.
Chapter 20: व्युत्पत्ती कोश
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
SOLUTION
व्युत्पत्ती कोशाचे कार्य :
व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखादया शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश!
व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते :
(१) मराठी भाषेतील – प्रमाण व बोली – शब्दांचे मूळ रूप दाखवणे.
(२) विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे.
(३) भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.
(४) भिन्न भिन्न समाजांत वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे.
शब्द तयार होण्याचे विविध प्रकार
SOLUTION
शब्द तयार होण्याचे विविध प्रकार :
दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून.
उदा., इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी शब्द.दुसऱ्याच्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारांतून.
उदा., 'डॅम बीस्ट' याचे जुन्या मराठीतले 'डँबीस' हे रूप.दोन वेगवेगळ्या भाषांतील शब्द आणि प्रत्ययांचे मिश्रण करून.
उदा., फारसी ना हा उपसर्ग + पास हा इंग्रजी शब्द = नापास.प्रत्यय आणि उपसर्ग लागून.
उदा., वारकरी प्रतिसाद
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
SOLUTION
व्युत्पत्ती कोश : एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोशाची मदत घेतो. व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे तर कळतेच परंतु अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे, हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल.
१९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 'व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे' असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर १९४६ साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले.
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
SOLUTION
खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
.
Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]
• Chapter 1: जय जय हे भारत देशा
• Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ
• Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
• Chapter 10.2: मनक्या पेरेन लागा
• Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे
• Chapter 15.1: खोद आणखी थोडेसे
• Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक
• Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी
• Chapter 20.2: व्युत्पत्ती कोश
Author: Balbharati
Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research
Language: Marathi
.