Advertisement

Chapter 11: जंगल डायरी Balbharati solutions for मराठी - अक्षरभारती इयत्ता १० वी Marathi - Aksharbharati 10th Standard SSC | Maharashtra State Board | Second Language

Chapter 11: जंगल डायरी


लेखकाने बिबळ्याची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.

(१) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.

(२) __________________

(३) __________________

(४) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.

(५) __________________

(६) __________________

(७) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.




SOLUTION

(१) जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली.

(२) लेखकाने सगळ्यांना हातानंच थांबायची खूण केली.

(३) लेखकाने दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली.

(४) तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळ्या बसला होता.

(५) त्याचा रंग आसपासच्या परिसराशी मिसळून गेला होता, शेपूट हलल्यामुळे तो लेखकांस दिसला.

(६) त्याची पाठ लेखक व साथीदारांकडे असल्यामुळे बिबळ्याने त्यांना पाहिलं नव्हतं.

(७) वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला.



कारणे लिहा.

वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण __________



SOLUTION

वाघिणीने मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली, कारण रात्रभर शिकारीसाठी भटकंती करून, वाघीण थकून पाण्यात विश्रांती घ्यायला बसली होती; नेमके तेव्हाच पिल्लांनी पाण्यात उडी मारून तिच्या तोंडावर पाणी उडवले.



 वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण _________


SOLUTION

वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल दक्ष होती, कारण जंगलातील इतर नरवाघ, बिबळा, रानकुत्री हे सर्व प्राणी वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू असल्यामुळे तिच्या पिल्लांना या भक्षकांपासून धोका होता.


विशेष्य आणि विशेषण यांच्या जोड्या लावा.

वाळक्या

जंगल

दाट

खेळकर

कान

पिल्लं

अनामिक

दडपण

तिखट

काटक्या



SOLUTION

(१) वाळक्या- काटक्या

(२) खेळकर- पिल्लं

(३) दाट- जंगल

(४) तिखट- कान

(५) अनामिक- दडपण



'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली', हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


SOLUTION

लेखकाने वर्णन केल्याप्रमाणे शिकारीला जाताना वाघिणीनं आपल्या पिल्लांना दाट झुडपात लपवून ठेवलं होतं. ती शिकारीसाठी रात्रभर भटकंती करत असतानाही तिचं मन मात्र पिल्लांकडे लागलेलं होतं, म्हणूनच तिने जागेवर परत येताच लगेच पिल्लांना हाक मारली. रात्रभर पायपीट करून थकली भागली असली, तरी त्या त्रासाचा राग तिनं पिल्लांवर काढला नाही. उलट, पिल्लांनी अंगावर उड्या मारल्या, दंगामस्ती करून त्रास दिला तरी ती फारशी रागावली नाही. पिल्लांचं पोट भरावं म्हणून तिने मोठ्या कष्टाने शिकार केली होती आणि त्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी ती त्यांना शिकारीकडे घेऊन गेली. जंगलात जाताना आपली सगळी पिल्लं आपल्या सोबत असावीत याचीही तिनं काळजी घेतली होती. या सगळ्या घटनांवरून हे स्पष्ट होते, की वाघिणीला पिल्लांच्या सुरक्षेची खूप काळजी होती. ती कुठेही गेली तरी तिचं मन नेहमी पिल्लांकडे एकवटलेलं होतं, पिल्लांसाठी कितीही त्रास सोसण्याची तिची तयारी होती. पिल्लांना व्यवस्थित खाऊपिऊ घालण्याबाबत ती सावधान होती. एखादी प्रेमळ, दक्ष, कर्तव्यतत्पर आई, आपल्या बाळाचं जसं संगोपन करते, तसंच ती आपल्या पिल्लांचं संगोपन करत होती. त्यामुळेच, लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली.



वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा.


SOLUTION

मुलांपासून दूर गेलेली आई परत आल्यानंतर आई व मुले दोघांनाही खूप आनंद होतो. ह्या पाठातील वाघीण आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी सोडून रात्री शिकारीला गेलेली होती. सकाळी पिल्लांजवळ परत येताच तिने त्यांना हाक मारली. आईची हाक कानावर पडल्यामुळे पिल्लांना खूप आनंद झाला. लपून बसलेली ती पिल्ले खेळकरपणे पटापट आईकडे झेपावली, तिच्या अंगावरही उड्या मारू लागली. एक पिल्लू तिच्या पाठीवर उडी मारताना घसरून धपकन पाण्यात पडलं; पण आपण पडलोय याचंही त्याला भान नव्हतं. आपली आई खूप थकून आलीय आणि तिला विश्रांतीची गरज आहे याचंही त्यांना भान नव्हतं. थकल्या – भागलेल्या वाघिणीला खरंतर या गोंधळाचा त्रास होत होता; पण ती त्यांच्यावर फारशी रागवली नाही. कदाचित तिलाही त्यांच्या आनंदामुळे जणू सुखच मिळत असावं. आई व मुलांच्या भेटीचा हा प्रसंग मनाला भिडणारा आहे.



डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा, याविषयी तुमचे मत लिहा.


SOLUTION

डायरी म्हणजे आपल्या आयुष्यातील घटना-प्रसंगाचे जणू कोलाजच. प्रत्येक दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना, आठवणी शब्दांत कैद करून डायरीच्या रूपाने नेहमी सोबत ठेवता येतात. या रोज लिहिलेल्या डायरीमुळे आयुष्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन लाभतो. आपल्या भाव-भावना, आपले विचार, रोजच्या घटना या डायरीमध्ये आपण लिहित असतो. आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त झाल्यामुळे शांत वाटते. शिवाय, घटना घडून गेल्यानंतर त्याविषयी शांतपणे लिहिताना आपण अधिक सारासार विचार करू शकतो. त्यामुळे, स्वत:मध्ये सुधारणा करता येते. शिवाय, लेखनाची सवय लागून त्यातही सुधारणा होते, म्हणूनच छंद म्हणून या गोष्टीची जोपासना प्रत्येकानेच करावी असे मला वाटते.