरण करून प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी करण्याची योजना त्यात असते. व्यावसायिक नाटकांचा कौटुंबिक, सामाजिक व ऐतिहासिक विषयांना उजाळा देण्यावर भर असतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार नाटकाची मांडणी केलेली असते, त्यामुळे प्रेक्षक व नाटक यांच्यामध्ये दृढ नाते निर्माण होते. व्यावसायिक नाटक हे बोध, रंजन, प्रेक्षकानुनय या व्यावसायिक उद्दिष्टाने प्रेरित झालेले असते.



अभिव्यक्ती.

‘नाटक हा वाङ्‌मयप्रकार इतर वाङ्‌मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.



SOLUTION

नाटक ही दृक्-श्राव्य कला आहे. कथा, कादंबरी, कविता इत्यादी वाङ्मयप्रकारांपेक्षा 'नाटक' हा वाङ्मयप्रकार वेगळा आहे. बाकीच्या वाङ्मयप्रकारांमध्ये लेखक व वाचक असे दोन घटक असतात. ते वाचकनिष्ठ आहेत. नाटक हा समूहाचा आविष्कार आहे. नाटकामध्ये नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, नेपथ्यकार व प्रेक्षक असे अनेक घटक एकत्र असतात. शिवाय नाटकामध्ये संगीत, नृत्य, चित्र, वक्तृत्व इतर अनेक कलांचा समावेश असतो. इतर वाङ्मयप्रकार एका वेळी एकच वाचक वाचू शकतो. उलट नाटक हे रंगमंचावर केले जाते. ते प्रयोगक्षम आहे. नाटक एकाच वेळी हजारो लोक पाहू व ऐकू शकतात. नाटकात जिवंत व्यक्ती आपापल्या भूमिकेत वावरताना डोळ्यांसमोर दिसतात. इतर वाङ्मय एकदा वाचल्यावर त्यातले स्वारस्य संपते, पण नाटक हे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते. नाटक हे संहिता म्हणून वाचताही येते व प्रयोग क्षम असल्यामुळे पाहताही येते. अशा प्रकारे नाटक हे इतर वाङ्मयप्रकारांपेक्षा वेगळे ठरते.



विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.


SOLUTION

(विदयार्थी पालकांसह शिक्षकांच्या घरी आला आहे. विद्यार्थी शिक्षकांच्या पायाला स्पर्श करून वंदन करतो.)

विद्यार्थी : सर, नमस्कार करतो!

शिक्षक : ये, ये, महेश! बाळ कसा आहेस तू?

पालक : (आईवडील शिक्षकांना नमस्कार करतात.) नमस्कार सर!

शिक्षक अरे व्वा! आज सारे कुटुंब आमच्या घरी. चांगला योग आहे.

आई : आपली कृपा सर! (विदयार्थी हातातला पेढ्यांचा बॉक्स शिक्षकांना देतो.)

महेश : सर, काल निकाल लागला. मला परीक्षेत ९७.६ गुण मिळाले.

शिक्षक : व्वा! अभिनंदन... अभिनंदन! वडील हे तुमच्या मार्गदर्शनामुळे! तुम्ही महेशला चांगले तयार केले. म्हणून...

शिक्षक : अहो, तसं नाही! विहिरीत असतं तेव्हा पोहऱ्यात येतं ना!

महेश : माझ्या यशाचं सारे श्रेय तुम्ही व आईवडील यांनाच आहे!

आई : हो ना! परीक्षेआधी महिनाभर महेश आजारी होता.

वडील : त्याने तर धसकाच घेतला होता, परीक्षा कशी पार पडेल म्हणून... तुम्ही दोन चांगल्या गोष्टी सांगून तयार केलंत.

शिक्षक : महेश मुळात हुशारच आहे. ऐन परीक्षेच्या वेळी मुलांना थोडी भीती वाटतेच!

आई : तुम्ही त्याची भीती पळवून लावलीत सर!

महेश : सरांनी मला जवळ घेऊन खूप समजावलं!

शिक्षक : अरे, शिक्षकाचे काम फक्त वर्गात शिकवणे नाही. प्रत्येक विदयार्थ्याची क्षमता लक्षात घेऊन त्याच्यात आत्मविश्वास कसा जागवतो येईल हेही करायला हव! मी ते केलं. बस्स! दुसरं-तिसरं काही नाही.

वडील : खरं आहे! पण असे सगळे नसतात ना!

शिक्षक : नाही, नाही. तसं नव्हे! Teacher Never teaches

The preaches!!

आई : तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर!

शिक्षक : (हसत) मग त्याची परतफेड करण्यासाठी भोजन करून जी आमच्याकडे!

वडील : नको, नको... तुम्हांला तुमची कामं असतील. उगाच त्यात व्यत्यय नको.

शिक्षक : मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे इंद्रधनुष्य फुललेलं पाहणं हेच आमचं श्रेय! पर

आई : हा तुमचा मोठेपणा, सर!

वडील : बरं येतो आम्ही. अशीच कृपा राहू दे.

शिक्षक : महेश, पुढे काय करायचं ठरवलं आहेस.

महेश : सायन्सला जाईन म्हणतो.

शिक्षक : Yes, Good Good! You may do science more

Artistic!!

आई-वडील : बराय! निघतो!

शिक्षक : या कधी, या बाजूला आलात की!

आई-वडील : नक्की सर, येतो. नमस्कार!

शिक्षक : नमस्कार!!


.


Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free

The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.


 • Chapter 1.01: मामू

 • Chapter 1.02: प्राणसई

 • Chapter 1.03: अशी पुस्तकं

 • Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ

 • Chapter 1.05: परिमळ

 • Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं

 • Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!

 • Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके

 • Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

 • Chapter 2.1: शब्द

 • Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

 • Chapter 2.12: पैंजण

 • Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

 • Chapter 3.01: हसवाफसवी

 • Chapter 3.02: ध्यानीमनी

 • Chapter 3.03: सुंदर मी होणार

 • Chapter 4.01: सूत्रसंचालन

 • Chapter 4.02: मुद्रितशोधन

 • Chapter 4.03: अनुवाद

 • Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

 • Chapter 4.05: रेडिओजॉकी

 • Chapter 5.01: शब्दशक्ती

 • Chapter 5.02: काव्यगुण

 • Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण

 • Chapter 5.04: काळ

 • Chapter 5.05: शब्दभेद


.