Chapter 3: शाल
उत्तरे लिहा.
पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख-
SOLUTION
पु. ल. व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख- पुलकित
२००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष-
SOLUTION
२००४ च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष- लेखक रा. ग. जाधव
पाठात उल्लेख असणारी नदी-
SOLUTION
पाठात उल्लेख असणारी नदी- कृष्णा
सभासंमेलने गाजवणारे कवी-
SOLUTION
सभासंमेलने गाजवणारे कवी- कविवर्य नारायण सुर्वे
शालीचे शाल या पाठात आलेले विविध उपयोग लिहा.
Diagram
SOLUTION
शालीचे उपयोग-
सन्मान करण्यासाठी
शोभा वाढवण्यासाठी
लहान मुलाला ऊब देण्यासाठी
भिक्षेकऱ्याला पांघरण्यासाठी
शाल विकून अन्नाची ऊब मिळवण्यासाठी
खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा.
एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते.
SOLUTION
लेखकाने हे दृश्य पाहून न राहावून स्वत:च्या सुटकेसमधील पु. लं. नी दिलेली शाल व त्यासोबत काही पैसे खिडकीतून त्या बाईला देऊ केले.
म्हातारा, अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले.
SOLUTION
लेखकाने दुसऱ्याच दिवशी त्या भिक्षेकऱ्यास दोन शाली दिल्या.
कारणे शोधून लिहा.
एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती, कारण___
SOLUTION
बॅगेत फक्त पडून राहिलेल्या शालीचा उपयोग थंडीने कुडकुडणाऱ्या एका गरजूला थंडीपासून वाचवण्यासाठी झाला होता.
शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही, कारण___
SOLUTION
नारायण सुर्वे हे मुळातच शालीन होते.
लेखकांच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण ______
SOLUTION
शाल हे सन्मानाचे प्रतीक आहे व सन्मान केल्यानंतर अनेक वेळा तो सन्मान मिळवणारी व्यक्ती अहंकारी बनते.
आकृती पूर्ण करा.
Diagram
SOLUTION
विश्वकोशाचा अध्यक्ष
मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष
खालील वाक्यांतील कृतींतून किंवा विचारांतून कळणारे लेखकाचे गुण शोधा.
बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या.
SOLUTION
औदार्य, संवेदनशील मन, माणुसकी
खरे तर, खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते!
SOLUTION
मनाचा सच्चेपणा, प्रगल्भता
हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या.
SOLUTION
मनाचा मोठेपणा, दानशूरता
खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
जवळपास
SOLUTION
जवळपास- जवळ, पास, वळ, पाव, पाळ, पाज, पाजळ.
उलटतपासणी
SOLUTION
उलटतपासणी- उलट, तपासणी, पास, पाणी, पाट, पाल, पालट, पात.
अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा.
नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे.
SOLUTION
नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे.
खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या.
SOLUTION
खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या अरुंद प्रवाहावर होत्या.
मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले.
SOLUTION
मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले.
‘पुलकित’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
SOLUTION
लेखकाने सुटकेमधील काढलेली शाल कशी होती?
शालीनपासून शालीनता भाववाचक नाम तयार होते. त्याप्रमाणे ‘ता’, ‘त्व’,‘अवाळू’ आणि ‘पणा’ हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा.
SOLUTION
अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा.
लेखक सुंदर लेखन करतात.
SOLUTION
लेखिका सुंदर लेखन करते.
तो मुलगा गरिबांना मदत करतो.
SOLUTION
ती मुलगी गरिबांना मदत करते.
‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
शालीनता हा एक स्वभावगुण आहे, जो मुळातच व्यक्तीमध्ये असावा लागतो, तर शाल हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते. व्यक्तीचा गौरव करण्याकरता श्रीफळ व शाल दिली जाते; मात्र या सन्मानाच्या रूपाने व्यक्तीला मिळालेली शाल व शालीनता यांचा संबंध असेलच असे नाही. कवी नारायण सुर्वेही हीच बाब सांगतात. शाल मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन असेल किंवा शाल न मिळालेली प्रत्येक व्यक्ती शालीन नसेल असे होत नाही. शाल पांघरून मनाची, आचरणातील शालीनता मिळवता येत नाही. त्याचप्रमाणे मुळातच शालीन असणारी व्यक्ती शाल रूपाने सन्मान मिळवतेच असेही नाही; मात्र ती व्यक्ती आपल्यातील शालीनता जपून ठेवते. त्यामुळे, 'शाल आणि शालीनता' यांचा विशेष संबंध असेलच असे नाही.
‘भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग’, याविषयी तुमचे मत लिहा.
SOLUTION
माझ्या मते भिक्षेकऱ्याने शालीचा केलेला उपयोग त्याच्या परिस्थितीला अनुरूप होता. अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. ही गरज भागवण्याकरता भिक्षेकऱ्याने शाली विकण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. शरीराचे थंडीपासून रक्षण करण्याकरता लेखकाने दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याला उपयुक्त ठरणार होत्या; मात्र शरीराच्या उबेची गरज ही त्याच्याकरता दुय्यम होती. पोटात भुकेचा डोंब उसळलेल्या त्या भिक्षेकऱ्याला पोटभर अन्नाची अधिक गरज वाटली. त्यामुळे, मागचा-पुढचा विचार न करता त्याने त्या शाली विकल्या. त्यातून मिळालेल्या पैशांतून त्याने आपली प्राथमिक गरज भागवली. त्याला जाणवणारी भूक ही त्याला बोचणाऱ्या थंडीपेक्षा अधिक तीव्र होती. त्यामुळे, त्याने घेतलेला हा निर्णय योग्यच होता असे मला वाटते.
लेखकाच्या भावना जशा ‘शाल’ या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना, तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
मी इयत्ता सहावीत असतानाची गोष्ट. वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो, म्हणून आजी-आजोबांनी मला सायकल घेऊन दिली. मला खूपच आनंद झाला होता. आठ दिवसांतच मी सायकल चालवायला शिकलो आणि तेव्हापासून ती माझी सोबतीच झाली. शाळेत, मैदानावर कुठेही जाताना मी माझ्या सायकलशिवाय जाऊच शकत नाही, इतकं माझं तिच्याशी घट्ट नातं जुळलं आहे. आजी आजोबांचे प्रेम, मित्रांसोबत सायकलवरून केलेल्या सहली, धम्मालमस्ती अशा अनेक आठवणी या सायकलशी जोडल्या गेल्या आहेत, म्हणूनच मी जिव्हाळ्याने तिची काळजी घेतो, देखभालही करतो. अशी ही सायकल माझ्यासाठी फक्त एक वस्तू नाही, तर हक्काची, जीवाभावाची व्यक्तीच झाली आहे.