Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे
खालील आकृती पूर्ण करा.
SOLUTION
महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार :
(१) राष्ट्रीय स्वातंत्र्य
(२) संपूर्ण स्वातंत्र्य
SOLUTION
महर्षी कर्वे यांचे स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे विचार :
(१) स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
(२) आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे.
(३) स्त्री शिक्षण घेतलेच पाहिजे.
(४) शांतपणे, सोशीकपणे व सहिष्णू वृत्ती स्त्री-शिक्षणाची चळवळ केली पाहिजे.
SOLUTION
महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने :
(१) पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र
(२) ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य
SOLUTION
महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने :
(१) स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे.
(२) उच्चविद्याविभूषित केली पाहिजे.
(३) स्त्रीला पुरुषाइतकेच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
(४) स्त्री शिकली पाहिजे.
महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.
SOLUTION
हे केव्हा घडेल ते लिहा.
कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल ______
SOLUTION
कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल, जेव्हा पुरुषांचेही 'शिक्षण' होईल.
स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल ______
SOLUTION
स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल, जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.
चौकट पूर्ण करा.
लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा - ______
SOLUTION
लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा - स्थितप्रज्ञ
कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी - ______
SOLUTION
कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी - महर्षी
पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.
स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे - ______
SOLUTION
स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे.
समाजाविरूद्ध विद्रोह केला तर - ______
SOLUTION
समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल.
लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी - ______
SOLUTION
लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी कर्त्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत.
‘कार्य’ या शब्दासाठी पाठात (कर्ते सुधारक कर्वे) आलेली विशेषणे शोधा.
SOLUTION
कार्य या नामाची विशेषणे : मोठे, अतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण, अलौकिक, महान इत्यादी.
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.
शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.
SOLUTION
मनात घर करून राहणे - म्हणजे कायमचे लक्ष्यात राहणे
वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.
SOLUTION
पचनी न पडणे - म्हणजे न समजले किंवा न पटणे.
त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या.
SOLUTION
उभयान्वयी अव्यय - व
पाऊस आला आणि गारा पडल्या.
SOLUTION
उभयान्वयी अव्यय - आणि
तो येणार, कारण त्याला पैशांची गरज आहे.
SOLUTION
उभयान्वयी अव्यय - कारण
आजी म्हणाली, की मी उद्या गावाला जाणार आहे.
SOLUTION
उभयान्वयी अव्यय - की
केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
______! काय सुंदर देखावा आहे हा!
SOLUTION
ओहो! काय सुंदर देखावा आहे हा!
______! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.
SOLUTION
अरेरे! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.
______! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.
SOLUTION
छे! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.
______! आज तू खूप चांगला खेळलास.
SOLUTION
वाहव्या! आज तू खूप चांगला खेळलास.
स्वमत.
‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
SOLUTION
समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी-जास्त भरेल. पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले. त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे, हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे.
‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.
SOLUTION
अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. समाजाने साथ दिली नाहीच; उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वत:चे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई. स्त्री-शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागे. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता. हे सर्व यातनामय होते. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो. परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातनाच सहन कराव्या लागल्या. 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते.
‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.
SOLUTION
अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती याबाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागावता, आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले. अडवणूक झाली. त्यांच्यावर हल्ले झाले. जाता-येता त्यांचे कपडे फाडले गेले. पण ते विचलित झाले नाहीत. घाबरले नाहीत किंवा दुःखी-कष्टीही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले. नव्हे ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे. खूप आवडला आहे.
.
Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]
• Chapter 1: जय जय हे भारत देशा
• Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ
• Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
• Chapter 10.2: मनक्या पेरेन लागा
• Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे
• Chapter 15.1: खोद आणखी थोडेसे
• Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक
• Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी
• Chapter 20.2: व्युत्पत्ती कोश
Author: Balbharati
Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research
Language: Marathi
.