विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Kavita
कृती (१) योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.
कृती (१) | Q 1.1 | Page 33
OPTIONS
1) संपूर्ण शरीराला घाम आला
2) घामाने असह्यता आली
3) घामामुळे मन अस्थिर झाले
4) शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली
SOLUTION
तम घाम अंगासी आला, म्हणजे - शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली.
2) मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे -
OPTIONS
1] माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते
2] मनुष्याला इंगळी चावणे वाईट
3] इंगळी मनुष्याचा दारुण पराभव करते
4] मनुष्याला इंगळी नांगा मारते
SOLUTION
मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे - माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते
3) सत्त्व उतारा देऊन, म्हणजे-
OPTIONS
- जीवनसत्त्व देऊन
- सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन
- सात्त्विक आहार देऊन
- सत्त्वाचे महत्त्व सांगून
SOLUTION
सत्त्व उतारा देऊन, म्हणजे - सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन.
4) ‘विंचू चावला वृश्चिक चावला’, शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे
OPTIONS
- भारूड उत्तम गाता येते
- वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो
- भारूडाला अर्थप्राप्त होतो
- भारूड अधिक रंजक बनत
SOLUTION
‘विंचू चावला वृश्चिक चावला’, शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे - वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो
5) कामक्राेधरूपी विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय
SOLUTION
(१) तमोगुण मागे सारणे
(२) सत्त्वगुणाचा अंगारा लावणे
कृती (१) खालील शब्दांचे अर्थ लिहा.
कृती (१) | Q 3.1 | Page 34
1) वृश्चिक ______
SOLUTION
वृश्चिक = विंचू
2) दाह ______
SOLUTION
दाह = आग
3) दारुण ______
SOLUTION
दारुण = भयंकर
कृती (२) खालील ओळींचा अर्थलिहा.
कृती (२) | Q 1 | Page 34
1) ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरां ।।
SOLUTION
अर्थ : काम-क्रोधरूपी विंचू चावला, तर त्याचा दाह शमवण्यासाठी उपाय सांगताना संत एकनाथ महाराज म्हणतात - विंचवाच्या दंशाची वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातली तामसी वृत्ती व दुर्गुण टाकून दया. त्यांचा त्याग करा. दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्त्विक गुणांचा अंगारा लावा. म्हणजे विंचू-इंगळीरूपी विकार पटकन दूर होतील.
कृती (३) काव्यसौंदर्य - विंचू चावला
कृती (३) | Q 1 | Page 34
1) सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।।४।।
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
SOLUTION
'विंचू चावला' या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम-क्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा, याचा ऊहापोह केला आहे.
संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकूळ होतो. त्याचा दाह कमी करायचा असेल, तर त्यावर सत्त्वगुणाचा अंगारा लावावा. मग सत्त्वगुणाच्या उताऱ्याने तमोगुण मागे सारता येतो. या सत्त्वगुणाच्या उताऱ्याने वेदना शमते. पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच, तर गुरू जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी. अशा प्रकारे विंचवावरचा जालीम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितला आहे.
तमोगुण व सात्त्विक गुण यांचा परिणाम या ओळींमध्ये संत एकनाथ महाराजांनी प्रत्ययकारीरीत्या वर्णिला आहे. त्यातील अनोखे नाट्य जनांच्या मनाला उपदेशपर शिकवण देते.
कृती (४) रसग्रहण - विंचू चावला
कृती (४) | Q 1 | Page 34
1) खालील ओळींचे रसग्रहण करा.
विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।१।।
मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।२।।
SOLUTION
आशयसौंदर्य : संत एकनाथ महाराज यांनी 'विंचू चावला' या भारुडामध्ये दुर्गुणांवर कसा विजय मिळवावा व सत्संगाने काम-क्रोधरूपी विंचवाचा दाह कसा शमवावा, याची महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे. काम-क्रोधरूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारतात नाट्यमयरीत्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे.
काव्यसौंदर्य : काम-क्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो, तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो. तामसवृत्ती उफाळून येते. त्यामुळे जीव व्याकूळ होऊन प्राणांतिक वेदना होतात. साऱ्या अंगाला दाह होतो; कारण मनुष्यरूपी इंगळी अतिभयंकर आहे. तिचा डंख तापदायक व वेदनेचे आगर असते. असा उपरोक्त ओळींचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने सार्थपणे व्यक्त होतो.
भाषिक वैशिष्ट्ये : लोकशिक्षण देणारे 'विंचू चावला' हे आध्यात्मिक रूपक आहे. या भारुडाची भाषा द्विरुक्तपूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढली आहे. यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते. षड्विकारांवर सद्गुणांनी मात करा, असा मोलाचा संदेश हे भारूड देते. 'विंचू, वृश्चिक व इंगळी' अशा चढत्या भाजणीचे शब्द विषाचा विखार दाखवतात. 'तमघाम, दाह, दारुण, वेदना अशा शब्दबंधामुळे डंखाची गती आवेगाने मनात होते. ही भारूड रचना विलक्षण नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी ठरली आहे.
कृती (५) अभिव्यक्ती - विंचू चावला
1) तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल तेलिहा.s
SOLUTION
माझ्यातील दुर्गुण मला आधी मुळीच कळत नव्हते; पण माझ्या आईने एकदा ते मायेने समजावून सांगितले. माझ्यातला पहिला दुर्गुण म्हणजे मी खूप रागावतो. मनासारखे काही झाले नाही की, मी वैतागून समोरच्याला बोलतो. दुसरा असा की, मी वेळेवर जेवण, झोप घेत नाही आणि वेळेवर उठत नाही. त्यामुळे माझा दिनक्रम विस्कटतो. हे दुर्गुण जेव्हा शांतपणे मला माझ्या आईने सांगितले, तेव्हा मी मनस्वी नीट विचार केला. मी हे दुर्गुण सुधारण्यासाठी काही उपाय केले.
पहिले म्हणजे राग हा स्वाभाविक जरी असला, तरी तो नाहक आहे, हे जाणून घेतले. एखादया गोष्टीचा राग जरी आला तरी तो योग्य आहे का, याची शहानिशा मी मनाशी करू लागलो नि माझ्या लक्षात आले की, माझ्या शीघ्रकोपीपणामुळे घरची माणसे दुखावतात. म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण केले नि दुसऱ्यांची बाजू समजून घेण्याची सवय केली. तसेच जेवण व झोप वेळेवर घेण्यासाठी मी काटेकोरपणे प्रयत्न केले आणि नेमके कधी झोपेतून उठायचे, ती वेळ निश्चित केली. खूप प्रयत्नांनी मला याही गोष्टीत यश आले. मग मी आईचा लाडका चिरंजीव झालो.
2) ‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’, स्पष्ट करा.
SOLUTION
'विंचू चावला' या भारुडामध्ये संत एकनाथ महाराज यांनी दुर्गुणरूपी विंचू चावल्यावर कोणत्या उपायाने त्याचा दाह कमी करावा, यांचा उपदेश मार्मिक प्रतीकांतून केला आहे.
संत एकनाथ महाराज म्हणतात – काम-क्रोधरूपी विंचू महाभयानक आहे. तो एकदा चावला की त्याचा दाह पंचप्राण व्याकूळ करतो. येथे काम-क्रोधरूपी विंचू म्हणजे दुर्गुण होत. म्हणजे दुर्गुण हे दुर्जनांच्या ठायी वसलेले असतात. त्यामुळे दुर्जन माणसांची संगत करणे म्हणजे इंगळीचा दंश घेणे होय. दुर्जनांची संगत ही दंशाइतकी दाहक असते. तुम्ही दुर्जनांच्या संगतीने दुर्जन होता. म्हणून यावर उपाय एकच आहे. सद्गुणांचा अंगीकार करणे. म्हणून सज्जन व्यक्तींच्या संगतीत राहायला हवे. सत्संग सदा घडायला हवा. म्हणजे दुर्गुणांचा दाह शांत करता येईल. सज्जन माणसाच्या संगतीने आपल्यातले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे, असे संत एकनाथ महाराज म्हणतात.
विंचू चावला भारुड 12वी मराठी | Vinchu Chavala Marathi Bharud
विंचू चावला वृश्चिक चावला ।कामक्रोध विंचू चावला ।तम घाम अंगासी आला ।।धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।त्याने माझा प्राण चालिला ।सर्वांगाचा दाह झाला ।।१।।मनुष्य इंगळी अति दारुण ।मज नांगा मारिला तिनें ।सर्वांगी वेदना जाण ।त्या इंगळीची ।।२।।
ह्या विंचवाला उतारा ।तमोगुण मागें सारा ।सत्त्वगुण लावा अंगारा ।विंचू इंगळी उतरे झरझरां ।।३।।
सत्त्व उतारा देऊन ।अवघा सारिला तमोगुण ।किंचित् राहिली फुणफुण ।शांत केली जनार्दनें ।।४।।
ह्या विंचवाला उतारा ।
तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरां ।।३।।
सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।।४।।
अनुक्रमणिका / INDIEX
Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1.03: आयुष्य... आनंदाचा उत्सव
Chapter 1.04: रे थांब जरा आषाढघना
Chapter 1.06: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
Chapter 2.09: समुद्र कोंडून पडलाय
Chapter 2.12: रंगरेषा व्यंगरेषा
Chapter 3: कथा-साहि त्यप्र कार-परिचय
Chapter 5.01: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
Chapter 5.02: लेखन : निबंधलेखन
HSC Marathi Question Paper 2020 PDF - Std 12th Science, Commerce & Arts - Maharashtra Board
Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Author: Balbharati
Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research
Language: Marathi
Also Read: मराठी निबंध यादी
.