Chapter 8: वाट पाहताना
आकृती पूर्ण करा.
SOLUTION
लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी :
(१) अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड
(२) सकाळी सकाळी शनिवारवाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले
(३) माठातले वाळा घातलेले पाणी
(४) आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई
(५) अंगणभर पसरलेली वाळवणे
(६) कैरीची डाळ आणि पन्हे
SOLUTION
पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी :
१) न पाहिलेले देश
२) न पाहिलेली माणसे
३) न अनुभवलेले प्रसंग
४) न जळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी
SOLUTION
पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये :
१) नुसता पत्रे पोहोचवणारा सरकारी नोकर नाही; भला माणूस आहे.
२) माणसामाणसांमध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवतो.
३) म्हातारीचे वाट पाहणे सुखाचे करणारी रीत जाणतो.
SOLUTION
लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी :
(१) कोकिळाचा कुहुकुहु आवाज
(२) परीक्षेनंतरची सुट्टी
(३) गोष्टी-कवितांची पुस्तके अनेक गोष्टी
(४) उंबराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा
(५) कविता
कारणे शोधा.
आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण ______
SOLUTION
आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं; कारण पहाटे कुहुकुहु ऐकू यावा, ही रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई.
म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण ______
SOLUTION
म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं; कारण दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो व आपल्याला तो त्याच्याकडे नेणार आहे, या कल्पनेने तिचे मन सुखायचे.
पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण ______
SOLUTION
पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा; कारण पुस्तकांतून भाषेची शक्ती, लेखकांच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती.
पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण ______
SOLUTION
पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो; कारण त्या म्हातारीला पुत्रभेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावेत, अशी पोस्टमनची इच्छा होती.
तुलना करा.
SOLUTION
‘वाट पाहणे’ या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
पाठाच्या (वाट पाहताना) शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
SOLUTION
अरुणा ढेरे यांचा 'वाट पाहताना' हा अत्यंत हृदय ललित लेख आहे. जीवनातील एक मूलभूत महत्त्वाचे तत्त्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. तसे पाहिले तर माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करीत असतो. प्रत्येक पावलावर त्याच्या मनात 'नंतर काय होईल?', 'माझ्या स्वप्नांप्रमाणे, कल्पनेप्रमाणे घडेल ना?' अशी तगमग असते. हीच तगमग त्याला पुढे जायला, जीवन जगायला लावते. हे तत्त्व लेखिकांनी अनेक उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे.
सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत. अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते. उंबराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखिकांचे मन हळवे, कोमल होऊन जाते. त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात. वाट पाहण्याने त्यांची निर्मितिशीलता जागृत होते. आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते. या सर्वांत जगण्याचाच अनुभव होता. अस्वस्थता, हुरहुर, दुःख, तगमग, शंकाकुलता हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी, तसेच शेतकरी, वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यांवर लेखिकांना गवसतात. अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात. म्हणून 'वाट पाहताना' हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.
म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.
SOLUTION
एखादी निर्जीव वस्तू पोहोचती करावी, त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्रे देत नसे. कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात. ती माणसांच्या सुखदुःखांनी, आशा-आकांक्षांनी भरलेली असतात. त्यात माणसांचे मन असते, हृदय असते. पत्रांचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते. म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो. ते पत्र खोटे असते. मजकूर खोटा असतो. त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्शसुद्धा त्या पत्राला झालेला नसतो. पण म्हातारी सुखावते. तिचे उरलेले दिवस आनंदात जातात. या विपरीत स्थितीने पोस्टमनचे मन कळवळते. पण म्हातारी सुखावणे हे अधिक मूल्ययुक्त होते. आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उदात्त शिकवण देतो. मुलातला माणूस जागा करतो. माणसाशी माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना असे माणूसपण शिकवले पाहिजे; तरच मानवी समाजाला भविष्य आहे.
‘वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे’, या विधानाची सत्यता पटवून द्या.
SOLUTION
'वाट पाहताना' या पाठात लेखिकांनी जीवनाचा एक सुखमंत्रच सांगितला आहे. वाट पाहणे हा तो मंत्र होय. कोणत्याही गोष्टीसाठी पाहायला शिकले पाहिजे, असे त्यांचे सांगणे आहे. वाट पाहणे हे तसे कधीच सुखाचे नसते. आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते. मन शंकेने व्याकूळ होते. हवी ती गोष्ट आपल्याला मिळेल का? असा प्रश्न मनात काहूर माजवतो.
एखादी गोष्ट वाट न पाहता, चटकन मिळाली, तर ती गोष्ट आपली जिवाभावाची आहे की वरवरची आहे, हे कळायला मार्ग राहत नाही. इच्छा तत्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल, हे खरे आहे. पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टींमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओढ कुठे आहे, हे कळते. म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे, नेमकी कशाची गरज आहे, हे कळून चुकते. जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे, हे शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते. आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते. समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते. म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते, हे खरे आहे.
.
Marathi - Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी - कुमारभारती इयत्ता १० वी]
• Chapter 1: जय जय हे भारत देशा
• Chapter 3: आजी : कुटुंबाचं आगळ
• Chapter 5.2: बालसाहित्यिका : गिरिजा कीर
• Chapter 10.2: मनक्या पेरेन लागा
• Chapter 13: कर्ते सुधारक कर्वे
• Chapter 15.1: खोद आणखी थोडेसे
• Chapter 19: तू झालास मूक समाजाचा नायक
• Chapter 20.1: सर्व विश्वचि व्हावे सुखी
• Chapter 20.2: व्युत्पत्ती कोश
Author: Balbharati
Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research
Language: Marathi
.