Chapter 7: फूटप्रिन्टस
आकृती पूर्ण करा.
SOLUTION
रेखामावशींच्या पावलांची वैशिष्ट्ये:
मळकट
पायाला चिरण्या पडलेला
SOLUTION
पावडेकाकांच्या पावलांची वैशिष्ट्ये-
१. गोजिरी
२. गुलाबी तळवे
३. लोण्यासारखी
कारणे लिहा.
स्नेहल त्रासली, कारण __________.
SOLUTION
स्नेहल त्रासली, कारण रेखामावशी हॉलमधील लादी पुसत असताना त्यांच्या पावलांचे काळे मळकट ठसे पुसलेल्या लादीवर उमटत होते व स्वच्छतेची आवड असलेल्या स्नेहलला ते आवडले नाही.
पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण ________.
SOLUTION
पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण सुमितच्या ॲपने त्यांच्या पावलांचे 'डर्टीएस्ट फूटप्रिन्ट्स, परफेक्ट ब्लॅक फूटप्रिन्ट्स' असे वर्णन करत काळीकुट्ट पावले दाखवली.
रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण _________
SOLUTION
रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण रेखामावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही.
अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण __________
SOLUTION
अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण पब्लिक ट्रान्सपोर्टच्या वापरामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणाचे नुकसान टळेल व ग्लोबल वॉर्मिंगचे संकट टळेल.
उत्तरे लिहा.
स्नेहलने केलेला निश्चय-
SOLUTION
स्नेहलने केलेला निश्चय- कॉलेजात ये-जा करण्यासाठी सायकल वापरण्याचा.
अभिषेकने केलेला निश्चय-
SOLUTION
अभिषेकने केलेला निश्चय- कॉलेजला बसने ये-जा करण्याचा.
पाठातील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.
रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे.
SOLUTION
रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे- उपमा अहंकार
पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा.
SOLUTION
पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा- उपमा अलंकार
खालील शब्दाचे प्रचलित मराठीत अर्थ लिहा.
व्हर्च्युअल रिॲलिटी
SOLUTION
व्हर्च्युअल रिॲलिटी- शाब्दिक (वरवरचे) सत्य
टेक्नोसॅव्ही-
SOLUTION
टेक्नोसॅव्ही- तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेले
खालील वाक्यातील विरामचिन्हे शोधून त्यांची नावे लिहा.
‘‘मावशी, तुम्ही राहता कुठं?’’
SOLUTION
खालील शब्दांच्या जाती ओळखून लिहा.
स्नेहल-
SOLUTION
स्नेहल- विशेषनाम
तिचे-
SOLUTION
तिचे- सर्वनाम
चंदेरी-
SOLUTION
चंदेरी- विशेषण
करणे-
SOLUTION
करणे- क्रियापद
खालील तक्ता पूर्ण करा.
SOLUTION
'आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
रोजच्या जीवनात अगदी कळत नकळतपणे आपल्या हातून प्रदूषण होत असते. या प्रदूषणाची आपल्याला जराही जाणीव नसते; मात्र त्याचे गंभीर परिणाम वातावरणावर होत असतात. जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग), पाऊस पुरेसा व वेळेवर न पडणे, आम्लपर्जन्य इत्यादी अनेक स्वरूपात ही पावले वातावरणावर उमटलेली दिसतात. आपल्या एखाद्या चुकीमुळे क्षणात प्रदूषण होते; पण ते प्रदूषण वातावरणातून नष्ट करण्याकरता कित्येक वर्षांचा काळ लागतो. प्लास्टिकचा अतिवापर, गाड्यांमधून, कारखान्यांतून बाहेर पडणारे विषारी धूर, सांडपाणी यांमुळे होणारे प्रदूषण अनेक झाडे लावल्यानंतरही लगेच नष्ट होत नाही. आपल्या मळलेल्या पावलांचे ठसे कापडाने लगेच पुसता येतात; मात्र हे प्रदूषणरूपी ठसे ताबडतोब पुसले जात नाहीत.
‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.
SOLUTION
'थेंबे-थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे आपण प्रत्येकाने केलेल्या थोड्या-थोड्या प्रदूषणाचा आता भस्मासूर झाला आहे. यामुळे, ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. मागचा पुढचा विचार न करता केली जाणारी जंगलतोड प्रथमत: थांबवली पाहिजे. विषारी धूर, रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर नियम लावले पाहिजेत. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या कमी केली पाहिजे. याव्यतिरिक्त, वातानुकूलित यंत्र (एसी), शीतकपाट (फ्रीज), परफ्युम्स इत्यादी रासायनिक वायू निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर कमी केला पाहिजे. अशाप्रकारे, आपण ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण कमी करू शकतो. प्रत्येकाने किमान एक झाड लावून, त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. तरच ही भयानक परिस्थिती टाळता येईल.