गढी साध्याय वर्ग बारावा मराठी | गढी Gadhi (साहित्यप्रकार) संपूर्ण स्वाध्याय
गढी साध्याय वर्ग बारावा मराठी | गढी Gadhi (साहित्यप्रकार) संपूर्ण स्वाध्याय
कृती (१) चौकटी पूर्ण करा.
कृती (१) | Q 1.1 | Page 83
1) गावाचे भरभरून कौतुक पाहणारी - ____________
SOLUTION
गावाचे भरभरून कौतुक पाहणारी - वाननदी
2) लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत - ____________
SOLUTION
लहानुलं गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत - सातपुडा पर्वत
3) बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे - ____________
SOLUTION
बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे - पाटील
4) गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे - ____________
SOLUTION
गुरुजींच्या समाजकार्याविरुद्ध फळी तयार करणारे - उचापती माणसे
कृती (१) आ) खालील व्यक्तींतील नातेसंबंध स्पष्ट करा
कृती (१) | Q 2.1 | Page 83
1) बापू गुरुजी आणि परबतराव
SOLUTION
बापू गुरुजी आणि परबतराव - बापू गुरुजी हे परबतरावांचे सुपुत्र.
2) बापू गुरुजी आणि संपती
SOLUTION
बापू गुरुजी आणि संपती - संपती हा बापू गुरुजींचा मानलेला मुलगा.
3) लक्ष्मी आणि बापू गुरुजी
SOLUTION
लक्ष्मी आणि बापू गुरुजी - लक्ष्मी ही बापू गुरुजींची पत्नी.
4) बापू गुरुजी आणि पाटील
SOLUTION
बापू गुरुजी आणि पाटील - पाटील हे बापू गुरुजींना मुलाप्रमाणे मानणारे.
कृती (२) कृती करा.
कृती (२) | Q 1 | Page 83
1) गुरुजींनी गावात सुरू केलेल्या विविध गोष्टी
SOLUTION
(१) शाळा
(२) बोर्डिंग
(३) तालीमखाना
(४) वाचनालय
2) बापू गुरुजींची स्वभाव वैशिष्ट्ये
SOLUTION
(१) गावावर नितांत प्रेम असलेले.
(२) गावाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेले.
(३) पूर्णपणे नि:स्वार्थी.
(४) स्वत:च्या मर्यादांची जाणीव असलेले.
कृती (३) अ.खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
कृती (३) | Q 1.2 | Page 83
1) दान्याचा पूर
SOLUTION
दान्याचा पूर : खूप धान्य पिकत असे.
2) माणसानं पयले पानी पावावं आन् मंग पोवावं
SOLUTION
माणसानं पयले पानी पावावं आन् मंग पोवावं : परिस्थिती समजून घ्यावी, आपला आवाका लक्षात घ्यावा आणि कामाला हात घालावा.
3) पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं
SOLUTION
पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं : स्वत:ची कुवत पाहून कार्य करायला पुढे व्हावे.
4) मले पा आन् फुलं वहा
SOLUTION
मले पा आन् फुलं वहा : फक्त मलाच चांगले म्हणा.
कृती (३) आ) वैदर्भी बोलीत वापरलेल्या पुढील वाक्प्रचारांचे अर्थ लक्षात घ्या आणि त्यांसाठी तुमच्या बोलीत किंवा मराठीत वापरले जाणारे वाक्प्रचार लिहा :
कृती (३) | Q 2.1 | Page 83
1) मन तिळतिळ दुखने
SOLUTION
(i) मन तिळतिळ तुटणे.
(ii) दुःखाने व्याकूळ होणे.
2) ठान मांडून उबी रायने :
SOLUTION
(i) ठाण मांडून बसणे, पाय रोवून उभे राहणे.
(ii) कृतीत ठामपणा असणे.
कृती (१) लेखकाने खालील गोष्टी कळण्यासाठी व्यंगचित्रात वापरलेली प्रतीके लिहा.
इ) खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
1) हळ्याच्या सरपानं मानसं मरत नसतात.
SOLUTION
क्षुद्र व्यक्ती चांगल्या व्यक्तींचे काहीही वाईट करू शकत नाही.
2) गायीची शिंगं गायीला भारी नसतात.
SOLUTION
आपल्या माणसासाठी खस्ता खाताना कोणालाही त्रास होत नाही.
3) चाल व्हय रे पोरा आन् वय रे ढोरा.
SOLUTION
पोरा, चल, पुढे हो आणि ढोरांना ओढून घेऊन जा.
कृती (४) कारणे लिहा.
कृती (४) | Q 2 | Page 83
1) गावतला जो तो आनंदात होता; कारण
SOLUTION
गावतला जो तो आनंदात होता; कारण त्या दिवशी गावाला 'साजरे गाव' हे पारितोषिक मिळाले होते.
2) शिक्षण आटोपल्यावर बापूना गावाची ओढ लागली; कारण
SOLUTION
शिक्षण आटोपल्यावर बापूना गावाची ओढ लागली; कारण त्यांना गावात शिक्षणाचा प्रसार करून गाव सुधारायचे होते.
3) गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते; कारण
SOLUTION
गाववाले गढी खचण्याची वाट पाहत होते; कारण गढी खचल्यावर गाववाल्यांना पांढरी माती मिळणार होती.
कृती (५) थोडक्यात उत्तरे लिहा.
कृती (५) | Q 1 | Page 84
1) 'पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उळावं', असे बापू गुरुजी का म्हणत असतील ते स्पष्ट करा.
SOLUTION
आकाशात भरारी मारायची असेल, तर पंख मजबूत असावे लागतात. पंख मजबूत नसतील, तर अर्ध्यावरच पक्षी खाली पडेल. त्या दमलेल्या अवस्थेत त्याला पळताही येणार नाही. उडताही येणार नाही. मग कोणीही त्याला मारतील, खातील. म्हणजेच त्याला स्वत:चे रक्षण करता येणार नाही. स्वत:चे अन्न आणण्यासाठी दूरपर्यंत जाता येणार नाही. हा एक दाखला झाला. हाच सर्वत्र लागू पडतो.
आपण जीवन जगत असताना अनेक गोष्टी करू पाहतो. अशा वेळी आपण कोणती कृती करायची ठरवली आहे; त्या कृतीसाठी कोणते गुण, कोणती कौशल्ये आवश्यक आहेत, ते प्रथम समजून घेतले पाहिजेच. ते गुण, ती कौशल्ये आपल्याजवळ आहेत का, ते तपासून पाहिले पाहिजे. ते गुण कौशल्ये नसतील, तर आपण यशस्वी होणार नाही आणि आपल्याला नैराश्य येण्याचा धोका असतो. म्हणून गुरुजींनी दिलेला दाखला नीट समजून घेतला पाहिजे.
2) बोर्डींगमधला 'संपती' नावाचा मुलगा गेल्यानंतर बापू गुरुजींच्या भावना तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
बोर्डिंगमधल्या संपतीला गुरुजींनी आपला मुलगाच मानले होते. त्याला वडील नव्हते. त्याचे वडील तो लहान असतानाच हे जग सोडून गेले होते. गुरुजींनी त्याला आईबापाची माया दिली होती. पण एक प्रसंग आभाळ कोसळल्यासारखा आला. तालुक्याला शिक्षण समितीची बैठक होती. गुरुजींना बैठकीसाठी जाणे भागच होते. गुरुजी तालुक्याला गेले आणि इकडे संपती पटकीच्या रोगाने त्याच रात्री मरण पावला. या घटनेने गुरुजी व्याकुळले, विव्हळणे. याला आपण मुलगा मानलं; पण आपण त्याचे रक्षण करू शकलो नाही. गावात दवाखाना असता, तर तो वाचला असता. ते धाय मोकलून रडले. गावात दवाखाना नाही याला जणू आपणच जबाबदार, असे त्यांना वाटू लागले. म्हणून गावातली एक एक उणीव दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला.
3) गुरुजींचा मुलगा वारल्यानंतर बोर्डिंगातल्या मुलांच्या झालेल्या अवस्थेचे वर्णन करा.
SOLUTION
गुरुजी शाळेमध्ये पूर्ण गुंतून पडले होते. त्यांचे त्यांच्या घराकडे, पत्नीकडे, मुलाकडे अजिबात लक्ष नव्हते. एकदा त्यांचा मुलगा खूप आजारी पडला. तापाने फणफणला. पत्नी येऊन रागावून गेली, तेव्हा ते मुलाला घेऊन अकोल्याला डॉक्टरकडे गेले. आपल्या कनवाळू गुरुजींवर फार मोठे संकट आल्याचे मुलांना जाणवले. हे संकट दूर झाले नाही, तर गुरुजी पूर्णपणे कोलमडून पडतील, या भीतीने संपूर्ण बोर्डिंग भकास झाले होते. त्यातले चैतन्यच नष्ट झाले होते. बोर्डिंगातल्या मुलांची जेवणावरची वासना उडाली. कोणीही जेवले नाहीत. सर्वजण निपचीत पडून राहिले होते. तिकडे अकोल्याला डॉक्टरांच्या उपचारांचा काही उपयोग झाला नाही. गुरुजींच्या मुलाने शेवटचा श्वास घेतला. गुरुजी पुरते हादरून गेले. मुले तर त्यांच्यापेक्षाही भेदरून गेले. एकमेकांच्या गळ्यात पडून रडले. गढीसारखे खंबीर गुरुजी सर्व बाजूंनी खचत चाललेले मुलांना पाहवत नव्हते. मुले हादरून गेली होती. अगतिकता, असहायता यांचे दर्शन घडत होते.
कृती (६) स्वमत
कृती (६) | Q 1 | Page 84
1) बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याप्रमाणेच मुलांचेही ते खूप लाडके होते. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते कधी खाली पडू देत नसत. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींचाही त्यांच्यावर जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत. त्यांचा अभ्यास घेत; पहाटे उठूनही अभ्यास घेत, गुरुजींचा मुलगा वारला, तेव्हा मुले दुःखाच्या सागरात बुडून गेले.
सातवी पास झाल्यावर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत. काही शिकलेल्यांना बापूंनी अन्य गावच्या शाळांत शिक्षक पदावरची नोकरी मिळवून दिली होती. आपली उदरनिर्वाहाची सोय झाली, तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत. श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडत. त्यांचा आशीर्वाद घेत. आपापल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे, असा ते आग्रही करीत. अशा प्रकारे आजीमाजी सर्व विद्यार्थ्यांचा गुरुजींवर जीव होता.
2) गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांबद्दलचे तुमचे मत स्पष्ट करा.
SOLUTION
उचापती करणारे लोक सर्वत्र असतात, असे आता माझे मत झालेले आहे. 'गढी' या कथेत वर्णन केलेली घटना ग्रामीण भागात घडलेली आहे. शिवाय जुन्या काळात घडलेली आहे. पण असे लोक आताही दिसतात आणि शहरांतसुद्धा आढळतात. हे लोक नेहमी चांगल्या कामांत अडथळे आणतात. काही चांगले घडावे, लोक समर्थ व्हावेत, त्यांचे जीवनमान सुधारावे, सर्वांना शिक्षण मिळावे असे त्यांना वाटतच नाही. सर्व समाज उत्तम जीवन जगू लागला, तर त्यांची किंमत नाहीशी होईल, अशी त्यांना भीती वाटते. सगळीकडे सतत काहीतरी वाईट घडत राहिले की, उचापती लोक दांडगाई करून प्रसंगात घुसतात आणि स्वत:चा फायदा करून घेतात. प्रामाणिक कष्ट करून त्यांना जगायचेच नसते. फुकटात पैसा लाटायचा असतो. राजकारणात सध्या अशा लोकांचीच चलती आहे. आपणच या लोकांना ओळखून त्यांना दूर ठेवले पाहिजे. तरच आपला देश सुधारेल.
3) 'वान नदीले कदीमदी येनारा पूर आता पटावरल्या आकल्याइले आला होता, यातून तुम्हांला समजणारा अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
या विधानाचा शब्दशः अर्थ आधी आपण समजून घेऊ. वान नदीला पूर्वी भरपूर पाणी असे. पूर्वी ती भरभरून वाहत होती. अधूनमधून पूरही येई. या नदीच्या पाण्यात जशी वाढ होई, तशी वाढ आता शाळेच्या पटसंख्येत होऊ लागली होती. म्हणजे गुरुजींचे कष्ट फळाला आले होते. ज्या गावात पूर्वी शाळाच नव्हती, त्या गावात आता शाळा आली. इतकेच नव्हे, तर चौथीपर्यंत असलेली शाळा गुरुजींच्या प्रयत्नांमुळे सातवीपर्यंत झाली. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातच मिळावे; म्हणून गुरुजींनी गावात हायस्कूल सुरू करण्याचाही प्रयत्न केला. पण उचापती लोकांनी हायस्कूल होऊ दिले नाही. पण नदीला जसा पूर येई, तसा गावातल्या शाळेच्या विद्यार्थी संख्येला पूर येऊ लागला होता. हे मात्र एक सुचिन्ह होते.
कृती (७) अभिव्यक्ती.
कृती (७) | Q 1 | Page 87
1) गढी’, ‘वान नदी’ आणि ‘वटवृक्ष’ या तीन प्रतीकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे, ते प्रत्येकी एकेका उदाहरणाद्वारे स्पष्ट करा
SOLUTION
उत्तर उपलब्ध नाही
2) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता पटवून द्या.
SOLUTION
उत्तर उपलब्ध नाही
3) या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण लिहा.
SOLUTION
उत्तर उपलब्ध नाही