Chapter 10: रंग साहित्याचे
'रंग साहित्याचे' या पाठात आलेल्या साहित्य प्रकारांची नावे लिहा.
SOLUTION
साहित्य प्रकारांची नावे:
कथा
कादंबरी
कविता
नाटक
चरित्र
आत्मचरित्र
प्रवासवर्णन
आकृतिबंध पूर्ण करा.
SOLUTION
कथेचे प्रकार:
१. परीकथा
२. बोधकथा
३. विज्ञानकथा
४. ऐतिहासिक कथा
५. साहस कथा
SOLUTION
कवितेची वैशिष्ट्ये:
१. छोटेसे आणि आटोपशीर रूप
२. मोजक्या शब्दांत मोठ्ठा आशय व्यक्त करणे
३. शब्दालंकार व अर्थालंकारांमधून येणारी आशयगर्भता
४. अर्थपूर्ण व चपखल शब्दरचना
५. कल्पनांचा सुंदर आविष्कार
६. स्वराचा साज चढताच गाण्यात रूपांतर
SOLUTION
कवी कुसुमाग्रज:
१. नाटक- नटसम्राट
२. प्राप्त पुरस्कार- ज्ञानपीठ
३. मूळ नाव- वि.वा. शिरवाडकर
४. काव्यसंग्रह- विशाखा
फरक स्पष्ट करा.
SOLUTION
खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून एक वाक्य तयार करा.
रस्ते
SOLUTION
रस्ते- रस्ता
वाक्य: रस्ता नागमोडी वळणे घेत गावापर्यंत पोहोचला.
वेळा
SOLUTION
वेळा- वेळ
वाक्य: जेवणाची वेळ झाली तरीही रमाकांत घरात आला नव्हता.
भिंती
SOLUTION
भिंती- भिंत
वाक्य: वाड्याची मागची भिंत पूर्णपणे खचली होती.
विहिरी
SOLUTION
विहिरी- विहीर
वाक्य: गावी परसातच एक जुनी विहीर होती.
घड्याळे
SOLUTION
घड्याळे- घड्याळ
वाक्य: मामा शहरातून काव्यासाठी घड्याळ घेऊन आला.
माणसे
SOLUTION
माणसे- माणूस
वाक्य: दुपारी उन्हामुळे रस्त्यात एकही माणूस दिसत नव्हता.
खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.
SOLUTION
परप्रांत, परभाषा, परदेश, परग्रह, परराष्ट्र.
खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून तक्ता पूर्ण करा.
[यथामती, प्रतिदिन, आईवडील, चारपाच, त्रिभुवन, केरकचरा, भाजीपाला, चहापाणी, आजन्म, गैरशिस्त, विटीदांडू, पापपुण्य, स्त्रीपुरुष]
SOLUTION
पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे लिहा
SOLUTION
पुस्तके नि:स्वार्थी मित्र असतात. त्यांच्याशी मैत्री केल्यास अनेक फायदे होतात. हे मित्र आपली साथ कधीच सोडत नाहीत. आपल्या अस्तित्वाने ते सर्वांचाच एकटेपणा दूर करतात. त्यांना आपल्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा नसते. ती फक्त स्वत:जवळील ज्ञान देत राहतात. जगभरातल्या प्रचंड माहितीचा खजिना आपल्यासमोर खुला करून देतात. आपले मनोरंजन करून जीवनातील तोचतोचपणा, रटाळपणा दूर करतात. चांगले विचार, मूल्ये, संस्कार वाचकांना पुरवतात. आयुष्याला योग्य दिशा देण्याचे काम करतात. ही पुस्तके आपले अनुभवविश्व संपन्न करतात. आपल्याला 'माणूस' म्हणून समृद्ध करतात. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन मिळतात. विचारांना, लेखनाला चालना मिळते, आनंद मिळतो, म्हणूनच वाचकाला आयुष्यभर भरभरून देणारी पुस्तके ही उत्तम मित्र असतात.
तुम्हांला आवडलेल्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
मराठी भाषा विविध साहित्यप्रकारांनी नटलेली आहे. सर्व साहित्यप्रकारांतील 'कविता' हा साहित्यप्रकार माझ्या विशेष आवडीचा आहे. आकाराने लहान असूनही मोठा विचार व्यक्त करण्याचा, मोजकेच; पण योग्य शब्द वापरून अर्थ सांगण्याचा तिचा गुण मला आवडतो. दर वेळी जेव्हा मी कविता वाचतो तेव्हा नवे काहीतरी सापडल्याचा आनंद होतो. त्यात वापरलेले अलंकार, नाद निर्माण करणारे शब्द हे कवितेला साैंदर्य प्राप्त करून देतात. विविध कल्पना, भावना, विचार यांचे आविष्कार कवितांमधून चटकन वाचकांपर्यंत पोहोचतात. काही कवितांना चाल लावून त्यांचे गाण्यांमध्येही रूपांतर झालेले दिसते. मनातील भावना नेमकेपणाने व्यक्त करण्याचा गुण कवितेला इतर साहित्यप्रकारांहून वेगळा ठरवतो. त्यामुळे, मला कविता हा काव्यप्रकार फार आवडतो.
‘उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
SOLUTION
उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते' हे विधान मला पटते. वाचनामुळे विविध साहित्यप्रकार परिचयाचे होतात. त्या-त्या साहित्यप्रकारांची वैशिष्ट्ये लक्षात येतात. साहित्याच्या वाचनाने आपले अनुभवविश्व समृद्ध होते, विचारांना चालना मिळते. म्हणजेच, मनोरंजनासोबत ज्ञानही वाढते. अधिकाधिक शब्दसंपत्ती मिळवता येते. एकच साहित्यप्रकार वेगवेगळ्या लेखकांनी कसा हाताळला याचे ज्ञान मिळते. या अभ्यासातून आपल्याला आपली लेखनशैली निश्चित करता येते. साहित्याच्या वाचनाने आलेली प्रगल्भता व शब्दसामर्थ्य लेखनाच्या माध्यमातून कागदावर उमटते. त्यामुळेच, लेखन करण्यासाठी वाचनाची खूप आवश्यकता असते असे मला वाटते.
तुम्हांला आवडलेल्या पुस्तकाबाबत खालील मुद्द्यांचा विचार करून माहिती लिहा.
(१) पुस्तकाचे नाव
(२) लेखक
(३) साहित्यप्रकार
(४) वर्ण्यविषय
(५) मध्यवर्ती कल्पना
(६) पुस्तकातून मिळणारा संदेश
(७) मूल्य
(८) सामाजिक महत्त्व
(९) आवडण्याची कारणे
SOLUTION
(१) पुस्तकाचे नाव- श्यामची आई
(२) लेखक- साने गुरुजी
(३) साहित्यप्रकार- कादंबरी
(४) वर्ण्यविषय- श्यामवर बालपणात त्याच्या आईने केलेले सुसंस्कार
(५) मध्यवर्ती कल्पना- श्यामच्या आईने श्यामचे आयुष्य कसे समृद्ध केले याची कहाणी
(६) पुस्तकातून मिळणारा संदेश- चांगला माणूस होण्यासाठी कोणते संस्कार व गुण अंगी रुजवावेत, यांची शिकवण मिळते.
(७) मूल्य- शिक्षणाचे, संस्काराचे व्यवहारज्ञानाचे व व्यक्तिमत्त्व विकासाचे मूल्य.
(८) सामाजिक महत्त्व- सामाजिक बांधिलकी कशी जोपासली व मानवतावाद हाच खरा धर्म ही तत्त्वे लक्षात येतात. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांची जाणीव होते.
(९) आवडण्याची कारणे- लहान मूल म्हणजे मातीचा गोळा! श्यामवर त्याच्या आईने ममतेने संस्कार करून श्यामचे मानवतावादी व्यक्तिमत्त्व घडवले. श्यामच्या आईचा या श्यामचा आदर्श प्रत्येकाने अंगिकारावा ही शिकवण ही कादंबरी देते म्हणून जनमानसात ती प्रिय आहे.