Advertisement

Chapter 13: हिरवंगार झाडासारखं Balbharati solutions for मराठी - अक्षरभारती इयत्ता १० वी Marathi - Aksharbharati 10th Standard SSC | Maharashtra State Board | Second Language

Chapter 13: हिरवंगार झाडासारखं




वाक्य पूर्ण करा.

कवीने झाडाला दिलेली उपमा- 



SOLUTION

कवीने झाडाला दिलेली उपमा- ध्यानस्थ ऋषी



पानझडीनंतरचे, नवी वस्त्रेधारण करणारे झाड म्हणजे- 


SOLUTION

पानझडीनंतरचे, नवी वस्त्रेधारण करणारे झाड म्हणजे- नव्या नवरीसारखे



कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे- 


SOLUTION

कवीच्या मते उत्साही आयुष्य म्हणजे- नुकतेच खुडलेले टवटवीत फूल



अलगद उतरणारे थेंब- 


SOLUTION

अलगद उतरणारे थेंब- दवांचे टपोरे थेंब.



फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ- 


SOLUTION

फुटते शरीरभर पालवी याचा अर्थ- शरीरभर चैतन्य सळसळते



आकृती पूर्ण करा.



SOLUTION

झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी-

१. हिरवा रंग शरीरभर विरघळतो

२. रक्त क्षणभर हिरवेगार होते

३. आयुष्य नुकत्याच खुडलेल्या फुलाप्रमाणे टवटवीत, प्रसन्न होते.




एका वाक्यात उत्तरे लिहा.


झाडाच्या जीवनाचं गाणं कशात दडलेलं असतं?

SOLUTION

झाडाच्या जीवनाचं गाणं झाडांवर बसलेल्या पक्ष्यांच्या मंजुळ किलबिलाटात दडलेलं असतं.



झाडाच्या मुळावर घाव घातल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असते?


SOLUTION

झाडाच्या मुळावर घाव घातला तरी ते मुकाटपणे सहन करते.



‘पानझडीनंतर’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


SOLUTION

झाड हे नव्या नवरीप्रमाणे नवीन वस्त्रे केव्हा धारण करते?


खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

हसावं कसं सळसळत्या पानासारखं.



SOLUTION

पानांची सळसळ ऐकायला नादमधुर, मंजुळ वाटते. वाऱ्याच्या झुळकीने हलणाऱ्या पानांत सामावलेला नाद झाड दिलखुलासपणे व्यक्त करते. आपणही पानासारखे तितक्याच मनमोकळेपणाने, दिलखुलासपणे हसले पाहिजे, असे कवी वरील काव्यपंक्तींतून सांगू पाहत आहे.



जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं.


SOLUTION

हिरवेगार झाड सदा प्रसन्न, ताजे, टवटवीत व डोळ्यांना आल्हाद देणारे असते. ते शीतल छाया प्रदान करते. त्याचे अस्तित्व जणू परोपकाराकरताच असते. त्याची सहनशीलता, दातृत्वगुण, परोपकाराची वृत्ती, खंबीरपणा आपल्यातही भिनावा हेच कवी प्रस्तुत काव्यपंक्तीद्वारे मांडू पाहत आहे.



खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर

अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब’



SOLUTION

वरील काव्यपंक्ती ही जॉर्ज लोपीस यांच्या 'हिरवंगार झाडासारखं' या कवितेतील आहे. सहनशीलता, परोपकारी वृत्ती, नेहमी सर्वांना भरभरून देत राहण्याचा दानीपणाचा गुण, कठीण प्रसंगातही न डगमगता पाय रोवून राहण्याचा खंबीरपणा हे झाडाचे गुण आपणही आपल्यामध्ये आणावेत असा संदेश कवी देत आहे. 

झाडांच्या अनेक परोपकारांपैकी आणखी एक परोपकार म्हणजे झाडांपासून होणारी कागदनिर्मिती. जेव्हा झाडाच्या पानांचे रूपांतर कागदात होते, तेव्हा त्या पानांवरील दवबिंदू 'अक्षरे' बनून वहीच्या पानावर अलगद उतरतात, अशी सुंदर कल्पना कवी येथे करत आहे. वास्तव अतिशय तरल शब्दांत कवीने येथे मांडले आहे.



‘झाडाचे मानवी जीवनातील स्थान’, याविषयी तुमचे विचार लिहा.


SOLUTION

मानवी जीवनात झाडाचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. झाडांचे अस्तित्व माणसात चैतन्य निर्माण करते. झाडे असतील, तर तेथे पक्षी, प्राणी राहतात. त्यांच्या किलबिलाटाने, आवाजाने वातावरण प्रसन्न होते. घनदाट वृक्षराजीमुळे जलचक्र सुरळीत चालते. पाऊस पुरेशा प्रमाणात व वेळेवर पडतो.

झाडांच्या दाट सावलीत थकलाभागला वाटसरू विश्रांती घेतो. तेथे त्याला विसावा मिळतो, शांती मिळते. तापलेल्या उन्हापासून बचाव होतो. झाडांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. हिरव्यागार झाडांमुळे सृष्टीत अनोखे साैंदर्य पाहायला मिळते, वातावरण ताजे, प्रफुल्लित होते.

झाडे नसतील, तर सर्व वातावरण भकास होईल. डोंगर उघडेबोडके होतील. पक्ष्यांची, प्राण्यांची निवासस्थाने नष्ट होतील. तापमानात वाढ होईल. जलचक्र बिघडेल, शेतीभातीचे नुकसान होईल. असे सर्व वाईट परिणाम टाळण्याकरता झाडे लावणे व टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.



‘झाडापासून आनंदी जगणे शिकावे’, या विधानातील विचार स्पष्ट करा


SOLUTION

हिरव्यागार झाडाकडे पाहिल्यावर आपले मन ताजेतवाने होते. झाड इतरांकडून कशाचीही अपेक्षा ठेवत नाही. त्याच्या मुळावर घाव घालणाऱ्याचे घावही ते निमूटपणे सहन करते; आपला दानीपणा सोडत नाही. नेहमी आनंदाचे गाणे गाते. सळसळत्या पानांतून आपल्याला हसण्याचे मार्गदर्शन करते. पक्ष्यांच्या मंजुळ नादात ते आपल्या जीवनाचे गाणे गात असते. अशा झाडाच्या सहवासात आपल्याला विश्रांती मिळतेच, शिवाय मनाची शांती प्राप्त होते. आपल्यात चैतन्य सळसळू लागते, नवा उत्साह प्राप्त होतो. त्याचे संपूर्ण अस्तित्वच प्रसन्नता, सहनशीलता, दानीपणा, उत्साहीपणा, परोपकारी वृत्ती अशा गुणांनी भरलेले असते. त्याच्या या सर्व गुणांचा स्वीकार करून त्याच्यापासून आनंदी जीवन जगणे शिकायला हवे असा विचार या कवितेत मांडला आहे.