आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन) |
आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
कृती (१) कृती करा.
1)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या उताऱ्यातून जाणवणारे गुण
SOLUTION
(१) दीर्घोदयोगी
(२) गरिबांबद्दल कळकळ
2) व्यक्तीच्या दीर्घोद्योगाचा परिणाम
SOLUTION
(१) व्यक्ती पराक्रमी बनते.
(२) व्यक्ती बुद्धिमान बनते.
नमुना कृती (२) अभिव्यक्ती.
नमुना कृती (२) | Q 1 | Page 31
1) व्यक्तीच्या जीवनातील ‘आत्मविश्वासाचे’ स्थान स्पष्ट करा.
SOLUTION
आत्मविश्वास म्हणजे स्वत:चा स्वत:वरील विश्वास. व्यक्तीच्या जीवनात या आत्मविश्वासाला खूप महत्त्व असते. आपल्या क्षमतांची ओळख पटली की आपण कोणकोणती कामे करू शकतो, ते कळते. मग आपण आपल्याला जमणारी कामे निवडतो. आपल्याला काम करताना त्रास होत नाही. त्याचे कष्ट जाणवत नाहीत. उलट, ते काम करताना आपल्याला आनंद मिलतो. अशी आवडीची कामे करीत जगणे म्हणजे आनंदी जीवन होय.
आपले जीवन आनंददायक व्हायचे असेल, तर आपल्याला आवडती कामे करायला मिळाली पाहिजेत. त्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे. तशी ती कळली, तर आपल्याला आत्मविश्वास येईल. म्हणजेच, आनंदी, सुखी जीवनासाठी आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वासामुळे आपण कितीही कामे करू शकतो. कितीही कठीण कामे करू शकतो. खूप कामे करणे दीर्घोदयोग. दीर्घोदयोगामुळे आपल्या हातून खूप कामे होतात. विशिष्ट क्षेत्रात आपली कीर्ती पसरते. म्हणजेच आपण पराक्रमी बनतो.
आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. खूप कामे करण्यामुळे कामे अचूक कशी करावीत, भरभर कशी करावीत, हे कौशल्य आपला मेंदू वाढवीत नेतो, हीच बुद्धिमत्ता होय. थोडक्यात, आत्मविश्वासामुळे माणूस पराक्रमी व बुद्धिमान होतो, हे बाबासाहेबांचे म्हणणे अक्षरशः खरे आहे.
आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Atamavishvas Sarakha Sakati Nahi
आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदा., कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो, की मी जे करीन ते होईल. अर्थात, मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील; परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो.
मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबांतील गरीब विद्यार्थ्यापेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आईबाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हांस आजच्या साधनसामग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल?
कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थिदशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास ८ वर्षे लागतात तो अभ्यास मी २ वर्षे ३ महिन्यात यशस्वी तऱ्हेने पुरा केला. हे करण्यासाठी २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी २४ तासांपैकी सारखा १८ तास अजूनही खुर्चीवर बसून काम करत असतो. दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
अनुक्रमणिका / INDIEX
Balbharati Solutions for Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Chapter 1.03: आयुष्य... आनंदाचा उत्सव
Chapter 1.04: रे थांब जरा आषाढघना
Chapter 1.06: आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (नमुना गद्य आकलन)
Chapter 2.09: समुद्र कोंडून पडलाय
Chapter 2.12: रंगरेषा व्यंगरेषा
Chapter 3: कथा-साहि त्यप्र कार-परिचय
Chapter 5.01: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार
Chapter 5.02: लेखन : निबंधलेखन
HSC Marathi Question Paper 2020 PDF - Std 12th Science, Commerce & Arts - Maharashtra Board
Marathi - Yuvakbharati 12th Standard HSC Maharashtra State Board
Author: Balbharati
Publisher: Maharashtra State Bureau of Textbook Production and Curriculum Research
Language: Marathi
Also Read: मराठी निबंध यादी
.