Chapter 3: ध्यानीमनी
खालील कृती करा.
SOLUTION
शालू वहिनीची स्वभाववैशिष्ट्ये
(१) कल्पनेच्या जगात रमणारी
(२) मुलाबाबत अति संवेदनशील
(३) मनस्वी
(४) अत्यंत माया करणारी
SOLUTION
सदाची स्वभाववैशिष्ट्ये
(१) घुमा
(२) अबोल
(३) तटस्थ
(४) समजूतदार
SOLUTION
शालूवहिनीनी वर्णन केलेली डॉ. समीरची वैशिष्ट्ये
(१) असलेल्या माणसावर उपचार करण्याचा अधिकार असलेला
(२) असलेले माणूस नसलेले ठरवण्याचा अधिकार नसलेला
स्पष्ट करा.
शालूवहिनींचे पुत्रप्रेम.
SOLUTION
शालूवहिनींचे पुत्रप्रेम - शालूवहिनीला मोहित अस्तित्वात असल्याचा जबरदस्त विश्वास आहे. त्या मोहितला दृष्टिआड करू इच्छित नाहीत. त्यांच्या कल्पनेत व प्रत्यक्षात तो सतत डोळ्यांसमोर उभा राहतो. त्याची प्रत्येक वस्तू शालूवहिनी मायेने जपतात. मोहितवर प्रचंड प्रेम करतात व त्यामुळे त्याची सतत काळजी वाहतात.
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित.
SOLUTION
सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व म्हणजे मोहित – शालूवहिनींचे विश्व मोहित एवढेच सीमित आहे. नसलेल्या मोहित काळजी करणे व त्याच्यावर जिवापाड प्रेम हेच शालूवहिनींच्या जीवनाचे ध्येय आहे. सदानंदला वस्तुस्थिती माहीत असूनही त्याने जीवघेणी तडजोड केली आहे. शालूवहिनींसाठी सदाने सारे जग तोडले आहे. 'नाही' ती गोष्ट 'आहे' म्हणून जगण्यात तोही धन्यता मानतो. अशा प्रकारे सदा व शालूवहिनींच्या जगण्याचे जीवनसत्त्व मोहित आहे.
उताऱ्यातील संवादामधील खालील विधानांचा अर्थ स्पष्ट करा.
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो.
SOLUTION
नव्या जबाबदारीच्या ओझ्यानं वाकलो - शालूवहिनी नसलेल्या मोहितच्या भासात जेव्हा अडकली, तेव्हा सदा तिच्या या मानसिक स्थितीला कंटाळून दोन दिवस घराच्या बाहेर राहिला. जेव्हा तो घरी परतला तेव्हा शालू उपाशी राहिलेली त्याला कळले आणि ती रडत सांगत होती की, ती उपाशी राहिल्यामुळे मोहित दूध मिळाले नाही. ती त्वेषाने सदाला म्हणाली की 'तुम्हांला बापाचं काळीज आहे की नाही'. या तिच्या वाक्याने सदा हादरला. म्हणून या 'बापपणाच्या नव्या जबाबदारीच्या ओझ्याने वाकलो', असे सदा म्हणाला.
इच्छेला शरीर असायलाच हवं का?
SOLUTION
इच्छेला शरीर असायला हवं का? -सदा घरात नसताना जेव्हा शालू जेवली नाही व मोहितही उपाशी राहिला असे जेव्हा ती म्हणाली तेव्हा सदाला गलबलून आले. मोहितला वाढवायचे अशी त्याने मनाशी खूणगाठ बांधली. कुणाचेही आयुष्य स्वयंभू नसते, याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली. शेवटी आपण एकमेकांच्या इच्छेसाठीच जगायचे असते, असे सदाने स्वत:ला समजावले. म्हणून पुढे तो म्हणतो की इच्छेला शरीर असायलाच हवे, असे नाही.
स्वमत.
तुमच्या मते शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण स्पष्ट करा.
SOLUTION
प्रत्येक स्त्रीच्या मनात मातृत्व ही भावना असते. मूल नाही झाले, तरी मातृत्व ही भावना कमी होत नाही. निपत्रिक असलेले माता पिता हे कुत्रा किंवा तत्सम प्राण्यावर प्रेम करून ही भावना शमवताना आपण पाहतो. नाट्यउताऱ्यात शालूच्या मातृत्वाच्या भावना नैसर्गिक आहेत. मूल नसताना मूल आहे, असे स्वप्न ती साक्षात पाहते. यातून 'मोहित' या काल्पनिक मुलाचा जन्म आहे. कुठलीही माता जशी मुलावर निरतिशय प्रेम करेल तसेच प्रेम शालू या काल्पनिक मुलावर करते व आपली अतृप्त मातृत्वाची भावना पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी शालूची नजर त्यांच्या बाळाला लागेल म्हणून तिला बारशाला बोलवायला नाकारले. या खुळ्या सामाजिक समजुतीमुळे शालू पिसाळल्यागत झाली आणि मोहितचे स्वप्न खरे मानू लागली. असल्या मागासलेल्या सामाजिक चालीरीतींचा हा दोष आहे. म्हणून शालचे वागणे तिच्या मानसिक पातळीवर योग्य आहे, असे वाटते.
‘शालूवहिनीचे पुत्रप्रेम नैसर्गिक आहे’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
SOLUTION
शालू वहिनी सी होम सायन्स मध्ये चाईल्ड सायकॉलॉजी शिकलेली सुशिक्षित व सुजाण स्त्री आहे. कुठल्याही स्त्रीच्या मनात मातृत्व ही महत्त्वाची भावना नैसर्गिकपणे स्थित असते. तशी ती शालूवहिनीच्याही मनात आहे. पुत्र होत नसल्यामुळे ती अस्वस्थ होती. तशात खुळचट सामाजिक रूढीमुळे तिला इतरांच्या मुलांच्या बारशांपासून बुडून गेली. वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे 'मोहित' या काल्पनिक पुत्रप्रेमात ती बुडून गेली.
मोहितला न्हाऊ-माखू घालणे, भरवणे इथपासून तो जसजसा तिच्या मानसिक कल्पनेत मोठा होऊ लागतो, तसतशी ती त्याची मायेने काळजी वाहते. त्याची खेळण्याची रॅकेट, शर्ट, पॅन्ट, बनियन, टॉवेल, बूट इत्यादी छोट्या छोट्या गोष्टीत ती इतर मातांप्रमाणेच लक्ष पुरवते. त्याचा जेवणाचा डबा कणकेच्या शिऱ्यावर साजूक तुपाचा तवंग देऊन सजवते. तो खेळून दमूनभागून आला की त्याचा चेहरा प्रेमळ नजरेने न्याहाळून त्याचे ते रुपडे डोळ्यांत साठवते. घरात तो नसताना त्याच्या ट्रेकिंगचे कारण सदानंदला देते.
अशा प्रकारे शालूवहिनीचे पुत्रप्रेम हे इतर माउलींप्रमाणेच नैसर्गिक ठरते.
शालूवहिनीच्या स्वगतातून मोहितच्या कपड्यांबाबत आलेले विवेचन स्पष्ट करा.
SOLUTION
'ध्यानीमनी' या नाट्यउताऱ्यामध्ये नाटककार प्रशांत दळवी यांनी 'मोहित' या काल्पनिक मुलावर प्रेम करणाऱ्या शालूवहिनीची मानसिक आर्तता व्यक्त करणारे मोठे स्वगत लिहिले आहे. त्यात मोहितच्या कपड्यांबाबत तपशीलवार विवेचन आले आहे.
डॉ. समीरला 'मोहित' खरेच घरात वावरतो आहे, हे पटवून देताना शालू वहिनी त्याला मोहितच्या कपड्यांचे दाखले देते. तो मोठा झालाय हे सांगताना शालू वहिनी म्हणते-हे मोहितचे कपडे वाढत्या उंची बरोबर आखूड होतायत; हा त्याचा शर्ट, ही पॅन्ट, हा टॉवेल, बनियन, हे बूट त्याच्या आजोबांनी दिलेत. हे त्याचे मोजे, बघा अजून ओले आहेत. 'मोहित' खरेच आहे हे पटवून देताना शालूवहिनी पुढे म्हणते-कपड्यांना मोहितच्या शरीराचा गंध आहे. त्याच्या घामाचा गंध आहे.
मोहितच्या या कपड्यांच्या तपशीलवार वर्णनातून शालू वहिनीच्या मनात मोहितचे अस्तित्व किती जिवंत आहे, हे नाटककाराने पटवून दिले आहे.
अभिव्यक्ती.
‘प्रत्येकाचीच आई शालूसारखीच पुत्रप्रेमाची भुकेलेली असते’ या विधानाची सत्यता पटवून द्या.
SOLUTION
'ध्यानीमनी' या नाट्यउताच्यात शालूवहिनीच्या व्यक्तिरेखेतून नाटककार प्रशांत दळवी यांनी आईपणाची मूर्ती साकार केली आहे. अपत्यप्राप्ती हा स्त्रीच्या आयुष्यातला परमोच्च आनंद असतो. 'मातृत्व' हे स्त्रीच्या जीवनातले साफल्य आहे. निसर्गतः आईपणाची ओढ स्त्रीला असते. शालूवहिनीही या गोष्टीला अपवाद नाही. तिला अपत्य होत नाही; म्हणून मानसिक पातळीवर 'मोहित' नावाचे काल्पनिक बाळाचे अस्तित्व ती मानते व त्याच्यावर इतकी माया करते की ती सत्य जगातच वावरते आहे, असे वाटू लागते. डॉ. समीरला शालू वहिनी मानसिक रुग्ण वाटते; परंतु शालू वहिनी त्याला मोहितच्या दैनंदिन जगण्याच्या बारीकसारीक गोष्टी तपशीलवार सांगते. तिच्या आंतरिक इच्छेला तिने 'मोहित' नावाचे शरीर दिलेले आहे. यातून नाटककाराने आईला असलेली पुत्रप्रेमाची ओढ अधोरेखित केली आहे.
प्रत्येक स्त्रीच्या मनात ममत्व आणि वात्सल्य यांचा नैसर्गिक झरा वाहत असतो. पुत्रप्राप्तीनंतर हेच वात्सल्य साकार होते व तिच्या आयुष्याची परिपूर्ती होते. अशा प्रकारे शालूवहिनीचे पुत्रप्रेम आहे, तेच प्रत्येक मातेच्या हृदयात वसत असते आणि प्रत्येकाचीच आई शालसारखीच पत्रप्रेमाची भकेलेली असते. या विधानातील सत्यता पटते.
नाट्यउताऱ्याच्या शेवटाबाबत तुमचे विचार लिहा.
SOLUTION
नाटककार प्रशांत दळवी यांनी 'ध्यानीमनी' या नाट्य उताऱ्यात शालू वहिनी व सदानंद यांची दोन मोठी स्वगते लिहिली आहेत. मूल आहेच असे मानणाऱ्या शालूवहिनीच्या स्वगतातून तिच्या मनाच्या खोल डोहातील भावतरंग कळतात. पण नाट्यउताऱ्याचा शेवट । सदाच्या स्वगतातून केल्यामुळे संपूर्ण नाट्यउताऱ्याचा तोल सांभाळला जातो.
सदाच्या म्हणण्यातून त्याच्या मनाची घुसमट आणि समंजसपणा, तटस्थपणा यांची प्रचिती येते. डॉ. समीरला सदा शेवटी असे सांगतो की आपले अस्तित्व स्वयंभू नसते. एकमेकांच्या इच्छेखातर आपण जगतो. तू आमचे प्रश्न समजून घेऊ शकणार नाहीस ; कारण नैसर्गिक विषमतेवर कोणताही वैदयकीय उपचार नाही. आहे ती वस्तुस्थिती मी स्वीकारली आहे व जगण्याचे जीवनसत्त्व दुसऱ्यांना दयायचे मी ठरवले आहे. शालूच्या लेखी आता मोहित अस्तित्वात आहे, हे मान्य करावे लागले नाहीतर आमच्या जगण्यातली ऊर्जा निघून जाऊन आम्ही फक्त पांढरेफटक पडू, बर्फाचे निर्जीव पांढरे गोळे ठरू. तुम्ही आमच्या जगातून निघून जा.
नाट्यउताऱ्याच्या या शेवटामुळे मानसिक इच्छा प्राबल्य मनावर ठसवण्यात नाटककार यशस्वी झाले आहेत. मनातील भावतरंगांवर कोणताही बाह्य उपचार नसतो, ते तसेच स्वयंभूपणे वाहत राहण्यातच स्वाभाविकता आहे, हे तत्त्व शेवटी दृढ केले आहे. त्यामुळे वाचकांची व रसिकांची दिङमढ अवस्था होते.
.
Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free
The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.
• Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ
• Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं
• Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!
• Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके
• Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला
• Chapter 2.11: वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार
• Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय
• Chapter 3.03: सुंदर मी होणार
• Chapter 4.01: सूत्रसंचालन
• Chapter 4.02: मुद्रितशोधन
• Chapter 4.03: अनुवाद
• Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन
• Chapter 4.05: रेडिओजॉकी
• Chapter 5.01: शब्दशक्ती
• Chapter 5.02: काव्यगुण
• Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण
• Chapter 5.04: काळ
• Chapter 5.05: शब्दभेद
.