Advertisement

Chapter 15: खरा नागरिक Balbharati solutions for मराठी - अक्षरभारती इयत्ता १० वी Marathi - Aksharbharati 10th Standard SSC | Maharashtra State Board | Second Language

Chapter 15: खरा नागरिक


आकृती पूर्ण करा.




SOLUTION

भडसावळे गुरुजींच्या मते- सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते कारण- 

१. सकाळचे वातावरण टवटवीत आणि प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो.

२. पुरेशा विश्रांतीमुळे शरीर ताजेतवाने असते.

३. प्रसन्न वातावरणामुळे मन अभ्यासात चटकन लागते.

४. हवेत सुखद गारवा असतो.

५. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरील भक्तिगीत ऐकू येत असते.

६. पक्ष्यांचे सुमधुर संगीत साथीला असते.







SOLUTION

खऱ्या नागरिकाची कर्तव्ये:

१. समाजाविषयीचे कर्तव्य बजावणे

२. इतरांना उपद्रव होणार नाही असे वागणे

३. व्यक्तिगत स्वार्थापेक्षा समाजाच्या हिताला जास्त महत्त्व देणे

४. आपले काम प्रामाणिकपणे करणे.





खालील घटनांचे परिणाम लिहा. 

घटना

परिणाम

(१) निरंजनच्या आई-वडिलांचे निधन

 

(२) निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा.

 



SOLUTION

घटना

परिणाम

(१) निरंजनच्या आईवडिलांचे निधन

काही दिवस मामाने त्याचा सांभाळ केला व त्यानंतर चिपळूणला मावशीकडे आणून सोडले. निरंजन मावशीकडे पडेल ती कामे करून अभ्यासही करायचा.

(२) निरंजनचा परीक्षेत पहिला नंबर यायचा.

भडसावळे गुरुजींनी त्याला वेगवेगळ्या घरी वार लावून दिले व त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्चही गुरुजींनी उचलला.



निरंजनची दिनचर्या लिहा.

निरंजनची दिनचर्या

_________________________

_________________________

_________________________

_________________________

↓ 

_________________________



SOLUTION

निरंजनची दिनचर्या

सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामे आटपत असे.

अभ्यासाला बसत असे.

वार लावून दिलेल्या ठिकाणी दुपारी जेवायला जात असे.

तिथून शाळेत जात असे.

↓ 

संध्याकाळी मावशीकडे जे मिळेल ते खाऊन राहत असे.



खालील शब्दाना "खरा नागरिक" या पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा.

अप्रामाणिक × ______.



SOLUTION

अप्रामाणिक × प्रामाणिक



बेसावध × ______.


SOLUTION

बेसावध × सावध



हळूहळू × ______.


SOLUTION

हळूहळू × भराभर



पास × ______.


SOLUTION

पास × नापास



स्वप्नाळू-


SOLUTION

वाक्य- आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू, या विचाराने तो हुरळून गेला.



तार्किक विचार करणारा-


SOLUTION

अ. रुळाला पडलेले भगदाड पाहून कोणीतरी हा उपद्रव मुद्दाम केल्याचे, तसेच त्यामुळे भयंकर रेल्वे अपघात होऊ शकेल हे निरंजनच्या लक्षात आले.

आ. आपला पेपर बुडला, तर आपण नापास होऊ व गुरुजींकडून मिळणाऱ्या सवलती रद्द होतील याची कल्पना असूनही शेकडो लोकांच्या जीवाचा विचार करून त्याने स्टेशनमास्तरांना सावधान करण्यासाठी स्टेशनकडे जाण्याचा निर्णय घेतला.



संवेदनशील-


SOLUTION

अ. रस्त्यात मोठा दगड पडलेला दिसताच, दुसरे कोणी ठेचकाळून पडू नये, म्हणून निरंजनने तो उचलून बाजूला ठेवला.

आ. आपल्या परीक्षेचा विचार बाजूला ठेवून लोकांचा जीव वाचवण्याकरता त्याने स्टेशनमास्तरांना सावध केले.



‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


SOLUTION

निरंजन हा एक हुशार आणि जबाबदार मुलगा आहे. त्याच्या या गुणांचे दर्शन पाठात घडतेच; पण त्याच्यातल्या खऱ्या नागरिकाची ओळख होते, ती रेल्वेच्या घटनेतून. पुलावरचे रूळ खराब झाल्यामुळे रेल्वे अपघाताचा भयंकर धोका त्याने ओळखला. खराब रुळांमुळे अपघात झाल्यास शेकडो लोकांचा जीव धोक्यात येईल हे त्याने ओळखले आणि स्वत:चा नागरिकशास्त्राचा पेपर बुडवूनही त्याने स्टेशनमास्तरांना खबर दिली. या कृतीमुळे आपला पेपर बुडेल, गुरुजींनी दिलेल्या सवलती जातील, हे माहीत असूनही, लोकांचा जीव वाचवण्याकरता स्वत:चे नुकसान सोसण्याची तयारी त्याने दाखवली. त्यामुळे, एक मोठा अनर्थ टळाला. नागरिकशास्त्र हा विषय आपल्याला जे शिकवतो ते त्याने प्रत्यक्षात आयुष्यात करून दाखवले. त्यामुळे, 'निरंजन एक खरा नागरिक' असल्याचे स्पष्ट होते.



तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.


SOLUTION

माझ्या मते शिक्षणाची, ज्ञानाची आवड असणे हे खर्या विद्यार्थ्याचे प्रथम लक्षण आहे. त्यासाठी नम्रता हा गुण अंगी बाणवणे अत्यावश्यक आहे कारण 'विद्या विनयेन शोभते.' तसेच आपल्या शिक्षकांचा मानसन्मान राखणे, आपल्या आई-वडिलांचा, गुरुजनांचा आदर करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. कष्टाळू व मेहनती वृत्ती, नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड, प्रयोगशील दृष्टी, तर्कशुद्ध विचार करण्याची, सत्य-असत्य, चांगलं-वाईट ओळखण्याची कुवत महत्त्वाची आहे. आपल्या बरोबरीच्या, तसेच लहानांच्या मतांना किंमत देण्याची वृत्ती, सामाजिक भावना, समाजसेवेची आवड, देशाप्रती निष्ठा व देशाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची इच्छा असे अनेक गुण आदर्श विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे, असे मला वाटते.



तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.


SOLUTION

निरंजन हा अतिशय समंजस व परिस्थितीशी खंबीरपणे लढणारा मुलगा आहे. कठीण परिस्थितीतही तो कष्ट करत अभ्यासात प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हे गुण पाहून कोणालाही त्याचाशी मैत्री करावीशी वाटेल. या सोबतच निरंजनमध्ये इतरही अनेक गुण आहेत. कष्टाळू असण्याबाबतच तो आदर्श नागरिक आहे. इतरांवर येणारे संकट जाणवताच त्यावर लगेच योग्य ती कृती करण्याचे प्रसंगावधान व मनाचा मोठेपणा त्याच्याकडे आहे. दुसऱ्यांना त्रास होऊ नये, म्हणून धडपड करणारा असा हा संवेदनशील मुलगा आहे. या सर्व कारणांमुळेच स्वार्थापलीकडे जाऊन इतरांच्या हिताचा विचार करणारा निरंजन मला मित्र म्हणून नक्कीच आवडेल.



खालील तक्ता पूर्ण करा.

वाक्य

वाक्यप्रकार

सूचनेनुसार बदल करा.

(अ) किती सुंदर आहे ताजमहाल!

_________

विधानार्थी करा.

(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला.

_________

उद्गारार्थी करा.

(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले.

_________

प्रश्नार्थक करा.

(ई) ते काम खूप मोठे आहे.

होकारार्थी

नकारार्थी करा.

(उ) प्रवासात भरभरून बोलावे.

_________

आज्ञार्थी करा.

(ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही?

_________

विधानार्थी करा.



SOLUTION

वाक्य

वाक्यप्रकार

सूचनेनुसार बदल करा.

 

(अ) किती सुंदर आहे ताजमहाल!

उद्गारार्थी

विधानार्थी करा

ताजमहाल खूपच सुंदर आहे.

(आ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला.

विधानार्थी

उद्गारार्थी करा

किती आनंद झाला तुझ्या भेटीने!

(इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी खूप काही केले.

विधानार्थी

प्रश्नार्थक करा

शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी कमी का केले आहे?

(ई) ते काम खूप मोठे आहे.

होकारार्थी

नकारार्थी करा

ते काम लहान नाही.

(उ) प्रवासात भरभरून बोलावे.

विधानार्थी

आज्ञार्थी करा

प्रवासात भरभरून बोला.

(ऊ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही?

प्रश्नार्थी

विधानार्थी करा

पांढरा रंग सगळ्यांनाच आवडतो.