Chapter 8: ऊर्जाशक्तीचा जागर
खालील तक्त्यात माहिती भरून तो पूर्ण करा.
SOLUTION
आकृती पूर्ण करा.
SOLUTION
युनियन हायस्कूलमधील शिक्षकांची वैशिष्ट्ये-
१. सेवाभावी वृत्ती.
२. स्वत:ला झोकून देत शिकवणे.
३. निरपेक्ष भावनेने मार्गदर्शन करणे.
SOLUTION
लेखकाच्या आईचे व्यक्तिमत्त्व विशेष-
१. दारिद्रयाशी संघर्ष करणारी
२. धीर न सोडणारी व न खचणारी
३. कष्टाळू
४. शिक्षणाचं महत्त्व जाणणारी
कारणे लिहा.
लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण ___________
SOLUTION
लेखकाला शिक्षणाबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली, कारण लेखकाला शिक्षकांचे चांगले मार्गदर्शन मिळाल्यामुळे लेखकाच्या अभ्यासाचा व जीवनाचा पाया पक्का झाला.
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण ____________
SOLUTION
लेखकाच्या आईला काँग्रेस हाऊसमध्ये काम मिळाले नाही, कारण तेथे तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम मिळू शकत होते व लेखकाची आई तेवढी शिकलेली नव्हती.
लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण _____________
SOLUTION
लेखकाला गिरगावातील नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळाला नाही, कारण हायस्कूलच्या प्रवेश फीची रक्कम जमा होईपर्यंत नामांकित शाळांमधील प्रवेश बंद झाले होते.
कंसातील शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून रिकाम्या जागेत भरा.
आपण सगळ्यांनी ______ मदत केली पाहिजे. (आई)
SOLUTION
आपण सगळ्यांनी आईला मदत केली पाहिजे.
आमच्या बाईंनी प्रमुख ______ आभार मानले. (पाहुणे)
SOLUTION
आमच्या बाईंनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी _____ रुजू झाला. (नोकरी)
SOLUTION
शिक्षण पूर्ण झाल्यावर मोहन सरकारी नोकरीत रुजू झाला.
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार, उपमेय, उपमान ओळखा.
SOLUTION
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
१. अलंकार: उपमा अलंकार
२. उपमेय: पुसटशा आठवणी
३. उपमान: वाऱ्याच्या लहरी
‘भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
SOLUTION
भावे सरांनी लेखकाला म्हणजेच डॉ. माशेलकरांना आयुष्याचे खरे तत्त्वज्ञान शिकवले. विज्ञानाच्या एका लहानशा प्रयोगातून सूर्याची शक्ती भिंगाच्या साहाय्याने एकवटून कागद सहजरीत्या जाळता येतो. त्याचप्रमाणे एकाग्रतेच्या जोरावर लक्ष केंद्रित करून कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करता येते असे त्यांनी सांगितले. आपण एकाग्रता साधली, तर सर्व संकटांवर मात करत यश मिळवू शकतो, हे भावे सरांनी माशेलकरांना त्या प्रयोगातून पटवून दिलं. या त्यांच्या शब्दांतून माशेलकरांना एकाग्रतेचा मंत्र मिळाला. आयुष्यभरासाठी प्रेरणा, ताकद मिळाली.
शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.
SOLUTION
शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांच्यामध्ये विविध गुणांचे दर्शन होते. माशेलकरांनी त्यांच्या आईची मेहनत, मामाचे सहकार्य व शिक्षकांचे मार्गदर्शन लक्षात ठेवून त्यांच्या या उपकारांचे स्मरण ठेवले आहे. यातून त्यांच्यातील कृतज्ञता हा गुण दिसून येतो. युनियन हायस्कूलमधील शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते या लेखकाच्या वाक्यातून त्यांची सुजाणता कळून येते. अभ्यासाकरता अपुरी जागा, पूरक वातावरणाचा अभाव असूनही लेखकाने जिद्दीने अभ्यास करत यश मिळवलं. यातून त्यांची जिद्द आणि कष्टाळूपणा अधोरेखित होतो. भावे सरांनी दिलेला एकाग्रतेचा मंत्र अनुसरत लेखकाने आयुष्याची उभारणी केली. यावरून त्यांचा आज्ञापालन हा गुण ठळकपणे जाणवतो. विद्यार्थिदशेतील डॉ. माशेलकरांमध्ये कृतज्ञता, सुजाणता, जिद्द, कष्टाळूपणा व आज्ञापालन हे गुण दिसून येतात.
डॉ. माशेलकर यांची मातृभक्ती ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते, ते प्रसंग पाठाधारे लिहा.
SOLUTION
डॉ. माशेलकरांच्या आईने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे, आपल्या मुलाच्या शिक्षणाकरता ती सतत कष्ट करत होती. घरची परिस्थिती इतकी बेताची होती, की प्रसंगी तीन पैसे उभे करतानाही तिच्या डोळ्यांत पाणी उभे राही, हे आठवून लेखकाच्या अंगावर काटा उभा राहतो. तिने लेखकासाठी घेतलेले कष्ट लेखकाला शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. शाळेचे दिवस आठवले, की त्यांची आई त्यांच्या डोळ्यांसमोर उभी राहते. आई केवळ त्यांची शिक्षकच नव्हे, तर सर्वस्व असल्याचे ते मान्य करतात. तिच्याविषयीचे ऋण व्यक्त करता येण्यासारखं नाही, असे ते म्हणतात. या लेखकाने केलेल्या वर्णनातून त्यांची मातृभक्ती ठळकपणे जाणवते.
माझ्या जीवनातील शिक्षकाचे स्थान', या विषयावर तुमचे विचार लिहा.
SOLUTION
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचं महत्त्वपूर्ण स्थान असतं. कुंभार मातीला चांगला आकार देत सुबक मडकी घडवतो, त्याप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत मला घडवलं. अजूनही घडवत आहेत. ते मला उत्तम मार्गदर्शन करतात. शिक्षकांनी दिलेला अभ्यासाचा, शिस्तीचा, चिकाटीचा मंत्र जपत मी चाललो आहे. जीवनात चांगला माणूस व्हायचं आहे. क्रीडाक्षेत्रात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्यात मला नक्कीच यश मिळेल हा विश्वासही मला माझ्या शिक्षकांमुळेच मिळाला आहे.