Chapter 16: व्युत्पत्ती कोश
टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
SOLUTION
व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य होय. व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे प्रामुख्याने चार प्रकारचे असते, ते पुढीलप्रमाणे:
अ. शब्दाचे मूळ रूप दाखवणे:
भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील 'आग' हा शब्द संस्कृतमधील 'अग्नि' या शब्दापासून आला आहे.
ब. अर्थांतील बदल स्पष्ट करणे:
काळानुसार, शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्परसंबंधात बदल होतात. काहीवेळा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो. उदा. व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान; पण सध्या 'शहाणा' म्हणजे 'अतिशहाणा' हा अर्थदेखील रूढ होत आहे. समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थदेखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात.
उदा. पाठ. शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा.
क. उच्चारातील बदल व फरक दाखवणे:
एखाद्या शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. उदा. दीपावली हा मूळ संस्कृत शब्द; मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे.
ड. बदलांचे कारण स्पष्ट करणे:
भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांमागच्या कारणांची नोंद व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे.
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
SOLUTION
१९३८ साली मुंबई येथे स्वा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' पार पडले. यात 'व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे' असा ठराव मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवली गेली. व्युत्पत्ती कोशनिर्मितीसाठी बॅ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले. श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी कोशास पुरस्कृत केले. यामुळे, कोशनिर्मितीस मोठी मदत झाली. १९४६ साली या कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतर या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
SOLUTION
शब्द अनेक अर्थ एक-
१. आई, माता, जननी, माऊली
२. फूल, पुष्प, सुमन, कुमुद, कुसुम
३. हात, कर, हस्त, पाणि, भुजा, बाहू
४. घोडा, अश्व, हय, तुरंग, वारू
५. सागर, समुद्र, सिंधू, अर्णव, रत्नाकर