Advertisement

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi





Chapter 3: सुंदर मी होणार


खालील कृती करा.

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi



SOLUTION

दिदीचे गुणविशेष

१) शारीरिक दुबळेपणा

२) प्रेमळ

३) समजूतदारपणा

४) प्रसंगी कारारीपणा



Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi


SOLUTION

महाराजांची स्वभाववैशिष्ट्ये

१) हेकटपणा

२) मनमानीपणा

३) उद्दामपणा

४) मुजोरपणा

 



महाराजांनी पाठवलेल्या पत्रावर खालील पात्रांच्या प्रतिक्रिया लिहा.

Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi Chapter 3 - सुंदर मी होणार Balbharati solutions for Marathi



SOLUTION

पात्र

प्रतिक्रिया

राजेंद्र

लंडनला जाण्यास ठाम विरोध नाही.

बेबी

लंडनला जाण्यास ठाम विरोध.



खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

पपांचा पांगुळगाडा.



SOLUTION

पपांचा पांगुळगाडा - म्हणजे वडिलांच्या (महाराजांच्या) आधाराशिवाय कोणतीही गोष्ट स्वत:हून न करणे.



मुलांचे चिमणे विश्व


SOLUTION

मुलांचे चिमणे विश्व - म्हणजे आईवडिलांच्या मायेला पारखे झालेले लहान मुलांचे छोटेसे जग.



ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य.


SOLUTION

ब्रेक तुटलेल्या गाडीसारखं आयुष्य - म्हणजे विचार न करता, अविवेकाने आयुष्य कंठणे (जगणे).



थोडक्यात स्पष्ट करा.

‘जीवनाच्या त्या प्रकाशात न्हाऊन आता मला सुंदर व्हायचं आहे!’, या दिदीच्या विधानाचा अर्थ.



SOLUTION

आपल्या वडिलांनी आपल्या आईला प्रेमापासून वंचित ठेवले आणि मुलांवरही प्रेम न करता सतत भीतीने जगवले, हे जेव्हा दिदीला कळते, तेव्हा तिला राजवाडा अपवित्र वाटायला लागतो. वडिलांनी आपल्या प्रकाशमय मुलांना दहशतीच्या अंधारकोठडीत ठेवले हे दिदीला जाणवते व तिचे मानसिक बळ जागृत होते. ती कलावंताशी लग्न करून महाराजांपासून दूर जाण्याचे धाडस करते. म्हणजेच तिला प्रकाशात न्हाऊन सुंदर जीवन जगायचे आहे.



महाराज आणि बेबी यांच्या विचारातील संघर्ष.


SOLUTION

महाराजांच्या मनमानी स्वभावाची कल्पना बेबीला जेव्हा येते, तेव्हा ती त्यांना उघड उघड विरोध करते. तिच्यात अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा कणखरपणा आहे. प्रेम शून्य वडिलांचा ती स्पष्टवक्तेपणाचे निषेध करते व स्वतः दूर जाण्याचा निर्णय घेते. याउलट महाराज हे हेकेखोर आहेत. मी म्हणेन तसेच व्हायला हवे, असा त्यांचा दुराग्रह आहे. बेबी आणि महाराज यांच्या परस्परविरोधी विचारांतून संघर्ष निर्माण झाला आहे.



नाट्यउताऱ्यातील ‘डॉक्टर’ या पात्राची भूमिका.


SOLUTION

नाट्यउताऱ्यामध्ये परस्परविरोधी स्वभावाची पात्रे आहेत. डॉक्टर हे कुटुंबाचे हितचिंतक आहेत. वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या महाराजांच्या मुलांचे संगोपन त्यांनी मुलांच्या लहानपणापासून केले आहे. त्यांना पित्याच्या प्रेमाची उणीव भासू दिली नाही. महाराजांच्या पत्नीच्या विनंतीवरून त्यांनी स्वत: विवाह केला नाही. आयुष्यभर महाराजांच्या कुटुंबाची काळजी घेण्यात ते झिजले. सगळ्यांची मने समजून घेण्याचा कमालीचा संयम व समजूतदारपणा त्यांच्या सालस व प्रामाणिक व्यक्तिमत्त्वात आढळतो. असे डॉक्टरांचे जीवन संस्थानिकाच्या मुलांसाठी पूर्ण समर्पित होते.



स्वमत.

तुम्हांला समजलेली ‘ममी’ ही भूमिका नाट्यउताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.



SOLUTION

 'सुंदर मी होणार' या नाट्यउताऱ्यामध्ये 'ममी' अस्तित्वात नाही; पण 'मामी 'ची व्यक्तिरेखा डॉक्टरांच्या संवादातून उलगडते. महाराज जेव्हा डॉक्टरांना 'नोकरीवरून जा आणि लग्न करा'. असे दोन ओळींचे पत्र पाठवतात, तेव्हा डॉक्टर रुग्णशय्येवर मृत्युपंथाला लागलेल्या 'ममी'ला भेटायला जातात आणि ही हकिकत सांगतात. तेव्हा ममीच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. त्या डॉक्टरांना म्हणतात की, तुम्ही गेलात तर माझ्या पोरांना आई कुठली? या एका वाक्यावरून ममीच्या स्वभावाचे अनेक पैलू कळतात. पुत्रांवर प्रेम न करणारे त्यांचे पती (महाराज) हे कसे हेकेखोर आहेत, हे त्यांना माहीत असते. त्यांचे पती (महाराज) हे कसे हेकेखोर आहेत, हे त्यांना माहीत असते. त्यांचे स्वत:च्या मुलांवर भारी प्रेम असल्यामुळे आपल्या जाण्यानंतर मुलांचे आयुष्य दिशाहीन होईल, हे त्यांना उमगले होते. म्हणून डॉक्टरांना त्या राजवाड्यात थांबायला सांगतात. डॉक्टरही मी चे शब्द अविवाहित राहून पाळतात, यावरून 'ममी'बद्दल त्यांना किती आदर होता, हे कळते.

महाराजांच्या बोलण्यावरून 'ममी' किती एकाकी होत्या, हे कळते. महाराजांचे आपल्यावर तिळमात्र प्रेम नाही, हे माहीत असूनही केवळ मुलांच्या प्रेमाखातर त्या जगत होत्या. त्यांना उंची औषधाची नव्हे तर प्रेमाच्या एका शब्दाची गरज होती, तोही त्यांना आयुष्यात पतीकडन कधीच मिळाला नाही. अशा प्रकारे दु:खाने ओतप्रोत वेढलेली 'मामी' ही व्यक्तिरेखा आहे.



रंगसूचना कथानकातील दुवे कसे जोडतात ते स्पष्ट करा.


SOLUTION

नाट्यसंहिता लिहिताना नाटक कार जसे पात्रांचे संवाद लिहितात, तसे ते अत्यंत महत्त्वाच्या रंगसचना कंसांमध्ये लिहितात. या रंगसूचना दिग्दर्शक व अभिनेता यांना अत्यंत उपयोगी असतात; कारण त्या रंगसूचनांमध्ये नाटकाच्या कथानकाची गती अंतर्भूत असते.

दिदीच्या हातात पत्र येते, तेव्हा (तिचा चेहरा एकदम उतरतो व थकल्यासारखी नेहमीच्या खुर्चीवर येऊन बसते) या रंगसूचनेमुळे दिदीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीला शारीरिक अभिनयाची योग्य दिशा मिळते. (चोळामोळा करून टाकलेल्या पत्राकडे पाहत. पत्राची अवस्था पाहत) या रंगसूचनेनंतर महाराजांचा पुढचा संवाद आहे. येथे दिग्दर्शक व अभिनेता दोघांनाही रंगभूमीवर नाटकातील घटनेतून कोणता परिणामकारक भाव प्रस्थापित करायचा आहे याची यथार्थ कल्पना येते व नाटकात रंग भरतो.

अशा प्रकारे जे संवादात पूर्णपणे नाटककार सांगू शकत नाही, ते रंगसूचनांमुळे नाटककाराला योग्यप्रकारे प्रस्थापित करता येते. रंगसूचनांमुळे नाटकाला गती प्राप्त होतेच, पण वेगवेगळ्या भावांचा आविष्कार करण्यासाठी कथानकातील दुवेही यथार्थपणे जोडले जातात.





अभिव्यक्ती.


राजवाडा आणि नंदनवाडी यांच्यातील अंतर दूर होण्यासाठी त्या काळाचा विचार करून उपाय सूचवा.


SOLUTION

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात अनेक संस्थाने होती. ही संस्थाने खालसा केली गेली. जे संस्थानिक होते, त्यांतील बहुतांश संस्थानिकांची मनोवृत्ती ही हेकेखोर होती. सत्ताधीश म्हणून त्यांच्या वर्तनात रुबाब होता, ऐट होती व नाहक तोरा होता. त्यामुळे राजा व प्रजा यांच्यामधल्या सहभावात फार दरी पडलेली होती. प्रस्तुत नाट्यउताऱ्याच्या संदर्भात यालाच राजवाडा व नंदनवाडी यांच्यातील अंतर असे म्हटले आहे.

राजा हा प्रजेचे पालन करणारा पालक असतो. प्रजेसाठी सखकारी ठरतील अशा योजना कार्यान्वित करणे, हा राजाचा धर्म आहे. त्या काळाचा विचार करता राजवाडा व नंदनवाडी यातले अंतर दूर करण्यासाठी पुढील काही उपाय करायला हवे होते. एकतर राजाने आपला राजवाडा गावापासून वेगळा ठेवायला नको. प्रजेच्या वस्तीस्थानातच राहणे पसंत करावे. राजवाड्याचा दिमाखही थोडा कमी करून कमी क्षेत्राचा राजवाडा सर्वसामान्य दिसेल असा बांधायला हवा. शिवाय प्रजेची देखे जाणून घेण्यासाठी स्वत: जातीने जनता-दरबार भरवायला हवा. प्रजेसाठी योजलेल्या सुखसोयींची अंमलबजावणी होते की नाही, हे स्वतः पाहावे अथवा त्यासाठी निष्ठावंत मंडळींचे कार्यकारी मंडळ असावे. राजेशाहीच्या अंतर्गत लोकशाही नांदायला हवी. आपले कुटुंबही राजाने प्रजेसारखेच मायेने वागवायला हवे. आपले कार्य पुढे नेणारे उत्तराधिकारी । व अनुयायी तयार करणे, हेही परम कर्तव्य समजायला हवे.

 


नाट्यउताऱ्याद्वारे तुम्हांला समजलेला ‘सुंदर’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करा.


SOLUTION

'सुंदर मी होणार' या पु. ल. देशपांडेलिखित नाटकातील प्रस्तुत नाट्यउताऱ्यामध्ये दिदीच्या व्यक्तिरेखेतील बदल अधोरेखित करताना तिच्या संवादातून शेवटी 'सुंदर होणे' या संकल्पनेचा गर्भित अर्थ नाटककारांनी उलगडलेला आहे.

'सुंदर' हा शब्द शरीराचे सौंदर्य या अर्थी येथे अभिप्रेत नाही. हे सौंदर्य व्यक्तिमत्त्वाचे आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व हे तुमच्या मनाच्या प्रगल्भ वैचारिक पातळी वर उठावदार ठरते. तुमची भाषा व तुमचे वर्तन यांतील मेळ महत्त्वाचा आहे. तसेच प्रगत व पुरोगामी विचारसरणीवर तुमचे सामाजिक व्यक्तिमत्त्व तत्त्वनिष्ठ ठरते. मानवतेवर आधारित तुमची वैचारिक बैठक हवी, असे सर्वांगसंपन्न व्यक्तिमत्त्व होणे म्हणजे आपण 'सुंदर' होणे आहे. अशा प्रकारे जाचक बंधने झुगारून स्वातंत्र्यप्रिय असणे व स्वातंत्र्याचा श्वास इतरांना देणे, हा 'सुंदर' शब्दाचा अर्थ आहे.



प्रस्तुत नाट्यउताऱ्यावरून पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची वैशिष्ट्येलिहा.


SOLUTION

पु. ल. देशपांडेलिखित 'सुंदर मी होणार' हे तत्कालीन संस्थानिकाचा एककल्लीपणा व कौटुंबिक संबंध यांच्या संघर्षावर उभारलेले नाटक आहे. प्रस्तुत उताऱ्यात पु. ल. देशपांडे यांच्या संवादलेखनाची काही वैशिष्टे ठळकपणे प्रतीत होतात.

त्या त्या व्यक्तिरेखेच्या स्वभावानुसार त्या त्या पात्राची स्वाभाविक भाषा लिहिणे, हे नाटककाराचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, बेबीच्या तोंडी असलेल्या संवादामधून तिचे निर्भीड व स्वातंत्र्य प्रेमी व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर उभे राहते. 'दिदीचा प्रेमळ स्वभाव व शेवटी व्यक्त झालेला करारीपणा प्रभावी संवादात मांडला गेला आहे. डॉक्टरांच्या संवादातून त्यांचा सोशिक समंजसपणा व उदारमतवाद । तंतोतंत उतरला आहे. तर महाराजांच्या उद्दाम व हेकेखोर संवादातून त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रकट झाले आहे.

अशा प्रकारे स्वभावरेखेतील सूक्ष्म निरीक्षणातून प्रकट झालेली । मार्मिक भाषा व कधी तरल, तर कधी आर्त भाषा ही संवादांची दोन वैशिष्ट्ये या नाट्यउताऱ्यात आपणांस सार्थपणे प्रतीत झाली आहेत.


.

Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board Chapterwise List - Free

The answers for the Balbharati books are the best study material for students. These Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board will help students understand the concepts better.


 • Chapter 1.01: मामू

 • Chapter 1.02: प्राणसई

 • Chapter 1.03: अशी पुस्तकं

 • Chapter 1.04: झाडांच्या मनात जाऊ

 • Chapter 1.05: परिमळ

 • Chapter 1.06: दवांत आलिस भल्या पहाटीं

 • Chapter 2.07: ‘माणूस’ बांधूया!

 • Chapter 2.08: ऐसीं अक्षरें रसिके

 • Chapter 2.09: वहिनींचा ‘सुसाट’ सल्ला

 • Chapter 2.1: शब्द

 • Chapter 2.11: वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

 • Chapter 2.12: पैंजण

 • Chapter 3: नाटक- साहित्यप्रकार-परिचय

 • Chapter 3.01: हसवाफसवी

 • Chapter 3.02: ध्यानीमनी

 • Chapter 3.03: सुंदर मी होणार

 • Chapter 4.01: सूत्रसंचालन

 • Chapter 4.02: मुद्रितशोधन

 • Chapter 4.03: अनुवाद

 • Chapter 4.04: अनुदिनी (ब्लॉग) लेखन

 • Chapter 4.05: रेडिओजॉकी

 • Chapter 5.01: शब्दशक्ती

 • Chapter 5.02: काव्यगुण

 • Chapter 5.03: वाक्यसंश्लेषण

 • Chapter 5.04: काळ

 • Chapter 5.05: शब्दभेद


.